Posts

Showing posts with the label small

क्या आप मुझॆ मिस करते हो?

आज अन्वयाला (वय अडीच वर्ष ) घेऊन एका मॉल मध्ये गेलेलो... तिथे अन्वया नुसती इथून -तीथे पळत होती! मी तीच्या पोढे मागे, नुसता दंगा :) तितक्यात एका दुकानासमोर त्याच दुकानाचे स्पेलिंग वाचत उभी राहिली… तिच्या मागून एक माणूस आला, तिला बघत, बेटा आपका नाम क्या है… वगैरे विचारलं  तिच्या समोर बसून, अर्थात अनोळखी व्यक्ती पाहून अन्वया आली माझ्याकडे, चेहरा हसरा + कवर बावरा करत, तो माणूस मगाशी पण अन्वया कडे पाहून हसत होता जेव्हा आमचा पकडापकडीचा खेळ चाललेला तव्हा! असो… तो माणूस पंजाबी किव्वा उत्तर भारतीय असावा, त्याचा बोलण्यावरून ते स्पष्ट जाणवत होते, म्हणाला…  "मुझॆ भी आपके जैसे ही ईत्नी ही एक लडकी है, फिलहाल इंडिया मै है... मैने कल ही उससे बात की, मैने पुछा, क्या आप मुझॆ मिस करते हो? उसने झटसे जवाब दे दिया 'नही!' क्युकी यहा पे सब खेलने के लिये मेरे फ्रेंड्स है, यहा मा भी है, पर एक बात बताउ आपको!… किसी से केहना मत… एक चीज जो आप करते है  वो बहोत मिस करती हू…  आप जो भाग के आते है और जो झप्पी देके पापा देते है, वो कोई नही करता!" हे सांगताना त्याच्या डोळ्यामधले अदृश्य अश्रू...

वेगाची नशा आज ठेचुन पाहिली..

॥श्री॥ वेगाची नशा आज ठेचुन पाहिली.. मजा नाही आली.. अक्खा शेख झायेद रोड ८०च्या स्पीडने ४थ्या लेन मध्ये रेटला... रोज १२०ची सवय १ल्या लेनची... आणि कोणी ११०वर असेल तर त्याला अपर-डीपर मारून बाजूला सरकवायची घाई... म्हणालो आज बघू 'इतर'होऊन कसं वाटतय... मजा नाय... पकाऊ, स्पीड पाहिजेच! आणि दुबैत तर नक्कीच पाहिजे! त्याच रस्त्यावर लेन चेंज करताना इंडिकेटर दाखवला नाही की तर माझी तळ पायतली आग मस्तकात जाते.. रोज एक्सीडेंट होतातच हमखास.. आत्तापर्यंतचा सर्वात YZएक्सीडेंट पहिला तो एका नॉर्मल सडैन आणि रोल्सरॉयस चा... रोल्स रॉयस रस्त्याच्या बाजूला उल्ट्या दिशेला तोंड... चुराडा समोरून!!!... हे सौदी/कतारी/कुवैती लोक मेले वीकेंडला दूबैत येऊन असला राडा करतात #सशुश्रीके | ५ एप्रिल २०१५