'ठरल्याप्रमाणे' ते 'अचानक'

'ठरल्याप्रमाणे' ते 'अचानक'
बोरिवलीत आम्ही राहायचो तेव्हाची गोष्ट, २-३रीत असेन, नेहमीप्रमाणे शाळेत गेलेलो, मुलं-मुली एकत्र असलेला वर्ग, 'ठरल्याप्रमाणे' महिन्यातून ३-४ वेळेला कोणा न कोणाचातरी वाढदिवस असायचाच, तसा एका मुलीचा वाढदिवस होता, 'ठरल्याप्रमाणे' चोकलेटं वाटपाचा प्रोग्राम घडला, 'ठरल्याप्रमाणे' किस-मी नावाची फेमस(अजून ही) चोकलेटं वाटली, 'ठरल्याप्रमाणे' २-३ मोठी पाकीटं ४ जण आपापल्या बाकांच्या रांगेत वाटत होती, 'ठरल्याप्रमाणे' प्रत्येकी २ असे गणित.

पण 'अचानक' मधली सुट्टीच्या आधीच म्हणजे जेवणाच्याही आधी मुलांच्या पोटात 'अचानक' दुखायला लागले! ५-६ जण सोडून (त्यात मी आणि २ जण ज्यांनी 'ती' चोकलेटं पचवली होती आणि २-३ जणं ज्यांनी 'ती' चोकलेटं खाल्ली नव्हती)

'अचानक' जवळ जवळ सर्वच मुले डोळे वर करत पोटाच्या आजूबाजूला हात गरागरा फिरवत उलट्या काढत दिसत होती, शाळेच्या सर्व मास्तरीण आणि शिपायांच्या तोंडाचे 'अचानक' १२ वाजलेले कळत होते, सर्व मुलांना एका मागोमाग रिक्षात कोंबून जवळच्या हॉस्पिटलात न्यायचा 'अचानक' निर्णय घेतला असावा, मला आमच्या बाइंनी विचारलं, तुला काही होतय का? मी मोठा प्रश्न चिन्ह डोळ्यासमोर आणून… 'अचानक'(च) ''होईल असं वाटत आहे!" असा गुगली टाकत, घरी लवकर जाण्याच्या हव्यासापोटी रिक्षात बसलो! कारण हॉस्पिटल च्या २ इमारतीनंतरच माझे घर होते... 'श्री गणेश' अपार्टमेंट.

'अचानक' सर्व रिक्षा पटापट हॉस्पिटल पाशी, सर्व मुले डॉक्टरांच्याकडे, डॉक्टर प्रत्येकाला विचारत, काय होतय, किती उलट्या झाल्यात वगैरे, माझं उत्तर 'ठरलेलं' ''होईल असं वाटत आहे!" असा पहिल्यांदा 'अचानक' आणि मग 'ठरल्याप्रमाणे' गुगली टाकल्यावर घरी लवकर जाण्याची माझी इच्छा लवकरच पूर्ण होणार अश्या 'ठरलेल्या' समजुतीने मी जरा खूशच! पण मित्रांची अवस्था बघून माझी जरा 'अचानक' फाटलीही होती!

परत जायची वेळ आली, मला डॉक्टरांनी १ गोळी गिळायला दिली, बस मग बैक टु स्कूल!

ती घराची खिडकी ज्यातून मी रस्ता बघायचो त्याच रस्त्यावरून रिक्षेमधून मी खिडकीला पाहिले!

'ठरल्याप्रमाणे' ते 'अचानक' झालेल्या ह्या सर्व प्रकारात मी आणि माझासारखी २-३ टाळक्यांनी विषबाधीत चोकलेट पचवले ह्याचे कौतुक चालू होते! उल्हास नगर मेड प्राकार निघाला तो 'किस-मी' त्यामुळे घडला सगळा प्रकार!
दुसऱ्या दिवशी पेपर मध्ये बातमी, माझ्या मित्रांच्या नावासकट! परत एकदा निराशा!… माझं नाव नव्हतं यादीत!

'ठरल्याप्रमाणे' ते 'अचानक' झालेल्या ह्या सर्व प्रकारात मी मात्र सुदैवानी विष-अ-बाधीत राहिलेलो!


#साशुश्रीके । ०१/०३/२०१५ । ४.३३

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!