Posts

Showing posts with the label marathibog

"चख ले ये मुरब्बा"

Image
"चख ले ये मुरब्बा" हे गाणं आणि अमित त्रिवेदी हा खरच एक 'मुरब्बा' आहे 👍👌 आज शफल वर गाणी ऐकत होतो, आणि मुरब्बाचं डूएट व्हर्जन लागलं, लयबद्ध... टीपटाप... सहज... साथीला व्हाओलीन... इलेक्ट्रॉनिक गिटार... बेस गिटार... स्मूद ज्याझ्झ... अमितचा स्वतः चा आवाज... कविता सेठ चा गोड'खारा' आवाज... अँड आइस ओंन केक म्हणजे स्वानंद किरकिरे साहेबांचे शब्द. अमिताभ स्लो मोशन मध्ये त्याच्या 'फॅन' नी आणलेला 'मुरब्बा' चाखतो! काय मस्तय सीन तो, हे गाणं जेव्हा जेव्हा ऐकतो तेव्हा परत एकदा ऐकावच लागतं, कधी कधी तीनदा कधी चारदा. आत्ता ह्या लेखा निमित्त ५व्यांदा ऐकतोय ले...चख ले मुरब्बा किसी का संजोया हुआ तुझ तक आया है ले... चख ले ये मुरब्बा किसी का कदरदारियों का सरमाया है ये दिल मै रख ले रख ले ये... मुरब्बा ह्या कडव्या नंतर जो काय सोलो गिटार पीस आहे! बास रे बस!!! (2:32-2:47) ह्याच अलबम मधल्या बाकीच्या गाण्यांमध्ये अजून वक गाणं पण मस्तय, 'अक्कड बक्कड' गायलंय मोहित चौहाननी... अक्कड बक्कड बंबे बो, एस्सी नब्बे पुरे सौ... सौ ...

पल्सर

२००७ चा मे महिना… मी एका आठवड्यात दुबईला जाणार होतो, त्यामुळे पुणे विझीट होती वीकेंडला… परत कधी यायला मिळेल, निदान वर्ष भर तरी नक्कीच नाही! त्यामुळे सर्व जवळच्या लोकांकडे एक एकदा डोकावत बाय बाय करणं चालू होतं, त्यादिवशी गेलेलो गानू काकांच्या कडे, आमचे पुण्यातले गानू काका, सहकार नगरला... संध्याकाळी फोन आला मित्रांचा कि टिळक रोड ला भेटूयात का! मी म्हणालो भेटूयात!… गानू काकू म्हणाली अभिषेकची पल्सर घेऊन जा, तो बसनीच ये जा करतो ओफ्फिस ला त्यामुळे जा घेऊन, मी मस्त मारली किक, झाप्झुप करत २० मिनटात टिळक रोड, १-२ तास टाइमपास करत निघालो परत मारली किक! परत येताना ट्राफिक पार करत २५ मिनटात बैक टु सहकार नगर, घरी आलो, अभिषेक होता बाहेरच… म्हणाला अरे ही कोणाची पल्सर आणलीस रे! मी डोळे मोठे करून, ही काय भानगड, हे काय घडलं आता नवीन! ते उघडलेले डोळे न मिटताच, निघालो परत जिथुन ही 'जुडवा बेहेन' आणलेली!… त्या टिळकरोड वरच्या अभिनव कोल्लेज्च्या पार्किंग पाशी गेलो, जिथे आधी आमची 'ओरिजिनल' पल्सर लावलेली अगदी तिथेच! पार्किंग समोरच्या दुकानदाराला विचारलं… तो  म्हणाला...