Posts

तमाशाल्लाह!

Image
तमाशाल्लाह! मुद्दामूनच लोकांची मतं नजरअंदाज करत चित्रपट पाहायला गेलो, इंटरवल पर्यंत चित्रपटातली तीन गाणी संपली, आता तीन उरलेली, आता इंटरवल का असतो हा नेहमीचा प्रश्न पडला, ठरल्या प्रमाणे इंटरवल नंतर पोटाच्या आकाराचे मोठे सॉल्टेड-पॉपकॉर्नचे डबडे घेऊन जागेवर येऊन बसलो... ह्यावेळी त्या डबड्यात मध्येच एक कैरेमलचा पॉपकॉर्न मिळाला, तसा होता 'तमाशा' एकदम हटके! इम्तियाझ अली... मानला बुआ! एक वेगळाच अनुभव, भारतीय सिनेमा आणि संगीत रंगभूमी ह्यांचा सुंदर मिलाप! आणि ह्यातून काय मस्त खुलावतो तो विचारांचे अंतरंग, विविध पेहलू, बारकावे... सध्या तरी कोणी दिग्दर्शक त्याला हात लाउ शकेल असे वाटत नाही, रॉकस्टार मग हायवे आणि आता तमाशा, सर्वांचा आत्मा एक! त्याचं म्हणणं एकच 'स्वतःला ओळखा!' रहमान आणि इम्तियाझ यांची जोडी तर आता इतकी मस्त जमली आहे! 'दो जिस्म इक जान है हम' असा काहीसा प्रकार झालाय, तमाशामधून परत एकदा इम्तियाझचे डोळे आणि रेहमानचे कान उधार घेऊन चित्रपट पाहिल्याचे असीम सुख मिळते! चित्रपटात गाणी अखंड न वापरण्याचा शाप आहे रहमानच्या गाण्यांना... मला त्याची नेहमी ख...

कम नहीं यहां ज्यादा कमाने वाले!

दबा के लिखता था कलम... हा भई, बडा जोर लगा के लिखता था! पन्नो मै आती थी गेहराई... बिना लिखें कुछ न याद आता बिना लिखें ... कुछ न याद आता... भला कैसे भूले जो किया था अपनो से वादा, इस बार कमाऊंग...

विजय...

विजय... माझा बॉस होता... मी एवरेस्ट ब्रँड सोल्युशन्स मध्ये जेव्हा रुजू झालो, काही महिन्यांतच विजयच्या ग्रुप मध्ये शिफ्ट झालो. एक नम्बर बोलबच्चन! रेतीला ही सोन्याच्या भावात विकण्या इतपत तगडा आत्मविश्वास... आणि त्यात कमालीचा खडूस! माझी पहिली वाहिली नोकरी, २००५ची वेळ... एवरेस्ट ब्रँड सोल्युशन प्रा.लि. मुंबई. तिथे रुजू झाल्या नंतर ६महिन्यांनी प्रभादेवीच्या कार्यालयातून जेव्हा आम्ही नवीन सांताक्रूझच्या कार्यालयामध्ये स्थलांतरीत झालो तेव्हा त्याला बंद खोली असलेली स्वतंत्र खोली मिळाली आणि त्याला आमच्या दंग्यापासून सुटका मिळाली! कारण आम्ही जोरजोरात बडबड करायचो, गाणी वगैरे लावायचो कार्यालयात, आणि कार्यालयीन वेळेनंतर तर उत यायचं आम्हाला विशेषतः मला, आणि मग तो पिंजर्यातून चिडून सुटलेल्या वाघासारखा यायचा आणि चिडायचा आमच्या वर, विशेषतः माझ्यावर... म्हणायचा 'धिस इज ऑफिस गायज/समीर... बिहेव!' आम्ही/मी तात्पुरतं गांभीर्य पाझरून शांत बसायचो. आणि त्याला मनसोक्त शिव्या देऊन परत जरावेळानी ये रे आपल्या मागल्या. त्याच्या बद्दल नेहमी 'तो असाच आहे तो तसाच आहे' असा सूर असे सगळ्यांचा/माझा, पण ह...

'मालगुडी डेज' Vender of sweets

'मालगुडी डेज' बघत होतो, ( Ep 9-10-11-12 Vender of sweets) तेव्हढ्यात माझं स्टेशन आले, मग उरलेला एपिसोड ऐकत ऑफिस मध्ये आलो (मेट्रो स्टेशन वरून ऑफिस पर्यंत चालत मग आठ मजले चढून यायला पंधरा मिनिटे तरी लागतात) ...सगळं वेगळं वेगळं वाटायला लागलं अचानक! जुन्या गोष्टी, आवाज, व्यक्ती.. आणि आत्ताचे सर्व! हरवलो होतो, डेस्क वर बसलो, जरावेळ 'फेकबुक' उघडलं तेव्हा कुठे 2015 मध्ये आलो. Ep9 - https://www.youtube.com/watch?v=E5UcHzev7N4&list=PLC91CrnQqPhb772gq0_P-9K_76_vQuoj8 #सशुश्रीके । १५ नोव्हेम्बर  २०१५  

जमेल तितकं सांग...

बोटं पळतायत... डोकं चालतै... डोळे पाहातायत... अक्षरांची रांग... मन बोम्बलतय... जमेल तितकं सांग* किती अक्षरं आली, आणि पुसली, कधी हसली अन कधी रुसली कैक रात्री बब्बूळांचा अंत बघत लिहीतोय कधी आई बाबांचा, कधी आजी आजोबांचा, कधी मित्रमैत्रणींचा, काही मोठे काही छोटे... आठवणींचे कधी... कधी स्वप्नांचे थवे सोडतोय. आत्ताचा क्षण सरपण सेकंदा पूर्वीचा... ती आठवण आठव अजुन आठव... पानांत अजुन साठव बोटं पळतायत... डोकं चालतै... डोळे पाहातायत... अक्षरांची रांग... मन बोम्बलतय... जमेल तितकं सांग* जमेल तितकं सांग* #सशुश्रीके । १४ नोव्हेम्बर २०१४

फ्रेम (१९९५-९६)

फ्रेम (१९९५-९६) अजुन ही सचिनच्या छोट्या पासून मोठ्या चहर्यासाठी घेतलेली पुस्तके, पेपर्स कात्रणं आहेत. जपून ठेवल्येत... अगदी .३सेमी पासून ५सेमीचे चेहरे कापून फाडून त्याचं क...

अपेक्षा...

अपेक्षा! आज पाडवा... संध्याकाळी माझे सासू सासरे आणि आम्ही सगळे मित्र परिवार बाहेर पडलो जेवायला, 'जाफ्रान' नावाच्या रेस्टोरंटमध्ये गेलो, रेसेप्शनलाच एका वेट्रेसने तोंडाव...