तुम्हास्नी कसं वाटतंय!?
तुम्हास्नी कसं वाटतंय!? कसलं र्र हे आकास, पक्क निरदयी झालय बग्गा, त्या चिंगू मारवाड्यागत, जीमीनीला तहान लागून पार कोरड पडलीया! उभी पिकं जीव द्येतायत, नंतर आमचा नंबर हाय! ...असं म्हन्तायत! भेगा पडल्यात भेगा!!! व्है व्है.. क्याम्येरा तिथूनच फिरवत्यात... न आमच्या कडं आनून थांबिवत्यात! आपलं आपलं नाव घेत च्यानल वाले, रग्गड पैसा कमिवत्यात! तुम्हास्नी कसं वाटतंय!? अस्ला येड्यागबाळ्यागत प्रश्न ईचारतायत! # सशुश्रीके