ओंकार अमृते
ओंकार अमृते
हा दिसला पहिल्यांदा दुबईत, कुठे?
आमच्या ऑफिसात,
अर्धे लोक मराठीच त्यात अजून एक भर!
कुठला??
मुंबईचा, गाव घोलवड,
काय करायचा?
माझ्यासारखाच,
'क्रीएटीव्ह' माथाडी कामगार!
डोक्यावरचा प्रत्येक केस जिवंत असल्याचे जाणीव कारवून द्यावे असे उभे, तोंडाचा चंबू… बोलला की दात दिसायचे नाहीत, म्हणून एके दिवशी त्याच्या टेबलावर एका ग्लासामध्ये कवळी ठेवलेली, जाम भडकलेला ते बघून, पण मजा यायची! कायम टीशर्ट मध्ये असायचा आणि विकेंडला हाफ पैंट, त्यात त्याच्या पोटऱ्या म्हणजे 'KFC चीकन लेग्स' सारख्या, त्याच्या एकूण वजनापैकी १०-१५ किलोचे वजन त्याच्या पोट्रयांचेच असेल! नेहमी बाहेरून आला की हातरुमाल घेऊन २-३ कचकचून शिव्या उन्हाळा आणि हवेतील आर्दतेला!
एक किस्सा! - प्रश्नांची उत्तर द्यायची ईतकी घाई की पूर्ण प्रश्न संपे पर्यंत उत्तर देऊन मोकळा, एकदा मी विचारलं एका कर्मचारी मित्राला की "अरे ती फूटपट्टी कुठाय जी आपण रोज वापरतो!?" ओम्कार माझा प्रश्न ऐकून "अरे ती बघ त्या टेबलावर… नाहीये!" म्हणजे एखाद्यानी त्या टेबलाकडे पाहून मग उत्तर दिले नसते, तर हा मनुष्य उत्तर देऊन मोकळा! असे रोज कही ना काहीतरी किस्से घडायचे मग सगळे हसायचे, जाम धमाल यायची!
आमच्या क्षेत्रात अहोरात्र बसून काम करतात त्यामुळे साहजिकच ७०% लोकांना 'पोट' आलेले असते, तसे त्याला ही होते! कणिक हातात धरावी तशी पोटाची चरबी धरून तोंड वाकडे करून म्हणायचा मी उद्यापासून धावायला जाणार! त्याचा उद्या-पर्वा पर्यंत संपायचाही! मग म्हणायचा मरूदे रे, इथे ऑफिसहून घरी जायला मिळत नाही व्यायाम कधी करणार?
असो, कामावरून आठवलं... कामाच्या बाबतीत त्याचे नशीबच खराब, कायम नको त्या लोकांच्या हाताखाली काम केल्यानी बघाव तेव्हा चीडचीड्या मूड मध्ये असायचा! अजून ही परिस्थिती बदलली आहे असं नाही, २००८ साली आलेला दुबईत, जास्त काळ नव्हता पण जेव्हढे दिवस एकत्र होतो, दर वीकेंडला आम्ही सर्व मित्र धमाल कारायचो, जेवायचो, खेळायचो… खूप मजा यायची! ऑफिस मध्ये कैरम आणि जेंगा* (*गुगल करा हा प्रकार, मस्त आहे) आणि १टप्पा बाद क्रिकेट ही खेळायचो, तेव्हा ओंकार असायचाच… ऑफिस नंतर पूल टेबल, बोलिंग, क्रिकेट सर्व ठिकाणी हा हजर, माझ्यासारखाच कुठल्याच खेळात 'नैपुण्य' नसणे हा 'गुणधर्म' असल्यानी आमचे मस्त जमायचे!
जेमतेम १ वर्ष होता दुबईत, तेव्हा एकटे होते साहेब आता लग्न होऊन एक लहान चिमुकली आहे… आई, वडील, बायको आणि गोड पोरगी असा परिपूर्ण संसार आहे! मुंबईला गेलेलो ३ वर्षापूर्वी तेव्हा घरी गेलेलो त्याच्या, मानसोक्त गप्पा मारल्या, फोटोही काढले! माटुंग्या जवळ राहतो त्यामुळे त्याच्या घराजवळच रचनाच्या कचोर्या मिळतात, एकदा आणल्या होत्या त्यानी तो दूबइत असताना, तेव्हा पासून त्या कचोरीचा 'डाटहार्ट फैन' झालोय मी, कोणी मुंबईतून दुबईत येणार असेल तर त्याला नक्की सांगतो की पाठवून दे... आणि तो पठवतो ही!
अरे हो...एक राहिलच!… त्याला बुलेटची भयंकर आवड, मग काय, घेतली ही… नेहमी बुलेट घ्यायची आहे रे असे बोलून दाखवायचा! तसे त्याला 'ट्रक्स' ही खूप आवडतात… आता पुढे मागे 'पर्वा ट्रक घेतला रे' असा कॉल नाही आला म्हणजे मिळवलं!
आता व्हात्स्प आणि एफबी चैट मुळे बरं झालय, त्यावर हाल-हवाल एकमेकांना कळवत असतो आम्ही. जुन्या आठवणीं खोदत असतो, वर्तमनावर हसत असतो... न 'पुढे काय होणार देवास ठाऊक' असे टायपून बिना अलविदा ऑफलाइन पण होतो!
मिलना ही पडेगा, जल्दी मिलेंगे ओंकार...
क्यों की 'रचना कचोरी' से करता हूँ बेहद प्यार,
इन शब्दों को 'रैंडम' मत समझना यार...
इन्ही छोटी छोटी चीजों से याद आती है तेरी बार बार!
#सशुश्रीके | २८जुलै २०१५ सकाळचे ४:२६
Comments
Post a Comment