Posts

Showing posts with the label names

नावं

काय रे चिकन्या.. ऐ गोरा घाऱ्या... पांढरी पाल, लाल माकड, रबरी चेंडू.... अश्या नावांनी माझं बालपण नुस्तं गजबजलं होतं! काही 'नावांचा' भयंकर राग यायचा... गोरा आहे म्हणून काय झालं... मी थोडीच ठरवलेला माझा रंग! आणि जरा काही मनाविरुद्ध झालं की कान लाल... त्यामुळे कधी काही लपवून ठेवणं आयुष्यात जमलच नाही, डोळ्यात पाणी तर इतक्या लावकर यायचं... त्यामुळे 'हळवा' आणि 'नाठाळ'चं अजब कॉम्बिनेशन होतो मी, त्याच त्याच चुका परत परत करून त्या चुकांवर पीएचडी व्हायची राहिलेली. त्यात कंपेरीझनला जाम वैतागायचो... मित्र बघ तुझे, किती हुशार...किती ह्याव किती त्याव, पण नंतर नंतर कळायला लागलं, लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला! काय घ्यावे काय सोडावे... हे कळुनही न कळाल्या सारखे करणे, तो 'एक्टर' फ्याक्टर आपणा सर्वांमध्येच थोड्या फार प्रमाणात असतो! तसा माझ्यात ही आला. त्यामुळे मी हल्ली कोणालाच रंगावरून / शरीरयष्टी / स्वभावावरून बोलायचं टाळतो... मनात जे काय असेल ते मनात... कारण अनुभवले आहे की काय वाटत असेल, आणि माझ्या तोंडातून जेव्हा जेव्हा निंदा झाल्ये तेव्हा त...

नावं विचारा रे… 'नावात काय ठेवलाय?' असं म्हणतात! चुकीचं म्हणतात!

Image
 नावं विचारा रे… 'नावात काय ठेवलय?' असं म्हणतात! चुकीचं म्हणतात! आपल्या जीवनात खूप लोकं येतात न जातात त्यांची नावंपण माहित नसतात आपल्याला भंगारवाला पंचरवाला पोस्टमन फाटाकेवाला हे सगळे म्हणजे वर्षानुवर्ष दिसणार, हसणार, व्यवहार करणार पण आपल्याला साधी त्यांची नावं पण माहिती नसतात बालचित्रवाणी पाहायचो दुपारची… १ वाजता शाळेतून घरी आलो की नित्य्नियमानी तेच तेच प्रोग्राम्स असायचे पण मनाला भावणारे त्यामुळे कधीच कंटाळा यायचा नाही आणि तेव्हा सतराशे सठ चैन्नल्स ही नव्हते असो… एक पोस्टमन वरती छोटी फिल्म होती एक अपंग मुलगी असते एका घरी तिला हा पोस्टमन काका नेहमी पत्र आणून द्यायचा तिला लक्षात आले की पोस्टमन काका चपला नाही वापरत ती पैसे जमवून मोच्याकडून व्हाणा बनवून घेते पुढच्या वेळी जेव्हा पोस्टमन काका तिच्या घरी पत्र द्यायला येतो तेव्हा ती मुलगी त्याला व्हाणा देते... त्याला गहिवरून येतं, त्याला कळत नसतं की कसे आभार मानावेत... त्याला राहवत नाही म्हणून त्याला पडलेला एक प्रश्न विचारतो... 'ताई तुला माझ्या पायाचं माप तरी कसं कळालं!' फ्लाशबैक मध्यॆ ती पोस्टमनच्...