कोथरूडचा व्हाइट वॉकर... निपुण धर्माधिकारी.



निपुण एक कोडं होतं आता ते पूर्ण झालं असं म्हणायला हरकत नाही जोक्स अपार्ट... पण ह्या लहान मूर्तीला मी लहान असल्यापासून ओळखतो. (तो आणि मी दोन्ही बद्दल बोललोय, माझं सोडा तो नक्कीच मोठा झालाय 😂 ) परवाच त्याचा टेड एक्स बीएमसीसी टॉक पाहिला, मी जोक्स अपार्ट असं का म्हणालो ते कदाचित तुम्हाला टेडएक्स चा विडिओ पाहिल्यावर कळेल.

असो... युट्युबची लिंक जेव्हा पाठवली त्याने तेव्हा नेमका घरी किंवा ऑफिस मध्ये नव्हतो, त्यात ही मूर्ती विडीओत इंग्लिश मध्ये बोलत होती, जवळ हेडफोन नव्हते. काय कशाबद्दल बोललाय, स्टँडअप कॉमेडी वर बोलतोय की तसच काही अशी उत्सुकता होती, कारण हा माणूस जेव्हा पासून वेबविश्वात आलाय तेव्हापासून एक नवीन मराठी विनोदलाट घेऊन आलाय, पण बघतो तर काय... व्हीडिओ वॉज ऑल अबाऊट सिरीयस टॉपिक कॉल्ड 'स्ट्रगल'... अवघड शब्दात सांगायचं झालं तर 'संघर्ष'... जो आपण रोज कधी ना कधी थोड्या फार प्रमाणात करत असतो, बोललाय ह्यावर जवळपास १५-२०मिनिटं.

चला तर माझ्या काही आठवणी ह्या 'कोड्या'बद्दल... आम्ही मुंबईतून पुण्यात आलो ९२-९३साली रहायला मॉडेल कॉलोनी मध्ये, तेव्हा शाळा सुटली की कधीकधी औंधला चुलत काकांकडे यायचो, तिथे पहिल्यांदा दिसला, 'कोडं' काय असतं ह्या मुलामुळे कळलं मला, अर्थात त्याबद्दल काही वाईट/चांगलं वाटण्याचे दिवस नव्हते, पण काय गुटगुटीत मूर्ती होती ती सांगू, 'दादा दादा' करत पुढे मागे यायचा... अगदी ते लहान पिल्लू असतं ना कुत्र्याचं... ज्याला बघून मुली 'सोऊऊऊ क्युट' वगैरे करतात, ते क्युट पिल्लू घरी घेऊन जावस वाटतं वगैरे अगदी तसच. पण भलताच चपळ होता, त्या छोट्या घरात आम्ही जिथे जागा मिळेल तिथे मस्ती करायचो, त्याला नेहमी शाळेतल्या कापड्यातच पाहिलेला, अर्थातच ते 'कोडं' हुशार पण तितकंच होतं, निपुणला इतके टक्के मिळाले, स्कॉलरशिपला बसलाय, त्याला इथे ऍडमिशन मिळाली अश्या मला आयुष्यात न जमणाऱ्या गोष्टी तो लीलया करत होता! असो ह्याचं पण मला कौतुक नाही...कौतुक कसलं, तर ह्याच्या विनोदबुद्धीचं!

पहिल्यांदा दिसला मोठ्या पडद्यावर 'हरिश्चंद्रची फॅक्टरी' नावाच्या लेजेंड मराठी मूव्हीत, चित्रपटाच्या अगदी शेवटी जेमतेम १०-२०सेकंदाचा अभिनय असेल त्याचा, तेव्हा अरे हा तर आपला निपुण करत उडालोच खुर्चीवरून! तेव्हापासून दर वेळी खुर्चीतून मला हा उडवतच आलाय... दळण नावाचं नाटक केलं जे मी अजून पाहिलं नाहीये म्हणा, योग नाही आला, पुण्यात हा माणूस असा ऍक्टिव्ह असल्यापासून मी दुबईत आहे त्यामुळं जमलं नाही, असो मग खुर्चीची जागा एके दिवशी काऊच ने घेतली, भाडीप चं कास्टिंग काऊच प्रचंड माल असलेल्या मराठी मुलींना ह्याने आणि अमेय ने घ्यायला सुरुवात केली हो... सौम्य शब्दात मॅक्स घेत होते हे लोक्स, म्हणजे जे तुम्हाला जमत नाही ते हे लीलया करत होते हे पाहून धम्माल यायची राव!

त्याची एक उत्तम कलाकृती पाहिण्याचं सौभाग्य मिळालं मागच्या वर्षी मर फोटो स्टुडिओ त्याची एनर्जी त्याने जी काही दाखवली आहे व्हाया अमेय, सखी, सिद्धेश... टू गुड भेंचो! तो स्टेज वर नव्हता पण तरी ही त्याच्या दिग्दर्शनाने बालगंधर्वच्या खुर्चीतून उडालोच, ह्या सर्वांच्या आधी काही वर्षांपूर्वी असाच उडालो, जेव्हा कळालं की नौटंकी साला नावाचा धम्माल सिनेमा ह्याने लिहिलाय!

काही म्हणा त्याच्या कामाला एक वेगळी किनार आहे हे नक्की, ही पांढरी पाल ब्लॅक कॉमेडी उत्तमच करते नो डाउट!

आत्ताच त्याला व्हाट्सएपवर मेसेज केलेला, विचारलं ही नाटकं सोडून अजून काय काय केलंस बाबा जे मला माहीत नाहीय, तर त्याचा रिप्लाय आलाय संगीत नाटकं... हे वाचुन डोकं जड झालं, किती टॅलेंट असावं एका कडे चायला. आणि आता त्याने दिग्दर्शन केलेला नवीन सिनेमा येतोय बापजन्म २९सप्टेंबर रिलीज, तिजर्स आणि ट्रेलर्स तर बाप झालेत, उत्सुकता शिगेला पोहोचली आहे आणि सुदैवाने तो थेटरात बघणार पुण्यात आलो की ह्याचं समाधान आत्तापासूनच! तुम्ही पण पहा हं आमच्या निपुणचा 'बापजन्म'... बाप विषय आहे, ज्या ज्यांचे वडील आता नाहीत त्यांच्या साठी तर बोलायलाच नको!

बरं हा सोशल मीडिया पण सोडत नाही, म्हणजे मुद्दामून का काय माहीत नाही मराठीत लिहितो ३-४वाक्य ती ही इंग्लिश मध्ये, ट्विटर फेबु वर... आणि मग शेकडो लाईक्स! दुर्दैवाने नेमकं मागच्या २-३आठवड्यात जास्त लक्ष नव्हतं लोकांच्या स्टेटस अपडेट वर आणि हा नेमका ला हवा येऊ द्या मध्ये येऊन गेला आणि मी संधी असून मिस केलं, असोच! पण सुदैवाने भेटला बाबा मॉल मध्ये, अमेय पण होता सोबत, माझ्या छकुलीला घेऊन गेलेलो, युट्युब वर कास्टिंग काऊच मुळे ही दोन टाळकी ओळखीची आहेत तीच्या त्यामुळे मजा आली, सेल्फी बूम्रांग वगैरे झाले, टॅगिंग झाले... हळूच अमेयने अन्वयाकडे फाफेचे प्रोमोशन पण केले 🤣, मजा आली भेटून दोघांना! निघताना त्यांच्या बरोबर फोटो काढायचा होता, बर सेलिब्रेटी झालेत म्हणून नाही, आपण आठवण म्हणून काढतो तसा, त्यांच्या बरोबर आलेली एक मुलगी, ती बाजूला जाऊन म्हणते "अरे सेलिब्रिटींबरोबर काढा फोटो मी कशाला मध्ये" मी तिला म्हणालो "तो निपुण आहे माझ्यासाठी, मला दादा म्हणायचा आणि अजून ही म्हणतो कधी तरी मजा म्हणून का होईना!"

तर असा आमचा निपुण, दिसायला युरोपियन, वागायला पुणेरी, कोथरूडचा व्हाइट वॉकर! त्याला अनकोत्तम आशीर्वाद! असाच प्रगतीच्या न संपणाऱ्या शिडीवर तू चढत राहा, लोकांची घे, मारत राहा, अगदी डोळ्यांत पाणी येई पर्यंत हसत हसत!

#सशुश्रीके | २५ सप्टेंबर २०१७









Comments

  1. कोथरुडच्याच भाषेत सांगायचं झालं तर, 'जमलेलं आहे!'

    निपुणची एकही कलाकृती पहिली नाही असा माणूस शोधून सापडायचा नाही. कास्टिंग काऊच तर धमालच होतं, 'अमर' सुद्धा मस्त होतं. आता 'बापजन्म' येतोय म्हणे... बऱ्याच वर्षांनी मराठीत परतलेल्या भावगीताने त्याची झलक दिलीच आहे... काहीतरी अचाट असणार हे नक्की!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!