Posts

Showing posts with the label stories

क्या आप मुझॆ मिस करते हो?

आज अन्वयाला (वय अडीच वर्ष ) घेऊन एका मॉल मध्ये गेलेलो... तिथे अन्वया नुसती इथून -तीथे पळत होती! मी तीच्या पोढे मागे, नुसता दंगा :) तितक्यात एका दुकानासमोर त्याच दुकानाचे स्पेलिंग वाचत उभी राहिली… तिच्या मागून एक माणूस आला, तिला बघत, बेटा आपका नाम क्या है… वगैरे विचारलं  तिच्या समोर बसून, अर्थात अनोळखी व्यक्ती पाहून अन्वया आली माझ्याकडे, चेहरा हसरा + कवर बावरा करत, तो माणूस मगाशी पण अन्वया कडे पाहून हसत होता जेव्हा आमचा पकडापकडीचा खेळ चाललेला तव्हा! असो… तो माणूस पंजाबी किव्वा उत्तर भारतीय असावा, त्याचा बोलण्यावरून ते स्पष्ट जाणवत होते, म्हणाला…  "मुझॆ भी आपके जैसे ही ईत्नी ही एक लडकी है, फिलहाल इंडिया मै है... मैने कल ही उससे बात की, मैने पुछा, क्या आप मुझॆ मिस करते हो? उसने झटसे जवाब दे दिया 'नही!' क्युकी यहा पे सब खेलने के लिये मेरे फ्रेंड्स है, यहा मा भी है, पर एक बात बताउ आपको!… किसी से केहना मत… एक चीज जो आप करते है  वो बहोत मिस करती हू…  आप जो भाग के आते है और जो झप्पी देके पापा देते है, वो कोई नही करता!" हे सांगताना त्याच्या डोळ्यामधले अदृश्य अश्रू...

पहाट / सकाळ!

पहाट / सकाळ! - नको पहाटेच म्हाणुयात, किती भिन्न असतात ह्या! कधी कधी राग येतो जेव्हा झक्क मारत उठावच लागतं! आणि कधी कधी ती पहाट इतकी प्रिय असते की झोप लागत नाही! अश्या खुप पहाट आहेत लक्षात! जास्त करून दिवाळीच्या! तेव्हा त्या गोधडीतुन बाहेर पडायला अगदी इतकं नकोसं व्हायचं! पण एखादा फटाका फुटावा तसा झोपेचा फुगा फूटायचा गजर किव्वा आईची हाक ऐकल्यावर! - अजुन अश्या पहाटांपैकी पहाट म्हणजे गावी जायच्या वेळेची! बैग रेडी.. कपडे तयार.... तो दनादन तांब्या डोक्यावर पाण्याचाड धबधबा... जमला तर साबण नायतर झोपेचा झाग सरसावत... राप्प दिशी कोरड्या फराश्यांवर ओले चिंब पाय रोवीत घडाळ्या कड़े बघत... जो काय तो गड़बड़ीचा एपिक सीन घडायचा! मग देवाला सलाम ठोकत, बैगा उचलून मोशन ब्लर स्पीड गाठत... तो एसटीचा लाल रेडा, रिज़र्वड सीट असेल तर जो बसलाय त्याला डोळ्यानी मारूंन नसेल तर न बसलेल्या त्या 'आपल्या' जागेला शोधून जो काय 'प्रवास' घडायचा! बस बस 'लैच' जोरात.. जोरात पहाट! - नकोशी पहाट असायची ती परिक्षेच्या दिवसांची!.. अहो दिवस कसले ते... कर्दन काळ मेले... आय जस्ट वांट टू डीलीट दोस ब्लडी डेज फ...