Posts

Showing posts with the label marathifun

डांबर, सिमेंट की चिखल?

आपलं मन कसं असतं माहित्ये का, उगाच तुलना करावीशी वाटली म्हणून असेल पण...अगदी सेम असच असतं मन... कडक उन्हातल्या डांबरा सारखं कच्च्या सिमेंट सारखं, झालच तर सारवलेली जमीन किंवा ...

सांसो की जरूरत है जैसे...

कुठल्या तरी मूवी मध्ये गडबड सीन ला नाही का ... "#गोलमाल है भाई सब गोलमाल है" हे गाणं वाजतं बॅकग्राऊंडला... आठवलं, आठवलं...  #हेराफेरी! 😆 डिरेक्टर/स्क्रीप्टरायटर किंवा जो कोणी असेल ह...

काही लोकांना शिक्रण आवडते...

🍌 लोकांना काय आवडेल काय नेम नाही, बघा ना काही लोकांना शिक्रण आवडते, काय आहे ना मला एक तर दूध आवडत नाही त्यात केळं तर अजिबात नाही, ह्या दोघांची ती शिक्रण... 😑 आणि "कोकणस्थ असून शिक्रण आवडत नाही असं कसं!" मग माझा प्रतीप्रश्ण... "तुला मटकी उसळ / कारल्याची भाजी / आळूचं फदफदं आवडतं का?" उत्तर हो आलं तर आलिंगन आणि  "नाही" आलं तर "तसच मला शिक्रण नाही आवडत" ... सोपं आहे गणित! 😉 लहानपणी दादा / काका / मामा मंडळी तोंडाने  फुरsssफूरsss  आवाज करत पोळ्यांबरोबर खायचे, त्याने तर अजूनच आवडेनासं झालं ते प्रकरण! त्यात काही लोकं त्यात तूप ओततात... बाबो भलतेच शौकीन चामारी! लिहितानाच कसं तरी होतंय!!! 🙄 शेवटचं एक: आयुर्वेद सांगतं, दुधात फळ 'मिक्स' करू नयेत, कोणीही ऐकत नाही बघा आयुर्वेदाचं पण 😟 #सशुश्रीके २६/०९/२०१७

कोथरूडचा व्हाइट वॉकर... निपुण धर्माधिकारी.

Image
निपुण एक कोडं होतं आता ते पूर्ण झालं असं म्हणायला हरकत नाही जोक्स अपार्ट... पण ह्या लहान मूर्तीला मी लहान असल्यापासून ओळखतो. (तो आणि मी दोन्ही बद्दल बोललोय, माझं सोडा तो नक्कीच मोठा झालाय 😂 ) परवाच त्याचा टेड एक्स बीएमसीसी टॉक पाहिला, मी जोक्स अपार्ट असं का म्हणालो ते कदाचित तुम्हाला टेडएक्स चा विडिओ पाहिल्यावर कळेल. असो... युट्युबची लिंक जेव्हा पाठवली त्याने तेव्हा नेमका घरी किंवा ऑफिस मध्ये नव्हतो, त्यात ही मूर्ती विडीओत इंग्लिश मध्ये बोलत होती, जवळ हेडफोन नव्हते. काय कशाबद्दल बोललाय, स्टँडअप कॉमेडी वर बोलतोय की तसच काही अशी उत्सुकता होती, कारण हा माणूस जेव्हा पासून वेबविश्वात आलाय तेव्हापासून एक नवीन मराठी विनोदलाट घेऊन आलाय, पण बघतो तर काय... व्हीडिओ वॉज ऑल अबाऊट सिरीयस टॉपिक कॉल्ड 'स्ट्रगल'... अवघड शब्दात सांगायचं झालं तर 'संघर्ष' ... जो आपण रोज कधी ना कधी थोड्या फार प्रमाणात करत असतो, बोललाय ह्यावर जवळपास १५-२०मिनिटं . चला तर माझ्या काही आठवणी ह्या 'कोड्या'बद्दल... आम्ही मुंबईतून पुण्यात आलो ९२-९३साली रहायला मॉडेल कॉलोनी मध...