यूरोप...
॥श्री॥
यूरोप भाग-१
४ वर्षापूर्वी यूरोप ट्रिप केलेली...
तेव्हा लिहायची सवय नव्हती जी आत्ताच ६-७ महिन्यात लागल्ये, आता खंत वाटते!
तेव्हाच जर त्या आठवणी लिहिल्या असत्या तर मस्त बारकावे मांडता आले असते!
आधीच माझा नावांचा गोंधळ भलतच नाव सांगतो पत्ता वेगळाच! असो... छान झालेली
ट्रिप! खुप छान... काही वाइट अनुभव, एकूणच शेंगदाण्याच्या पूड़ीसारखं, एखादा
खवट दाणा येतो म्हणजे येतोच! असो...
मला लहानपणापासून पॅरिसला भेट द्यायची खुप इच्छा होती... वडील त्यांच्या
तरुणवयात गेलेले, त्यावेळचे फोटो ते तपकीरी कलरचे खरे खुरे
इंस्टाग्राम-विंटेजवाले फोटोज पाहुन पाहुन जाम आकर्षण निर्माण झाले...
विशेष करून आइफल टॉवर! आणि एकूणच पॅरीस शाहराच्याच प्रेमात पडलेलो... पण मग
फक्त पॅरिस का!? ९दिवसात लगेहाथ बाकीच्या आजुबाजूच्या शाहरांमध्ये पण
डोकवु... ट्रेवलिंग एजेंट, गूगल, तिथे गेलेले मित्र आणि सर्वात
महत्वाची-बायको ह्या सर्वांच्या मदती ने एक आराखडा तयार झाला यूरोप
टूरचा... होटेल बुकिंग, फ्लाइट/ट्रेन बुकिंग आणि ज्या ज्या शहरात जातोय
तिथल्या रांगा टाळण्या साठी ऑनलाइन बुकिंग... हे सर्व हातात आल्यावर आता
आम्ही नक्की जाणार ह्यावर विश्वास बसला एकदाचा... जसं मला चित्रपट बघायला
गेलो की एडवांस किवा आयत्या वेळची टिकिटं मग पोपकोर्न वगैरे, गर्दी, मग
जाहीराती...ट्रेलर्स हे सर्व झाल्यावर जेव्हा टाइटल येतं तेव्हाच खात्री
पटते की आपण आता सिनेमा बाघणार! तसाच प्रकार... पण आता समोर दीसणार होतं...
रोम-फ्लोरेंस-वेनिस-पॅरिस.
to be continued
#सशुश्रीके | ५ एप्रिल २०१५
to be continued
#सशुश्रीके | ५ एप्रिल २०१५
यूरोप भाग २
२०११
च्या ह्या यूरोप दौऱ्या आधी २०१०मध्ये टर्की मध्ये इस्तांबुलला भेट
दीलेली, त्यामुळे ज़रा कल्पना होती की वीजा आणि बाकीच्या गोष्टींची... पण
चीनी नावासारख्या पण युरोपिअन 'शेंजेन' वीजाला आठवडा लागला मिळवायला, विमान
प्रवासाबद्दल पर्याय होते, 'व्हाया' वाली विमान तिकीटं स्वस्त होती पण
त्यात वेळेचं गणित महाग जात होतं त्यापेक्षा पैशाचं गणित महाग करून
'एमिरेट्स-ऐरवेज'ची थेट दुबई-रोम आणि परतताना पॅरिस-दुबई वाले तिकीट घेतले,
टाईम-ट्रेवल नावाच्या प्रवासिक कामकाज पाहणाऱ्या खाजगी कार्यालयाशी २आठवडे
सल्लामसलत करत सर्व आरक्षणे आणि प्रवासाचे आराखडे समजून घेऊन तो दिवस आला!
२३
जुलै रात्रौ ९.२५ वाजता विमान वेळेत निघाले… अमृता आणि माझ्या चेहऱ्यावर
पुढे येणाऱ्या ९ दिवसांचा 'अडव्हांस-मोड' आनंद स्पष्ट झळकत होता... फ
(FIUMICINO) वरुन असलेल्या एका रोमच्या विमानतळावर आमचं आगमन झाले, तसा
लाहानच होतं विमानतळ मुम्बई/दुबई सारखं प्रचंड मोठं नव्हतं, पण पुण्याइतकं
'चालू होते ही ख़तम हो गया' सारखं लहानही नव्हतं! आम्ही नेहमीप्रमाणे सर्व
विजा / लग्गेज / इमिग्रेशन चा सागरसंगीत पार करत विमानतळाच्या बाहेर पडलो,
हातात गुगल वरून मारलेला नकाशा घेऊन हॉटेलच्या मार्गावर जाताना काय मस्त
वाट्त होतं सांगू! एक प्रसंग तर जसा घडला तसा आठवतोय!
एक
आजी आजोबा पिज्झाच्या हॉटेला समोरून जात होते… म्हातारा आत जायचं म्हणतो
होता आणि म्हातारी नको म्हणत होती! जरासं पुढे जाउन दोघे मागे वळाले,
कदाचीत म्हातारा जिंकला असावा आणि दोघे आत गेले, हो हे सांगायचं विसरलोच,
अखंड ९ दिवस… हो अगदी निघताना विमानतळापासून परतताना पर्यंत अखंड हातात
कॅमेरा होता… ३२जीबी कार्ड पण पुरले नाही! रोम मध्येच ८जीबीचे एक नेवीन
कार्ड अगदी दुप्पट किमतीत विकत घ्यावे लागले!
असो,
नकाशा वरचं हॉटेल नाव आणि प्रय्तक्षवालं नाव जुळलं… रीसेप्शनपाशी चावी
तयार, मस्त जुन्या चित्रपटात दाखवतात तश्या फाइल्स ठेवलेल्या एका लाकडी
कपाटात… ह्या सर्व क्षणांची छायाचित्रे चीकटवतोय…
भेटू ३ऱ्या भागात!
to be continued
#सशुश्रीके | ०७ एप्रिल २०१५यूरोप भाग ३
दुपारेचे ३-४ वगैरे वाजले असतील, सामान वगैरे लिफ्ट मधून आणणाऱ्या श्वेतवर्णीय धिप्पाड माणसाला ५युरो देऊन अच्छा बायबाय केलं, आणि त्या छोट्याश्या खोलीत घुसलो, ऐकलं होतं की खूप लहान जागा असतात हॉटेलच्या, पण असती लहान ही नाही… सहज डीप्स मारता येतील ईतकी जागा, पलंग, पालंगावरती एक मोठे पैंटींग, सर्व भिंती क्लासिक वालपेपर वापरून सुशोभित प्रकार सर्व… रूम मध्यॆ अंधार वाटत होता, बाहेर तर छान उन होते, म्हणून पडदा आणि खिडकी उघडली! काय छान वातावरण… समोरची घरं, त्यांचे उघडे दरवाजे, खिडक्या… स्वयंपाकघराच्या चिमणीतून येणारे धूर… मी मोबाईल कॅमेऱ्यातून मस्त पानारोमा पद्धतीने छायाचित्रे काढली, अमृतानी घरी केलेले परोठे हाणले… आम्ही ५च्या आसपास रोमच्या रस्त्यांवर हिंडायला निघालो.
लहान लहान रस्ते, लहान गाड्या, जागो जागी सुवेनीयर्सची दुकाने, रंगीवेरंगी कपडे घातलेले तरूण-तरुणी, दुचाकी-सायकलींनी संपन्न रस्ते, रस्त्यावरच्या ट्रेफीक साइनवर किडे केलेले दिसले, आश्चर्य वाटले जेव्हा पहिल्यांदा पाहिलं, पण नंतर असं लक्षात आलं की प्रत्येक ट्रेफीक साइनवर काहीना काहीतरी किडे आहेतच… पण तोंडावर हसू येतील असे! 'ग्राफिटी' चे उत्तम उदाहरण असल्यासारखे. आम्ही 'होप-न-होप-ऑफ' प्रकारच्या बस साठी बुकिंग करायचे ठरवले होते, रस्त्यावर लोक त्यांचे लीफ्लेट वाटतानाही दिसले, बहुतकरून श्रीलंकन होते, त्यांकडून माहिती घेत घेत आम्ही फिरत होतो, मस्त छान थंडी होती, हळू हळू अंधार पडू लागला, एका चौकात रिक्षा दिसली!… हो अगदी आपल्या भारतात असते तशी… लोकल ट्रान्सपोर्ट सारखी! पियाग्गिओ ब्रांडची, सगळं कसं साधं पण कमालीचं स्वच्ह, हे मुद्दामून सांगतो कारण रोम मध्ये येण्याच्या आधी रोम खूप घाण आहे वगैरे ऐकलेलं, आणि रोम मध्ये कचरा संबंधी बातम्याही ऐकलेल्या, तसा काही अनुभाव आला नाही, निदान त्या दिवशी तरी! चालत चालत आम्ही कलोजीअ (Colosseum) च्या जवळ गेलो, प्रत्यक्षात जेव्हा ती ईमारत पाहिली तेव्हा विश्वासच बसे ना, पर्यटक, स्थानिक लोक, ठिकठीकाणी बियर-स्नैक्स च्या हातगाड्या हे सर्व पाहण्यात आमचा तासभर कसा गेला काळालं सुद्धा नाही! दुसऱ्या दिवशीची कलोजीअम ची तिकिट्स, होप-न-होप-ऑफ बसची तिकिट्स आणि रोमा मेट्रो पास ह्या तिघांची तिकीटं हातात घेऊन पुढील २ दिवसांची काळजी मिटवली!
२३ मार्च २०११ च्या दिवसभराची विमानतळ धावपळ, मग रोम मधली पायकुदळ संपवून आम्ही हॉटेलात आलो परत, आता खरी-खुरी युरोप टूर येणार होती २४मार्च २०११ पासून आता भेटू उद्या म्हणजेच २४मार्च २०११ला :) भाग ४ मध्ये!
#साशुश्रीके । ०८ एप्रिल २०१५
waiting for Part 4..........
ReplyDelete