पहाट / सकाळ!

पहाट / सकाळ!
-
नको पहाटेच म्हाणुयात,
किती भिन्न असतात ह्या!
कधी कधी राग येतो जेव्हा झक्क मारत उठावच लागतं!
आणि कधी कधी ती पहाट इतकी प्रिय असते की झोप लागत नाही!
अश्या खुप पहाट आहेत लक्षात!
जास्त करून दिवाळीच्या!
तेव्हा त्या गोधडीतुन बाहेर पडायला अगदी इतकं नकोसं व्हायचं! पण एखादा
फटाका फुटावा तसा झोपेचा फुगा फूटायचा गजर किव्वा आईची हाक ऐकल्यावर!
-
अजुन अश्या पहाटांपैकी पहाट म्हणजे गावी जायच्या वेळेची!
बैग रेडी.. कपडे तयार.... तो दनादन तांब्या डोक्यावर पाण्याचाड धबधबा...
जमला तर साबण नायतर झोपेचा झाग सरसावत...
राप्प दिशी कोरड्या फराश्यांवर ओले चिंब पाय रोवीत घडाळ्या कड़े बघत...
जो काय तो गड़बड़ीचा एपिक सीन घडायचा!
मग देवाला सलाम ठोकत, बैगा उचलून मोशन ब्लर स्पीड गाठत...
तो एसटीचा लाल रेडा,
रिज़र्वड सीट असेल तर जो बसलाय त्याला डोळ्यानी मारूंन नसेल तर न बसलेल्या त्या 'आपल्या' जागेला शोधून जो काय 'प्रवास' घडायचा!
बस बस 'लैच' जोरात.. जोरात पहाट!
-
नकोशी पहाट असायची ती परिक्षेच्या दिवसांची!..
अहो दिवस कसले ते... कर्दन काळ मेले...
आय जस्ट वांट टू डीलीट दोस ब्लडी डेज फ्रॉम माय आयुष्य! इतका वैताग यायचा
सांगू... त्यात ह्ये मोठ्ठ प्रेशर पुढच्या वर्षात जाण्याचं! आणि माझ्या
स्कॉलर मित्रांचं भलतच... स्कॉलरशिप वगैरे साठी रोज एक पहाटची बळी...
अरे काय... कोणाचं काय तर कोणाचं काय!!!
आमचे चिखलात पाय... जस्ट लाइक डू ओर डाय!
अशी परिस्तीती दर वर्षी!
ती पहाट... अर्र हाट!
किती तो विरोधाभास!
-
पण काही पहाटा सुन्दर ख़ास!
खिडक्या उघडल्या की धुकं न मातीचा वास!
हातात गरम चहा..
आहो त्या निवडक पहाट्स...
व्हेर यु आर ऑन हॉलिडे!
बॉस्स...
मस्त सफारी साठी गेटिंग रेडीची मजाच कै और!
सगळं कसं सेट असतं, तुम्हाला हवं तसं...
अगदी 'प' पासून 'ट' पर्यंत!
-
मग असते ती आजच्या सारखी पहाट!
काही नं केल्याची | काहीतरी राहिल्याची | करून दाखवण्याची | उगाच डोळे
फोडून पुढच्या १५-१६ तासांसाठी डोक्यात/चा शिमगा प्लान करणारी पहाट!
ही प्रिय पण असते आणि अप्रिय पण!
'दिल है के मानता नहीं च्या चालीवर'...
'दिल तड़प तड़प के केह रहा है आभी जा' हे गाणं गात झोपेचा पाठलाग करत...
असा अनियमीत पण मोजक्या...
'प' पासून 'ट' चा प्रवास..
-
आखिर 'द एंड' होतो सकाळ ह्या नियमीत कालकोठडीत...
जिथे सर्व गोष्टी नियमात लावलेल्या असतात...
इतकं झालच पाहिजे 'ळ' संपे पर्यंत...
पहाट असाव्यात आयुष्यात,
काही लोक्स पहाटेच जगतात...
हेवा वाटतो त्यांचा!
-
अरे हो अजुन एक पहाट आठवते...
जेव्हा झोप नावाचा टायर पार झीजुन गेलेला असतो!
आणि पहाटेच्या रस्त्यावरती अगदी १२०वर क्रुज करत असतो!
सब्मीशन असो किव्वा आत्ता आपल्या व्यवसाईक जीवनातलं प्रेजेंटेशन असो!
या पहाटेची वाट बघत वाट लागलेली असते!
-
जौदे...
एका नवीन पहाटेची 'द राइजिंग' होताना दिसतय...
ठेच्तो मेल्याला...
पहाट नकोच! आज सकाळ हव्ये!
सकाळ!

‪#‎सशुश्रीके‬ | ४ नोव्हेंबर २०१४ | पहाटे ३.३३

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!