Posts

Showing posts with the label technology

शरद मामा

Image
शरद मामा माझा सख्खा मामा... शरद मामा, भटजी... सध्या पालीला असतो. दोन मुलीआहेत, एकिचं लग्न झालंय आणि दुसरी अजून शाळेत आहे. दात पुढे, केस तरुणपणीच पांढरे झालेले, रव्याच्या लाडू वरचा जसा रवा दिसतो तशी १-२एमेम दाढी,पोटाचा गोलाकार वयोमानानुसार वाढत गेलेला, शर्ट-धोतर किवा आखूड प्यांट,बाटा सैंडेक किंवा कोल्हापुरी चपला, कपाळाला गंध, अखंड सर्दीने ग्रस्त,काही कोणाचं (त्याच्या पेक्षा वयानी कमी असलेल्यांपैकी) चुकलं की क्षणात खेकसणारा, हातात अडकित्ता तोंडात तंबाखू, अस्सल कोकणस्थ ठेका बोलताना,मनसोक्त खळखळून हसणारा, मोठा कान असलेला माझा सक्खा मामा... शरद मामा आम्ही मुंबईत राहत असताना आमच्या कडे काही दिवस राहायला होता, आपणासर्वांमध्येच काही अवगुण असतात छोट्या मोठ्या प्रमाणात तसे त्यातही होते त्यामुळे आमच्या घरी काही जास्त टिकला नाही तो... मग नंतर ठाकूरली, डोंबिवली येथे स्थाईक झाला, स्वतःचं असं घर घ्यायला जमले नाही त्याला. ते पागडी का काय ते, त्यावरच. असो, मूळचा अक्षीचा. अलिबाग-रेवदंडा मधलं छोटंसं गाव. तिथे माझे आजोबा म्हणजे - 'पुरुषोत्तम जनार्दन भावे' (आप्पा म्हणायचे सगळे त्य...

॥ जय जय्य एंड्रॉइड समर्थ ॥

Image
॥ जय जय्य एंड्रॉइड समर्थ ॥ पहिला मोबाइल! तो दिवस आठवाला की वाइट वाटतं, खरं तर मला मुळीच घ्यायचा नव्हता... आधीच नवीन जॉब त्यात मोबाइल मग परत महिन्याचा खर्च वेगळा, पण अमृता म्हणाली... तू घेच मोबाइल! मला हवा तेव्हा तुला कॉंटॅक्ट करता येईल... तेव्हा तिच्या कड़े बीएसएनएल चा 'तरंग' नामक सेलफोन होता... सेलफोन कसला... काळी वीट होती ती! सिम नसलेला CDMA फोन!  असो... तशी तेव्हा फोनची दुकानं कमीच, त्यातल्यात्यात डेक्कनला होती ४-५.. सागर आर्केड मधे गेलो, संध्याकाळची वेळ, गर्दी अपेक्षेप्रमाणे, नोकियाचे फोन तर भाजी विकल्यासारखे खपायचे तेव्हा, माझं लक्ष्य गेलं मोटोरोलाच्या रंगीत स्क्रीन असलेल्या मोबाइलवर... मोबाइल जगातला (तेव्हाचा) पहिला वहिला रंगीत फोन, छान लहान क्रोम बटन्स आणि सिल्वर बॉडी, दिसता क्षणीच आवडला, किम्मत जास्त होतीच... ४-५हजार! २००३-४चा काळ असेल... सकाळ पेपर्स मध्ये होतो तेव्हा... माझा पहिला फूल टाइम जॉब! जेमतेम ९हजार पगार होता, काढलं पाकिट अन घेतला फोन, घाम फुटलेला... पण हातात घेतल्यावर मजाच वाटली! काय मस्त होता फोन... रिंगटोन सेट करा...नवीन बनवा. इनबिल्ट गेम्स खेळा...सेटिंग...

हल्ली सर्वच स्मार्ट फोन वापरतात, अगदी आजी-आजोबाही!

Image
हल्ली सर्वच स्मार्ट फोन वापरतात, अगदी आजी-आजोबाही! "किती सोपे आहे वापरायला!" आईला मी अगदी असेच सांगितलेले! पण "मला गरज नाही… तुम्हा मुलांसाठी सोपे असेल. मला आपला साधा फोन चालतो, आणि काय करू मी स्मार्टफोन वापरून? माझं फोन करायचं आणि घ्यायचं काम होतं ना!" ... तरीही मी बळजबरीने आईला एक छानसा स्मार्टफोन घेऊन दिला, आता ३ वर्ष झाली वापरत आहे, सुरुवातीला १-२ महिने कुरकुर केली, आता ईतका छान वापरते की ती आता तिच्या मैत्रिणींना एप्प डाउनलोड वगैरे करून देते, त्यांच्या शंकेचे निरसन करते, पर्वा चुकून तिच्या हातून मराठी टायपिंगचं एप्प डीलीट झाले!, मी विचारलं असे कसे डीलीट झाले!? म्हणाली 'अरे, फोन खूप स्लो झालेला म्हणून नको ते एप्प्स उडवत असताना ते एप्प पण उडालं!' मग मी चीडचीड न करता, तिला .apk फाईल पाठवली, तिने ती इंस्टोल करून एप्प परत वापरते ही केले! हे सगळं सांगायचा उद्देश… नवीन तंत्राद्यान आणि वाढतं वय ह्यांचा काही संबंध नसतो! जरा वेळ लागतो, आणि उद्या माझी लहान पोर शिकवेल काही नविन तंत्राद्याना बद्दल ह्यात तर काहीच शंका नाही! #सशुश्रीके । १ सप्टेंबर २०१५ । ...