Posts

Showing posts with the label advertising

जाने कहा गए वो दिन!

Image
मुंबईत XXX ओफिस मध्ये एकदा क्लाएंट कडे काम पाठवलं आणि दुसरी काही गडबड नसेल किंवा लन्च टाइम ला आम्ही रँडम नंबर ला कॉल करून काहीही बडबडायचो, एकदा मी असाच एक कॉल लावला, टीपी सुरु झाला, आज काही जमत नव्हतं, म्हणजे रोजच्या सारखी मजा येईना, आमच्या टोळीमधला एक कलीग म्हणाला, चल हो बाजूला मला करुदे आता कॉल! त्याने लावला कॉल (त्यावेळी डिरेक्ट्री असे, त्यामुळे ज्याला फोन लावायचा असेल त्याचं नाव घेतलं की अर्ध काम फत्ते) फोन उचलल्यावर तो म्हणाला Mr कदमजी है, उनसे एक अर्जंट बात करनी है... समोरच्या व्यक्तीने... "सर आपके किये कॉल है" वगैरे सुरु झालं, आणि मग झाला टाईमपास सुरु, "आपने दिये हुए पैसे खतम हो गये सर" अशी काहीही बडबड सुरु झाली हे सगळं संभाषण जवळजवळ ८-१० मिनिट चालू होतं, शेवटी त्या Mr. कदमला ही कळालं असावं की समोरचा टाइम पास करतोय, कारण माझा मित्र इतका सुटलेला की त्याला अधून मधून हसणं कंट्रोल होत नव्हतं, त्यामुळे तो Mr कदम ही मित्राला मस्त उत्तरं द्यायला लागला, शेवटी मित्राचाच पेशन्स संपला, त्याला काळालं की हा आपल्या पेक्षा कलंदर दिसतोय! फुल्ल इम्प्रेस झाला ...

'तुला ग्राफिक डिजाइनर व्हायचंय? परत विचार कर...'

ईंटर्नशिप साठी आलेली काल एक सुबक ठेंगणी, तिला आल्या आल्याच आमच्या वीरांनी घाबरवायला सुरुवात केली, तिला मुद्दामून विचारलं 'तुला ग्राफिक डिजाइनर व्हायचंय? परत विचार कर...' तिचा चेहरा पाहण्या सारखा झालेला! 🤢 अजून २-३ किस्से झाले असेच दिवसभरात, शेवटी संध्याकाळी ५-५३० दरम्यान माझ्याकडे आलेला वर्कलोड ला वैतागुन मी बोललो WTF... मोर शीट, सेम सैलेरी यो! 😁 आज १० वाजता येणार होती... आलीच नाही! आम्हा सर्वाना फार वाईट वाटलं... एखाद्याचं करियर चालू होण्याच्या आधीच आपण संपवलं की काय??? 😳 पण आली विचारी ११ वाजता, कालच्या पेक्षा जरा जास्तच गंभीर! असो... भविष्यात पुढे काय काय पाहायला मिळेल तरी दाखवला आम्ही, शेवटी कोण सुखी असतं, आपण सगळे तसेही आपापल्या जॉबला शिव्या घालताच असतोच! सत्यपरिस्थितीशी लवकरात लवकर हस्तांदोलन केलेले कधी ही उत्तम! 😆😆😆 #सशुश्रीके | २१ मार्च २०१७

सगळे व्हाट्सअप वर व्यस्त…

Image
"घ्या कादंबरी मस्त पहा तरी हातात घेऊन सगळे व्हाट्सअप वर व्यस्त…" आणि पुढे बरच काही सांगत होता आणि विकत होता एक 'राज ठाकरे' सारखा दिसणारा माणूस, मी नेमका मोबाइलवरच होतो तेव्हा, संध्याकाळची ट्रेन होती, पुणे-मुंबई. त्याचं ते 'Advertising' ऐकून खूप लोकांचे कान त्याने आकर्षले असणार ह्यात वाद नाही, आईने त्याला हात केला, नेमाडेंचा 'हिंदू' पासून इनामदारांच 'राउ' अशी १०-१२ पुस्तकांना कडेवर घेऊन लोकांना तो आवाहन करत होता… "पहा तरी हातात घेऊन… पैसे नाही हो पडत बघायला! घ्या घ्या… वाचन वाढवा!" आईने 'राउ' घेतलं हातात, मी म्हणालो आईला हळूच "आई हे ओरिजिनल नाहीये…" आणि हेच त्याला ही सांगितलं, तो म्हणाला अहो हेच आहे ओरिजिनल, झेरोक्स वालं पण असतं! पण सध्या नाहीये माझ्याकडे!" मी किंमत विचारली, "अडीचशे फक्त!" मी मनात विचार केला की आता काय ह्याचाशी हुज्जत घालून उपयोग! ह्या प्रिंटींगच्या क्षेत्रात्लाच मी, मला काय हा अम्जाउन सांगतोय! पण असो… आईने भाव करण्याचा प्रयत्न केला, तेवढ्यात मी अडीचशे त्याला देऊ केले. ...

#सशुश्रीके (वैतागलेला कल्पनाशक्ती कर्मचारी)

क्रिएटिविटी म्हणे! कसली क्रीएटीवीटी चामारी!? आम्ही रोज तेच करत असतो... आमचं कामच ते! जाहिरात क्षेत्रात ना आम्ही, मनापासून करतो काम आणि आमचा ग्राहक (client) अगदी मनापासून त्याची पु...

एडवरटाइजिंग...

एडवरटाइजिंग... ह्या क्षेत्रात आम्ही धादांत खोटं बोलतो! पापाचा घडा भरत नाही...  आणि कधी फूटत ही नाही,  आणि * असतोच कोणी अंगावर धाउन आले की,  शर्ते लागू* दिवसभर बिडया व्हाट्सअप चहा नी मीटिंगा करून  आमचा खरा खुरा कार्यसंचय सुरु होतो संध्याकाळी,  मग क्लाइंट्सना शिव्या गाळ करत काम सुरु...  कधी आईडियाच बदल कधी मजकूरबदल...  कधी आकारच बदल...  आणि लोगो मोठे करण्याचा कॉन्ट्रैक्ट घेतले आहे वीनाशर्त! ग्लामरयुक्त क्लाइंटसर्विसिंग तंग कपडे घालून क्लाएंट फीडबैक घेऊन अश्या येतात जणू काही नैवेद्य! झालेले काम आवडले आहे -पण-  हा -पण- सूर्यापेक्षाही तेजस्वी असतो.. आम्हाला सेकंदात आंधळं किव्वा ब्रम्हांड दर्शन घडवतो,  दिवसाची, आठवड्याची कधी कधी महीनाभराची मेहनत अगदी क्षणात भस्म होते! मग परत शिव्या शाप देत बैल जुमपतात केबोर्ड अणि मोउस/पेन घेऊन! पण हा व्यवसाय आहे...  पोट्या पाण्यासाठी कराव लागतं हो!  लोकं दरोडे घालतात खून करतात...  आम्ही ही करतो पण लोकांच्या खिश्यात जाऊन. मग त्यांच्या पोटात जाऊ...