Posts

Showing posts with the label dream

लघुव्यथा

Image
बॉर्डर पार करून आम्ही आता हवे तिथे नको त्यावेळी आलेलो, गोळ्या संपत चालल्या असतानाही रिस्क घेऊन आणि नशीबाला बोलवत, आयुष्यात कमावलेली सर्व हिम्मत हातात गोळा करून मी पुढे लोळत लोळत सरकत होतो, आजूबाजूला शत्रू कुठूनही मला टिपू शकतो आणि मी त्यांना...   अंधार, शेत त्यात अमावस्या, रातकिडे, बेडकं, पाऊस चिखल आणि काळेभोर आकाश ह्यासर्वात एक धपाटा बसला माझी तंद्री लागलेली बहुतेक... आईचा आवाज पाठीमागून, अरे बसलायस काय नुसता ताटातले संपव, परत काही हवं असेल तर सांग मी अंगणात तांदूळ निवडायला जात आहे... ताट पाहिलं तर पूर्ण संपलेलं, प्रचंड झोप येत होती. आयुष्यात पहिल्यांदाच भर दुपारी मस्त पडी मारली. अचानक भूकंप आल्यासारखं वाटलं... घाबरायच्या ऐवजी 'काय कटकट आहे' असा विचार करत करत... आता मात्र फटाक्यांच्या आवाजाने जाग आली... "दुपारी कसले फटाके!" प्रयन्त केला डोळे उघडण्याचा... सर्व आवाज बंद झाले... आवाज येत होता तो आमच्या रेजिमेंट प्रमुख साहेबांचा,  माझ्यानावाने भाषण देत होते... मग लक्षात आलं एम नो मोर. जय हिंद. #सशुश्रीके 

रेड बस, मोठी! (अन्वया उवाच)

Image
रेड बस, मोठी! (अन्वया उवाच) शुक्रवार सकाळ (अरब देशातला रविवार) , मस्त आरामात उठलो आम्ही सर्वच! मी चहा करत होतो, तेव्हढ्यात अन्वयाचा आवाज आला बेडरूम मधून, 'आई, आई'… मी गेलो अन्वयाला घ्यायला, सकाळी सकाळी तिला ५-६मिनिटे कडेवर ठेवावं लागतं, जोपेत असतं ना ध्यान! मग तिला देव्हार्याच्या उंच टेबलावर किंवा ओट्यावर बसवून 'मम' करत आम्ही चहा करतो! (मम म्हणजे आपण पूजेत बायकोला करायला लावतो न तसलं मम, म्हणजे चहा तीनेही केल्याचे तीला आणि मलाही समाधान!) असो, तर मी कुठे होतो… हा तर अन्वयानी सुरुवात केली बडबडायला अन्वया - मी बस मध्ये बसलेले, तू पण होतास आई पण होती! मी - कुठली बस? अन्वया - रेड बस, मोठी! (मी मनातल्यामनात विचार करत होतो कुठल्या बस बद्दल बोलत आहे ही!?) अन्वया - रेड बस, मोठी! त्याला मोठे डोर्स पण होते! मी - ओह्हो, तुला स्वप्न पडलय का मनी? ते ड्रीम असेल ग्ग! अन्वया - (डोळे लहान-मोठे, भुवया उंचावत) ड्रीम? मी - हो, तुला ड्रीम मध्ये दिसली असणार बस! रेड बिग बस… राईट! अन्वया - (डोळे लहान-मोठे, भुवया उंचावत) हो! अजून २-३ मिनीटे सख...

यूनिक प्रदीप येरागी.

Image
यूनिक प्रदीप येरागी. ह्याला पहिल्यांदा २००६ ला भेटलेलो, मुंबईत कामाला होतो तेव्हा, तशी बऱ्यापैकी मोठी होती एजेंसी त्यामुळे ४-५ क्रिएटिव ग्रुप्स होते त्यातल्या एका ग्रुप मध्ये तो ज्वाइन झालेला. प्रोफेशनली इतका काही जास्त संबंध नाही आला, आणि तो ज्वॉइन झाल्यावर मी सोडला जॉब ७-८ महिन्यातच, असो... पण महत्वाचं काय, त्या कालावधीतही छोट्या छोट्या किस्यांमुळे तो लक्षात राहिला...जॉब सोडून नंतरच्या काळात ही खुप धमाल केली, एकंदरीतच खुप अवली होता! जास्त न वाढु देण्या इटपत केशरचना, ५-१०% पांढरी झालेली 2mm दाढी, आणि पिळदार मिश्या... मध्येच कुडते वगैरे घालून यायचा, फेटा काय बांधायचा! मस्त दाणेदार नाना टाइप आवाज आणि वन-लाइनर जोक्स मारण्यात जाम पटाइत! बोलताना तंद्री लागल्यासरखा मिशीला पिळ देत सीरियस टोन मध्ये बोलायचा आणि हळूच मध्ये एक जोक सोडायचा, मग समोरचा हसला नाही तर मी नाव बदलेन! इतका विरोधाभास, असा येरागी. बुलेट, यझदी चालवणारा, जुन्या गोष्टींवर भयंकर जीव असणारा, आम्ही मित्र मंडळी तर त्याला रेट्रो/व्हिंटेज मैन म्हणायचो! मुंबईत जॉबला होतो तेव्हा इतका भेटलो नाही जितका नंतर, दूबईतुन मुम्बई-पुण्...

आंबा आइसक्रीम

Image
आंबा आइसक्रीम कोणाचं तरी लग्न होतं, अक्षता, मंगलाष्टकं रडारडी वगैरे सगळ झालं, मी पकलेलो... १ल्या पंक्तीत बसलो... उन्हाळ्याचे दीवस होते, आइसक्रीम खायचं होतं मला, मस्त जेवण झालं... आइसक्रीम स्टॉल कडे जात होतो तितक्यात एक काका काकू लगबगीने आले माझ्या पुढे... मी थांबलो, आंबा फ्लेवरचा शेवटचा स्कूप त्या काकुने घेतला, मी स्टॉल वर इतर फ्लेवर्सकडे पहात बसलो, कुठलाच आवडेना, मग काय पिस्ता का कायतरी घेतला, त्या बाईकडे शेवटचा चमचा चाखे पर्यंत लक्ष होतं, तिचा तो स्कूप संपला, ती बाई परत स्टॉल कडे, बघतो तर काय, तिच्या हातात परत आंबा फ्लेवर आईसक्रीम! मी जरा रागानीच त्या स्टॉलवाल्या कडे गेलो... त्यानी मला बघता क्षणीच काहीतरी लपवलं! मी म्हणालो "मला हवाय आंबा आइस क्रीम" तो म्हणाला "संपलय" मी म्हणालो "तू लापवलयस" तेवढ्यात किचन मधून अमृताचा आवाज आला, समीर समीर लवकर उठ… अन्वयाला शाळेत जायला उशीर होतोय रे! आंबा आइसक्रीम काही मिळालं नाही. #सशुश्रीके