नावं

काय रे चिकन्या.. ऐ गोरा घाऱ्या...
पांढरी पाल,
लाल माकड,
रबरी चेंडू....

अश्या नावांनी माझं बालपण नुस्तं गजबजलं होतं!
काही 'नावांचा' भयंकर राग यायचा...
गोरा आहे म्हणून काय झालं...
मी थोडीच ठरवलेला माझा रंग!
आणि जरा काही मनाविरुद्ध झालं की कान लाल...
त्यामुळे कधी काही लपवून ठेवणं आयुष्यात जमलच नाही,
डोळ्यात पाणी तर इतक्या लावकर यायचं...
त्यामुळे 'हळवा' आणि 'नाठाळ'चं अजब कॉम्बिनेशन होतो मी,
त्याच त्याच चुका परत परत करून त्या चुकांवर पीएचडी व्हायची राहिलेली.
त्यात कंपेरीझनला जाम वैतागायचो...
मित्र बघ तुझे, किती हुशार...किती ह्याव किती त्याव,
पण नंतर नंतर कळायला लागलं,
लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला!
काय घ्यावे काय सोडावे...
हे कळुनही न कळाल्या सारखे करणे,
तो 'एक्टर' फ्याक्टर आपणा सर्वांमध्येच थोड्या फार प्रमाणात असतो! तसा माझ्यात ही आला.

त्यामुळे मी हल्ली कोणालाच रंगावरून / शरीरयष्टी / स्वभावावरून बोलायचं टाळतो... मनात जे काय असेल ते मनात...
कारण अनुभवले आहे की काय वाटत असेल, आणि माझ्या तोंडातून जेव्हा जेव्हा निंदा झाल्ये तेव्हा तेव्हा त्याचे परिणाम ही भोगावे लागलेत!

नावं ठेवा पण प्रेमानं! आणि घ्याही... प्रेमानं...
बोलणं सोप्प् आहे म्हणा... प्रयत्न चालू आहेत.


#सशुश्रीके | ८ जानेवारी २०१५ संध्याकाळचे ६.१३

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!