एडवरटाइजिंग...




एडवरटाइजिंग...

ह्या क्षेत्रात आम्ही धादांत खोटं बोलतो!
पापाचा घडा भरत नाही... 
आणि कधी फूटत ही नाही, 
आणि * असतोच कोणी अंगावर धाउन आले की, 
शर्ते लागू*
दिवसभर बिडया व्हाट्सअप चहा नी मीटिंगा करून 
आमचा खरा खुरा कार्यसंचय सुरु होतो संध्याकाळी, 
मग क्लाइंट्सना शिव्या गाळ करत काम सुरु... 
कधी आईडियाच बदल कधी मजकूरबदल... 
कधी आकारच बदल... 
आणि लोगो मोठे करण्याचा कॉन्ट्रैक्ट घेतले आहे वीनाशर्त!

ग्लामरयुक्त क्लाइंटसर्विसिंग तंग कपडे घालून क्लाएंट फीडबैक घेऊन अश्या येतात जणू काही नैवेद्य! झालेले काम आवडले आहे -पण- 
हा -पण- सूर्यापेक्षाही तेजस्वी असतो..
आम्हाला सेकंदात आंधळं किव्वा ब्रम्हांड दर्शन घडवतो, 
दिवसाची, आठवड्याची कधी कधी महीनाभराची मेहनत अगदी क्षणात भस्म होते!
मग परत शिव्या शाप देत बैल जुमपतात केबोर्ड अणि मोउस/पेन घेऊन!
पण हा व्यवसाय आहे... 
पोट्या पाण्यासाठी कराव लागतं हो! 

लोकं दरोडे घालतात खून करतात... 
आम्ही ही करतो पण लोकांच्या खिश्यात जाऊन.
मग त्यांच्या पोटात जाऊन... डोक्यात जाऊन!
क्रिकेट असो, धर्म असो, निवडणुका असोत...
सगळे आमच्या कुबड्या वापरतात, 
आमच्या मुळे सर्व आहे... प्रत्यक्ष अप्रत्यक्ष!
ह्यात काहीच अतीशायोक्ती नाही.

असो...
मी अपराधी आहे
आणि शिक्षा म्हणून पगार घेतो.

#‎सशुश्रीके‬ | ३ डीसेंबर २०१४ रात्रीचे १

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!