Posts

Showing posts with the label France

माय नेम इज जॉर्ज...

Image
माय नेम इज जॉर्ज... (भाग-१) कांसच्या त्या निमुळत्या गल्यांमधुन कधी स्वतःच्या तर कधी कैमेऱ्याच्या नजरेतून मी अखंड पायतोड करत होतो, आजचा दिवस शेवटचा होता, उद्याची फ्लाइट, जितके लवकर निघता येईल तितक्या लवकर रूम सोडलेली, सकाळी ९.४५ वाजले असतील, यूरोपात उन्हाळ्यातला दिवस मोठा... त्यामुळे बऱ्यापैकी सूर्य आग सोडत होता पण कमाल अशी की ती आग कांसला येई पर्यन्त जणू गायब होत होती!   असो... गेल्या ५ दिवसात गेल्या ४ वर्षात केली नसेन इतकी पायतोड केली होती, त्यामुळे पायांनी माझ्या शरीराला प्रत्येक पावलावर 'मी किती महत्वाचा अवयव आहे' ह्याची जाणीव करवुन द्यायचे ठरवले होते! त्यात त्या गल्ल्यांयामधुन मध्येच एक ठिकाण असे आले जिथे न संपणाऱ्या पायऱ्या!... आधीच पायांचे १२ वाजलेले, त्यात १३वा मजला, हो हो संपतच नव्हत्या, पण माझा कैमरा आणि मी, जणू तो माझ्या अंगाचाच एक भाग. दोघे न थकता आपापली कामे करत होतो.   डोळे मिचकावतो आपण, तसे कैमऱ्याचे शटर पाडत होतो, तेवढ्यात एक म्हातारा,अती म्हातारा नाही पण नक्कीच ६०ठी ओलांडलेला असावा, मला पाहुन म्हणाला की कुठला कैमरा आहे त...

यूरोप...

Image
॥श्री॥ यूरोप भाग-१ ४ वर्षापूर्वी यूरोप ट्रिप केलेली... तेव्हा लिहायची सवय नव्हती जी आत्ताच ६-७ महिन्यात लागल्ये, आता खंत वाटते! तेव्हाच जर त्या आठवणी लिहिल्या असत्या तर मस्त बारकावे मांडता आले असते! आधीच माझा नावांचा गोंधळ भलतच नाव सांगतो पत्ता वेगळाच! असो... छान झालेली ट्रिप! खुप छान... काही वाइट अनुभव, एकूणच शेंगदाण्याच्या पूड़ीसारखं, एखादा खवट दाणा येतो म्हणजे येतोच! असो... मला लहानपणापासून पॅरिसला भेट द्यायची खुप इच्छा होती... वडील त्यांच्या तरुणवयात गेलेले, त्यावेळचे फोटो ते तपकीरी कलरचे खरे खुरे इंस्टाग्राम-विंटेजवाले फोटोज पाहुन पाहुन जाम आकर्षण निर्माण झाले... विशेष करून आइफल टॉवर! आणि एकूणच पॅरीस शाहराच्याच प्रेमात पडलेलो... पण मग फक्त पॅरिस का!? ९दिवसात लगेहाथ बाकीच्या आजुबाजूच्या शाहरांमध्ये पण डोकवु... ट्रेवलिंग एजेंट, गूगल, तिथे गेलेले मित्र आणि सर्वात महत्वाची-बायको ह्या सर्वांच्या मदती ने एक आराखडा तयार झाला यूरोप टूरचा... होटेल बुकिंग, फ्लाइट/ट्रेन बुकिंग आणि ज्या ज्या शहरात जातोय तिथल्या रांगा टाळण्या साठी ऑनलाइन बुकिंग... हे सर्व हातात आल्यावर ...