यूनिक प्रदीप येरागी.

यूनिक प्रदीप येरागी.

ह्याला पहिल्यांदा २००६ ला भेटलेलो, मुंबईत कामाला होतो तेव्हा, तशी बऱ्यापैकी मोठी होती एजेंसी त्यामुळे ४-५ क्रिएटिव ग्रुप्स होते त्यातल्या एका ग्रुप मध्ये तो ज्वाइन झालेला. प्रोफेशनली इतका काही जास्त संबंध नाही आला, आणि तो ज्वॉइन झाल्यावर मी सोडला जॉब ७-८ महिन्यातच, असो... पण महत्वाचं काय, त्या कालावधीतही छोट्या छोट्या किस्यांमुळे तो लक्षात राहिला...जॉब सोडून नंतरच्या काळात ही खुप धमाल केली, एकंदरीतच खुप अवली होता!

जास्त न वाढु देण्या इटपत केशरचना, ५-१०% पांढरी झालेली 2mm दाढी, आणि पिळदार मिश्या... मध्येच कुडते वगैरे घालून यायचा, फेटा काय बांधायचा! मस्त दाणेदार नाना टाइप आवाज आणि वन-लाइनर जोक्स मारण्यात जाम पटाइत! बोलताना तंद्री लागल्यासरखा मिशीला पिळ देत सीरियस टोन मध्ये बोलायचा आणि हळूच मध्ये एक जोक सोडायचा, मग समोरचा हसला नाही तर मी नाव बदलेन! इतका विरोधाभास, असा येरागी. बुलेट, यझदी चालवणारा, जुन्या गोष्टींवर भयंकर जीव असणारा, आम्ही मित्र मंडळी तर त्याला रेट्रो/व्हिंटेज मैन म्हणायचो!

मुंबईत जॉबला होतो तेव्हा इतका भेटलो नाही जितका नंतर, दूबईतुन मुम्बई-पुण्याला यायचो तेव्हा नक्की भेट व्हायची, आम्ही मित्र मंडळी मुम्बईला त्याच्या घरी जमलेलो, दंगा केलेला टेर्रेस वरती, तो ही यायचा पुण्याला ख़ास मला भेटायला, तेव्ह्हाचा एक व्हिडिओ टाकतो, एक लिंक जोडतोय. "Monkey eating apple on mango tree!" on YouTube - https://youtu.be/y4lSzaScYok ही लिंक पहा, ह्यात साहेब एक टुकार जोक मारतायत, पण त्याच्या सांगण्याच्या स्टाइल मध्ये जे काय हसू येतय! बस रे बस ( ज्यांना लिंक बाघणे शक्य नाही त्यांसाठी... एक बन्दर है ना एक बार एक आम के झाड़ पे चढ़ रहा होता है... तो एक गधा उसको पूछता है की तू आम के झाड पे क्यू चढ रहा है!? तो बन्दर बोलता है एप्पल खाने जा रहा हु! तो गधा बोलता है की 'पर ये तो आम का झाड है ना!?' तो बन्दर बोलता है... 'हां, पर एप्पल लेके जा रहा हु!' )

त्याच वेळचा अजुन एक किस्सा... दुबैतून पुण्याला महिनाभरच्या सुट्टी साठी आलेलो, मित्रांना म्हणालो तुम्हीच या ईथे सांगवीला, मी मुंबईत येण्यापेक्षा... पुणे पण फिरू, मजा येईल. निशांत, गौतम, संतोष, सुशांत आणि हा प्रदीप असे सर्व आले, इनोवा बुक केलेली बहुतेक, प्रदीप चा फोन आला, की अमुक अमुक ठिकाणी आलेलो आहोत तिथून पुढचा रस्ता सांग! मी म्हणालो की 'अमुक चौकात ये आणि फोन टाक' नंतर कळालं ह्यानी तिथे चौकात आल्यावर खरच फोन टाकला आणि मला फोन करून विचारतो! 'आता पुढे कसं यायचं!?' आता बोला... हसून हसून वेडा व्हायची पाळी आलेली इतके हसलो त्यादिवशी!

एक जूना किस्सा विसरलो... बैक टू मुम्बई डेज, गोव्या मध्ये गोआफेस्ट नावाचा एडवरटाइजिंग अवार्ड्स फेस्टिवल असतो, तिथे आम्ही गेलेलो, स्कूटर्स / बाइक्स वगैरे भाड्यानी मिळतात तिथे, पण नेमक्या सर्व बुक्ड् होत्या, मैन वेन्यू ते आमची राहायचे होटेल बर्या पैकी लांब होते, पण चालत जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता, त्यात उन्हाळा, आमची पायतोड आणि अखंड बडबड चालू होती, आणि एक टाइम पास सुरु केला... लुक ऐट धीस ग्रास ईट इज सो ग्रीन, एंड धीस स्काय, सो यूनिक! रासत्यावर चालताना आजुबाजुला जे दीसेल त्याबदल बेसिक इंग्लिश च्या सहाय्याने बडबड करून वाक्याच्या शेवटी 'सो यूनिक' जोडून १तास आम्ही चालत होतो! त्या दिवशी नंतर जेव्हा जेव्हा आम्ही एकमेकांना फोन केलाय तेव्हा फोनच्या वार्तालाभाची सुरुवार 'हैल्लो माय यूनिक फ्रेंड' ने होते!

ह्या माणसाकडे जुन्या गोष्टींची ईतकी समृद्धता आहे कि विचारूच नका! त्याच्या ह्याच 'विंटेज' वस्तू प्रेमामुळे मी त्याला एक ट्वीन लेन्स क्यामेरा दीला, माझ्या वडलांकडे २ होते, त्यातला एक त्याला देऊ केला, काय खुश झालेले साहेब!

अजून एक सोलिड 'युनिक' प्रकार म्हणजे त्याचे घर! घरी वापरण्यासाठी काही गोष्टी ज्या त्याला मिळाल्या नाहीत त्या त्यांनी बनवून घेतल्यात! म्हणजे जुन्या पद्धतीचा पलंग वगैरे! त्याच्याकडे एक सिंगरचे तुटलेले मशीन आहे, त्यात वरचा मेन भाग (मशीन) काढून त्याचा वापर तो कॉम्पुटर टेबल सारखा करतो, घरात जुन्या गोष्टींचा नुसता कचरा आहे, नाही नाही कचरा नाही 'खजिना' म्हणुयात आपण! आणि पार्किंग मध्ये एक जुनी डूक्कर फ़िआट ही आहे, एके दिवशी त्याच्याकडे सर्व भेटलेलो आम्ही, रात्री बाहेर जेऊन वगैरे परत येताना म्हणाला मी चालवतो थांब, मी बाजूला झालो… हा बसला ड्राय्व्हर सीट वर, त्याच्याकडे लायसन्स नाही म्हणून जाताना चालवली नसेल असे मला वाटले, पण जेव्हा तो गाडी चालवायला लागला तेव्हा मला शंका आली, मी लगेच विचारले 'तुला गाडी चालवता येते का?', तो म्हणाला 'हो', मी लगेच पुढचा प्रश्न काही वेळ न घालवता, 'किती वेळा चालवली आहेस ह्या आधी!?' प्रदीप म्हणाला… 'ही काय आत्ता पहिल्यांदाच…' आणि हे वाक्य पूर्ण होण्या आधी गाडी उजव्या बाजूच्या रस्त्यावरचा झाडाला आपटली! मी त्याच्याकडे पाहिले, तो हसत होता, मग मी ही हसायला लागलो! कारण दुसरा पर्यायच नव्हता! पण नंतर मात्र चिंताग्रस्त चेहरा त्याला लपवता आला नाही! कारण डागदुजीचे पैसे त्याला खर्च करायला लागणार होते, हा असला आहे यूनिक प्रदीप येरागी.

३-४ वर्षांपूर्वी एकदा मान्सून मध्ये आलो होतो भारतात तेव्हा सुला नावाची वाइन आणली होती, मुळशीला गेलेलो, चुलीवारची भरली वांगी आणि भाकर्यांचा मनसोक्त आनंद घेऊन संध्याकळी पुण्यातल्या पेठा फिरलो! एक उनाड दिवस काय असतो ते तेव्हा कळालं! संध्याकाळी जुन्या बाजारात चक्कर टाकली, जुने फोन, नाणी, हत्यारं, गोग्ग्ल्स काय काय पहात होता तो, मजा आली… त्याच्या सारखे मित्र असणे म्हणजे भाग्याच! केवळ माझ्यासाठी वेळात वेळ काढून दर वर्षी भेटायला येतो, हल्ली ह्यासारखी दुसरी भेट मिळणे अशक्य, केवळ अशक्य

४-५ वर्षांपूर्वी ह्या साहेबांचे लग्न झाले, मुंबईच्याच आमच्या ऑफिस मधली एक मुलगी, तिला पटवलीन ह्यानी, आता त्याला एक छान २ वर्षाची कन्या आहे, तिला घेउन मध्ये उत्तर भारतातही गेला होता, ऐकून आश्चर्य+गम्मत वाटली! बाकी मुल झाले की प्रायोरीटीज बदलतात, त्यामुळे गेले २ वर्ष भेट झालेली नाही, सध्या व्हात्साप वरून बडबड चालू असते, ३-४ महिन्यांनी भारत दौरा आहे, तेव्हा भेट होईल!

प्रदीप यु आर युनिक ईंडीड!
सी यू सून...

#सशुश्रीके। १८ जून २०१५ दुपारचे १.३९


















Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!