Posts

Showing posts with the label problem

"काहे को दुनिया बनाई... तूने काहे को दुनिया बनाई!?"

हे सीरिया प्रकरण जाम डीप्रेसिंग आहे बुआ २ आठवाड्यापूर्वी एक जुन्या ऑफिसच्या एका सेर्रियन मित्राला भेटलेलो, मी विचारलं काय चालले आहे सध्या... घरचे कसे आहेत, सीरियाला जाऊन आलास का!? म्हणाला... तिकडे सगळ नॉर्मल आहे बॉम्बस्फोट वगैरे, लोकं शीशा पीतात, हॉटेलात जातात... देवाच्या कृपेने कोणी मरत नाही! कसं काय कोणास ठाऊक, मी तर परत सीरियाला कायमचा जायचा विचारही करू शकत नाही! पण लोक समाधानी आहेत, देवाची कृपा! हे ऐकून मला त्याचं बोलणं आशादाई होतं की नव्हतं हेच कळेना! आता गेल्या आठवड्यापासून जीवघेण्या बातम्या, रेफ्यूजीज... यूरोप वगैरे ऐकून, आशाची वगैरे भाषाच करवत नाही! बातम्या पाहताना/ऐकताना/वाचताना मरणाऱ्या लहान जीवांचा... नुसत्या विचारानेही अंगावर काटा येतो! ज्यानी कोणी लिहीलय... अगदी परफेक्ट! "काहे को दुनिया बनाई... तूने काहे को दुनिया बनाई!?" #सशुश्रीके । ७ सप्टेंबर २०१६ Quick facts: What you need to know about the Syria crisis ://www.mercycorps.org/.../quick-facts-what-you-need-know...

तुम्हास्नी कसं वाटतंय!?

Image
तुम्हास्नी कसं वाटतंय!? कसलं र्र हे आकास, पक्क निरदयी झालय बग्गा, त्या चिंगू मारवाड्यागत, जीमीनीला तहान लागून पार कोरड पडलीया! उभी पिकं जीव द्येतायत, नंतर आमचा नंबर हाय! ...असं म्हन्तायत! भेगा पडल्यात भेगा!!! व्है व्है.. क्याम्येरा तिथूनच फिरवत्यात... न आमच्या कडं आनून थांबिवत्यात! आपलं आपलं नाव घेत च्यानल वाले, रग्गड पैसा कमिवत्यात! तुम्हास्नी कसं वाटतंय!? अस्ला येड्यागबाळ्यागत प्रश्न ईचारतायत! ‪#‎ सशुश्रीके‬

मूळ लेखक/कवी

हल्ली मूळ लेखक/कवी ह्यांचे नाव न जोडता/खोडून त्यांचे लेख/कविता एफबी व व्हाट्सअप वर सर्रास फॉरवर्ड/शेयर होत असतात. ह्याचे आश्चर्य होत नाही, पण ह्याबबतीत काहीच करता येणार नाही ह्याचे दुःख मात्र होते. आम्ही डिज़ाइनर फ़ॉन्ट्स वापरतो... ग्राफिक्स/क्लिपआर्ट्स वापरतो...आणि ती अगदी ८०% वेळा कोणी निर्माण केली आहेत माहीत नसते... पण तीच कलाकृती समाजासमोर पोस्टर/होर्डिंग/जाहिरात स्वरूपात येते तेव्हा वाह वाह होते... ती उत्तम असल्यास एफबी व्हत्साप वर शेयर ही होते! लिखाणाचं ही अगदी तसेच झालेले आहे, लोक आनंद घेतात! त्यातच आनंद :) मात्र श्रेय दील्यास परमानंद :D #सशुश्रीके