Posts

Showing posts with the label friend

'सीरीयस विदुषक'

Image
'सीरीयस विदुषक' आहे माझ्याच वयाचा पण अजून लग्न नाही झालं हो! काय सांगू, जरा बघा जमलं तर, लेखाच्या शेवटी फोटो पाठवत आहेच! असो, घाटावर… घाटावर, म्हणजे आपलं ओमकारेश्वर मंदिरामागचा परिसर, मित्रां बरोबर चहा-बीडी मारायला भेटातात तिथे एकदा ओळख झाली ह्या सीरीयस विदुषकाशी! आता तुम्ही म्हणाल 'सीरीयस विदुषक' म्हणजे काय प्रकार ब्वा! सांगतो सांगतो!…त्याचं अधिकृत नाव - तुषार ढेरे! तर हा मनुष्य जेव्हा जेव्हा भेटला, तेव्हा तेव्हा किस्से सांगायचा पण अगदी गंभीर चेहर्‍याने, मग किस्सा संपता संपता आम्ही हसायला लागलो की म्हणायचा अरे अजून संपला नाहीये किस्सा! मग आम्हाला अजून हसू येई, म्हणून मी तर त्याला बघितलं की च हसायला लागलोय! हसायला लागलोय, म्हणजे हसायला येतंच मला त्याचा चेहरा बघीतला की! अखंड केसांत हात टाकून सेट करत असतो मागे टाकत असतो पुढे आलेल्या केसांना, अर्थात ज्यांकडे जी गोष्ट कमी त्याकडे लक्ष्य जास्त म्हणून माझं लक्ष त्याच्या हात+केसांच्या हालचालीकडे जास्त जात असेल म्हणा! हेल्मेट काढून घाटावर जैकी श्रोफ्फ आलाय आणि स्लो मोशन मध्ये डोकं हलवतोय, अरे हा तर आमचा तुषार असला काय तरी प्...

धनंजय माने...

Image
धनंजय माने... होय त्याचं नाव मी 'धनंजय माने'नावानी सेव केलय मोबाइल मध्ये, खरं नाव धनंजय गोखले. मुळचा नाशिकचा, गुटगुटीत बांधा, मध्यम ऊंची, वरची सपाट धावपट्टी (टक्कल), घामाचा कारखाना असलेला... आमचा गोखल्या! वरून कितीही नारळ, फणस, कलिंगड़ दिसत असला तरी 'काट के देखो साब... अंदर से मीठा है... पैसा वसूल है साब... एक बार ट्राय कर के तो देखो!' असा प्रकार! ह्याची माझी ओळख झाली जयंत विध्वंस यांच्या कडून, त्यांच्या बद्दल नंतर सांगतो, बेसिकली जयांता म्हणाले... की एक दोस्त आहे आपला, दुबैतच असतो, हा घे नंबर, जमलं तर भेटा! 'जमलं तर!' वगैरे... अशी वाक्य म्हणजे अपमान माझा! आपल्याला भेटायला आवडतं, एक मेंदू... ह्रदय... आणि त्यात मित्राचा मित्र म्हणालं की संपला विषय! थेट-भेट-ग्रेट-भेट कामाच्या व्यापानी कधी उशिरा कधी अती उशिरा पण... सोडत नाय कोणाला. मिलेंगा मतलब मीलेंगाइच!!! पूर्वी ऍफ़बी आता व्हाट्सऐप्प... भेटलो माझ्या घरा खालीच! म्हणालो वेळ असेल तर ये वरच.. त्या दिवसापसुन आज पर्यंत सेम डायलॉग! "जवळच आहे तुझ्या घराच्या... काय आणु का... वडापाव वगैरे!?" की मग ...

यूनिक प्रदीप येरागी.

Image
यूनिक प्रदीप येरागी. ह्याला पहिल्यांदा २००६ ला भेटलेलो, मुंबईत कामाला होतो तेव्हा, तशी बऱ्यापैकी मोठी होती एजेंसी त्यामुळे ४-५ क्रिएटिव ग्रुप्स होते त्यातल्या एका ग्रुप मध्ये तो ज्वाइन झालेला. प्रोफेशनली इतका काही जास्त संबंध नाही आला, आणि तो ज्वॉइन झाल्यावर मी सोडला जॉब ७-८ महिन्यातच, असो... पण महत्वाचं काय, त्या कालावधीतही छोट्या छोट्या किस्यांमुळे तो लक्षात राहिला...जॉब सोडून नंतरच्या काळात ही खुप धमाल केली, एकंदरीतच खुप अवली होता! जास्त न वाढु देण्या इटपत केशरचना, ५-१०% पांढरी झालेली 2mm दाढी, आणि पिळदार मिश्या... मध्येच कुडते वगैरे घालून यायचा, फेटा काय बांधायचा! मस्त दाणेदार नाना टाइप आवाज आणि वन-लाइनर जोक्स मारण्यात जाम पटाइत! बोलताना तंद्री लागल्यासरखा मिशीला पिळ देत सीरियस टोन मध्ये बोलायचा आणि हळूच मध्ये एक जोक सोडायचा, मग समोरचा हसला नाही तर मी नाव बदलेन! इतका विरोधाभास, असा येरागी. बुलेट, यझदी चालवणारा, जुन्या गोष्टींवर भयंकर जीव असणारा, आम्ही मित्र मंडळी तर त्याला रेट्रो/व्हिंटेज मैन म्हणायचो! मुंबईत जॉबला होतो तेव्हा इतका भेटलो नाही जितका नंतर, दूबईतुन मुम्बई-पुण्...

सदा...नंद

Image
॥श्री॥ सदा...नंद मुळचा देवरुखचा, माझी त्याची ओळख झाली भारती विद्यापीठला असताना, ज्यांना फौंडेशनला अभिनव कालामहाविद्याला मिळाला नाही दाखला, त्यांनी त्यांच्या त्यांच्या आई-वडलांनी कष्टानी कमावलेल्या १०-२०हजारची फोडणी देऊन घेतला दाखला… त्यातलेच आम्ही देघे ही! कॉलेजचे पहिलेच वर्ष… नवीन मीत्र, नवीन शिक्षक, सगळच नवीन, पण आम्ही छान मित्र झालो लवकरच, तेव्हा तो रहायचा त्यांच्या मासाजींकडे, घरी मावशी… आणि मासाजी, जुना वाडा होता आणि त्याचं घर रत्नागिरीत, देवरूख… तिथे आई आणि लहान भाऊ… गजा म्हणायचा तो भावाला. घरी शेती वगैरे. आंबा नारळ... वगैरे अगदी टीपीकल रत्नागिरी प्रकार. असो, सदा गायचा सही! (अजून ही गातो म्हणा)… जरासा उदित नारायण टाईप चेहरा होतो त्याचा गाताना, आणि हसताना पण तसाच, हाव-भाव, ऊंची ही… पण किशोर कुमारची गाणी गायचा… मस्त वाटायचं! त्याची प्यांन्ट नेहमी बेंबीच्या वर असायची, जाम चिडवायचो ह्यावरून त्याला! फोटो काढून घेताना बत्तीशी अशी दाखवायचा की जणू कॉल्गेट च्या जाहिरातीची रंगीत तालीम वगैरेच करतोय, आणि शिव्या तर काय… पक्क्या कोकणातल्या, *बाझवलान, काय सांगतोस काय मेल्या!* असला परफे...

'विनायक म्हणे... जय कठोर परिश्रम'

Image
'विनायक म्हणे... जय कठोर परिश्रम' प्रत्येक माणसात मी स्वतःला शोधतो कधी कोणी १०% कोणी ७०%. कायना कायतरी जूळतच... शेवटी काय इतरांना ज्यानी घडवलं त्यानीच मला पण ना! पण ह्याचा ज्यानी घडवलं 'त्या' वर विश्वास नाही, नास्तिक म्हणतो ना आपण तोच प्रकार, (आपण म्हणजे आस्तिकांच्या बाजुनी लिहितोय असं समाजा) पण 'जय कठोर परिश्रम' अशी व्याख्या देतो तो... 'घरच्यांसाठी' नव्या घरी सत्यनारायण पूजा पण करतो... म्हणजे तुमच्या साठी असेल बुआ... माझ्यासाठी 'कठोर परिश्रम'च भारी! आणि फोन लावला किंवा आला त्याचा तर पहिला शब्द 'हैल्लो' नसतो...'जय कठोर परिश्रम'नी सुरुवात होते संभाशणाला! असा हा 'विनायक' कामत. वयोमानाच्या मानाने १०वर्ष आधीच पीकलेला... म्हणजे... केस पीकलेला! ६५%केस अक्षरशः पांढरे चेहऱ्यावर एक कायमचं हास्य चीकटवलेला... खळी का काय ते... ती पण पडते, ओव्हरऑल छान दीसतो. प्लस बायको लै स्मार्ट... मॉडल टाइप्स! मस्तच जोडी. दोघे भेटायला आलेले अन्वया १वर्षाची असताना, १सोडून २गिफ्ट्स आणलेले...का तर म्हणे कंफ्यूज झाला! पण ते सांगायला तयार नाही..श...

निखिल वसंत पोलजी.

निखिल आनंद, आनंद हे आडनाव नाही हो... पदवी दिल्ये मी... त्याचं खरं पूर्ण नाव... निखिल वसंत पोलजी. निखळ आनंद देणारा असा... निखिल आनंद! साधारण ४महिन्यापूर्वी फ्रेंड रेकवेस्ट आली म्यूच्यूअल फ्रेन्ड्स मध्ये आर्ट पब्लिक प्रोफाइल चेक केलं... गडी उत्तम क्यारीकेचरिस्ट! फेबु चैट मग व्हत्सप्प कधी न भेटलेलो पण अगदी जन्म जन्मांतराची ओळख असल्या सारखं सुख दुःखाची रेलचेल... माझ्यासरखाच् थोडं पोट सुटलेला, थोडं टक्कल आलेला... सचिनचा भक्त... गाडी वेडा, वर गातोही! उत्तम मिमिक्री... आता काय राहिलय अजुन करायचं! मध्ये त्यानी एकदा माझं क्यारीकैचर केलेलं.. फेबुवर किमान दीडशे लाइक्स! जवळपास महिनाभर प्रोफाइलपिक ठेवलेला मी!... आणि 3D स्केचेस, हस्तकला आणि बरच काही करत असतो लेकाचा... + गाड्या पण जमावतो ना हां माझ्यासरखा! गाड्या तर माझा वीक पॉइंट... बिछड़े भाई वगैरे झाल्यासरखा फील बे! २महिन्या पूर्वी अचानक मी पुण्यात चक्कर मारली त्याला आदल्या दिवशी सांगितलं... गडी आला ना भेटायला वीकेंडपे! सन्डे मार्निंग फ्रेंडके साथ सह्येब इन माय होम! विथ गिफ्ट्स एंड ऑल! मला बायकोला न अन्वयाला पण, त्याल...