Posts

Showing posts with the label italy

यूरोप...

Image
॥श्री॥ यूरोप भाग-१ ४ वर्षापूर्वी यूरोप ट्रिप केलेली... तेव्हा लिहायची सवय नव्हती जी आत्ताच ६-७ महिन्यात लागल्ये, आता खंत वाटते! तेव्हाच जर त्या आठवणी लिहिल्या असत्या तर मस्त बारकावे मांडता आले असते! आधीच माझा नावांचा गोंधळ भलतच नाव सांगतो पत्ता वेगळाच! असो... छान झालेली ट्रिप! खुप छान... काही वाइट अनुभव, एकूणच शेंगदाण्याच्या पूड़ीसारखं, एखादा खवट दाणा येतो म्हणजे येतोच! असो... मला लहानपणापासून पॅरिसला भेट द्यायची खुप इच्छा होती... वडील त्यांच्या तरुणवयात गेलेले, त्यावेळचे फोटो ते तपकीरी कलरचे खरे खुरे इंस्टाग्राम-विंटेजवाले फोटोज पाहुन पाहुन जाम आकर्षण निर्माण झाले... विशेष करून आइफल टॉवर! आणि एकूणच पॅरीस शाहराच्याच प्रेमात पडलेलो... पण मग फक्त पॅरिस का!? ९दिवसात लगेहाथ बाकीच्या आजुबाजूच्या शाहरांमध्ये पण डोकवु... ट्रेवलिंग एजेंट, गूगल, तिथे गेलेले मित्र आणि सर्वात महत्वाची-बायको ह्या सर्वांच्या मदती ने एक आराखडा तयार झाला यूरोप टूरचा... होटेल बुकिंग, फ्लाइट/ट्रेन बुकिंग आणि ज्या ज्या शहरात जातोय तिथल्या रांगा टाळण्या साठी ऑनलाइन बुकिंग... हे सर्व हातात आल्यावर ...