पल्सर


२००७ चा मे महिना…

मी एका आठवड्यात दुबईला जाणार होतो,
त्यामुळे पुणे विझीट होती वीकेंडला…

परत कधी यायला मिळेल, निदान वर्ष भर तरी नक्कीच नाही!
त्यामुळे सर्व जवळच्या लोकांकडे एक एकदा डोकावत बाय बाय करणं चालू होतं,
त्यादिवशी गेलेलो गानू काकांच्या कडे,
आमचे पुण्यातले गानू काका,
सहकार नगरला...
संध्याकाळी फोन आला मित्रांचा कि टिळक रोड ला भेटूयात का!
मी म्हणालो भेटूयात!…
गानू काकू म्हणाली अभिषेकची पल्सर घेऊन जा,
तो बसनीच ये जा करतो ओफ्फिस ला त्यामुळे जा घेऊन,
मी मस्त मारली किक, झाप्झुप करत २० मिनटात टिळक रोड,
१-२ तास टाइमपास करत निघालो परत
मारली किक! परत येताना ट्राफिक पार करत २५ मिनटात बैक टु सहकार नगर,
घरी आलो, अभिषेक होता बाहेरच…
म्हणाला अरे ही कोणाची पल्सर आणलीस रे!
मी डोळे मोठे करून, ही काय भानगड, हे काय घडलं आता नवीन!
ते उघडलेले डोळे न मिटताच,
निघालो परत जिथुन ही 'जुडवा बेहेन' आणलेली!…


त्या टिळकरोड वरच्या अभिनव कोल्लेज्च्या पार्किंग पाशी गेलो,
जिथे आधी आमची 'ओरिजिनल' पल्सर लावलेली अगदी तिथेच!


पार्किंग समोरच्या दुकानदाराला विचारलं…
तो  म्हणाला 'तुमची गाडी घेऊन २ जन गेल्यॆत पुलीसस्टेशन मंदी'
माझे डोळे मोठ्याचे - नव्हते व्हायचे राहिलेले,

आधीच देश सोडून जायचं होतं,
त्यात ह्या भानगडीचा निकाल लागला नसता तर पुणे सोडणेच अवघड होणार होतं!
आई, बायको, सासरे आणि गानू कंपनी काय बोलतील,
आधीच विसरभोळा आणि धांदरट म्हणून कूप्रसिद्ध मी!

त्यात ही शेवटच्या क्षणांत घडलेली 'कामगिरी'!


तेवढ्यात ते २ 'सद्गृहस्थ' आमच्या ओरिजिनल पल्सर वर स्वार होऊन पार्किंग पाशी आले!
तो दुकानदार म्हणाला... हेच ते दोघे,

ते दोघे मला बघून जरा न हसून हसल्यासारखा काहीतरी चेहरा करून
किल्ली दाखवायला लागले,
म्हणाले "अव्हो तुमी पहिले नाय बर का असं करणारे!
आमच्या पल्सर ला कोणाच्या बी पल्सरची चाबी लागती बघा!"
आता मी ही सेम डायलोग मारणार तेवढ्यात ही आपली गाडी नाहीच ते लक्षात आले.

मी निःश्वास टाकला!
'सोरी' वगैरेचे शाब्दिक श्रीफळाची देवाणघेवाण करत परत निघालो सहकार नगरला!

तेच म्हणत होतो,
टिळक रोड वरून परतताना गाडी जरा वेगळी का जाणवत्ये!
पण तेव्हा काय माहीत होतं 'दाल मै काला' नाही,
पूर्ण डाळच वेगळी होती राव!

हुश्ह!

#सशुश्रीके | ७ जानेवारी २०१५ दुपारचे २.२०






Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!