Posts

Showing posts with the label pakistan

लाल बहादुर शास्त्री

Image
लाल बहादुर शास्त्रींची जयंती आज  ते पंतप्रधान असताना झालेली 1965ची लढाई आठवली! आठवली म्हणजे... जे काही इतिहासात नमूद केले आहे / इंटरनेटवर आहे त्यांच्या दाखल्यानी लिहितोय. दुष्काळ आणि युद्ध ह्या दोन महाभयंकर गोष्टींची अप्रतिम हाताळणी केली त्यांनी, पाकिस्तानच्या छुप्या मग उघड आक्रमणाला सणसणीत उत्तर! मात्र तेव्हाच पकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर चा प्रश्न सोडवायला हवा होता... लाहोर पर्यंत तिरंगा फडकावून ही, आपली हक्काची जमीन आपण परत घेतली नाही... असो! इतिहास बदलता येत नाही पण भविष्य घडवता येते, POK मध्ये वैतागलेल्या नागरिकांना न्याय मिळावा ही सदिच्छा!  जय हिन्द! #सशुश्रीके

आपल्याशी मस्ती नाय करायची… जो टकराएगा वो पछ्ताएगा बे!

लेटेस्ट किस्सा - आत्ताच प्येंट्री मध्ये मी मिसळ आणलेला डबा विसळायला गेलेलो तिथे आमच्या ऑफिस मधले काम करणारे २ पाकिस्तानी आले १ मिनिट दोघेही गप्प, मी गाणी गुणगुणत होतो… परवाच हारलेले, तरीही मी आपलं शांत, काही विषय काढला नाही… त्यातला एक म्हणतो "क्या समीर भाय आपको क्या लागता है? ऑस्ट्रेलिया जीत जाएगा सेमी फायनल!" मी न वळताच उत्तरलो… "जनाब आप लिखते भी उलटे है और सोचते भी उलटे ही … हाहाहा वैसे दिल केहता ही के इंडिया जीतेगा और दिमाग ऑस्ट्रेलिया… और में दिल पे लेता हु दिमाग पे नही" दोघे हसत निघून गेले… जाताना त्यांना थांबवून बोललो… "फायनल में कोई भी हो, छुट्टी ले रहा हु… :) " आता दिवसभर ह्या गोष्टीचा विचार करत बसतील, का विचारला प्रश्न का घातले बोट! आपल्याशी मस्ती नाय करायची… जो टकराएगा वो पछ्ताएगा बे! #सशुश्रीके । २२/०३/१५