पल्सर
२००७ चा मे महिना… मी एका आठवड्यात दुबईला जाणार होतो, त्यामुळे पुणे विझीट होती वीकेंडला… परत कधी यायला मिळेल, निदान वर्ष भर तरी नक्कीच नाही! त्यामुळे सर्व जवळच्या लोकांकडे एक एकदा डोकावत बाय बाय करणं चालू होतं, त्यादिवशी गेलेलो गानू काकांच्या कडे, आमचे पुण्यातले गानू काका, सहकार नगरला... संध्याकाळी फोन आला मित्रांचा कि टिळक रोड ला भेटूयात का! मी म्हणालो भेटूयात!… गानू काकू म्हणाली अभिषेकची पल्सर घेऊन जा, तो बसनीच ये जा करतो ओफ्फिस ला त्यामुळे जा घेऊन, मी मस्त मारली किक, झाप्झुप करत २० मिनटात टिळक रोड, १-२ तास टाइमपास करत निघालो परत मारली किक! परत येताना ट्राफिक पार करत २५ मिनटात बैक टु सहकार नगर, घरी आलो, अभिषेक होता बाहेरच… म्हणाला अरे ही कोणाची पल्सर आणलीस रे! मी डोळे मोठे करून, ही काय भानगड, हे काय घडलं आता नवीन! ते उघडलेले डोळे न मिटताच, निघालो परत जिथुन ही 'जुडवा बेहेन' आणलेली!… त्या टिळकरोड वरच्या अभिनव कोल्लेज्च्या पार्किंग पाशी गेलो, जिथे आधी आमची 'ओरिजिनल' पल्सर लावलेली अगदी तिथेच! पार्किंग समोरच्या दुकानदाराला विचारलं… तो म्हणाला...