फडणीस सर...
फडणीस सर...
मॉडर्न हास्कूल जंगली महाराज रोड...
इयत्ता ५वी... विषय चित्रकला...
उंच, मानेतल्या शीरा दिसायच्या बोलताना,
कपाळावर मस्त २इंची भगवा गंध,
फुल बाह्यांचा पण दंडा पर्यंत दुमडलेला शर्ट,
जराशी अखुड प्यांट, भयंकर तापट,
पण हसले की जाम गोड दिसायचे...
आणि हो... लुना वर यायचे,
सर्व शिक्षकांमधे एकदम उंच...
फिट... एकदम हटके!
आमच्या सांगवीच्या खाडे महाराज बाबांचं पोर्ट्रेट केलेलं,
अजुन ही मठात आहे!
काय सुन्दर केलय... ओइल पेंटिंग... अगदी हुबेहूब!
मुंबईतुन पुण्यात आलेलो, ५वीत असेन,
चित्रकला उत्तम तयाामुळे मी लाडका,
त्यांचा वर्ग भरला की माझ्याकडे आवर्जुन येणार,
काय दीवे लावतोय...
आणि प्रकाश पडलेला दीसला...
की त्यांच्या मिशीतून दिसणारे ते स्मित हास्य
यशेची पावती देऊन जायचे!
जिंकलो आज... असा काहीसा चेहरा व्हायचा माझा!
एक आगाऊ पणा केला होता तेव्हा पालकांना घेउन ये उद्या असं आमच्या हेड मास्तरांनी सांगितलं, तेव्हा वडलांना बाजुला घेउन हलक्या आवाजात काहीतरी सांगितलं आणि बाबा हसले, तो क्षण अजुन ही आहे तसा आठवतो, माझा गुन्हा होता मी कॉपी बाळगली हां.. पण कॉपी लिहिताना पाठ झाल्यानी वापरली नाही, पण पायाखाली लोळत असलेलं ते कगादाचं पापी फुलपाखरू शाळॆच्या प्रचंड मोठ्या खिडक्यातुन आलेल्या निष्पाप वाऱ्यानी नेमकं 'मी मी' करत बाईंच्या डोळ्या समोर लोटांगण घालेल हे माझं दुर्भाग्यच! झालेली घटना मी फड़णीस सरांना सांगितली ती त्यांना पटलीही असेल पण जे काय झालं त्याला शिक्षा हवीच! समज वगैरे देऊन सुटका झाली एकदाची!
२वर्षच होतो त्या शाळेत...
त्यामुळे जास्त संपर्कात नाही राहीले,
पण जेव्हा जेव्हा त्यांची आठवण येते
तेव्हा तेव्हा मास्तर असावा तर असा, नाही तर नसावा!
असा विचार आल्या शिवाय रहात नाही.
चुक असली आणि विद्यार्थी कितीही लाडका असला
तरी शिक्षा हवीच,
पण त्या शिक्षे मागे असलेली प्रेमाची सावली तुम्हाला दिसली की बस्स! तुम्ही जिंकलेलं असतं प्रकरण!
असच मी जिंकलेलं... एकदा नाही अनेकदा.
फेयर अनफयर ह्याचा गंध नसतो तेव्हा माझ्या सारख्या प्रत्येकाला एकदा का होइना एक फडणीस सर तो मिलना ही चाहिये!
- सशुश्रीके | १ ओक्टोबर २०१४ | रात्रीचे १२.५४
फडणीस सर.. नुसतं नाव घेतलं तरी उत्साह वाढतो
ReplyDelete
Deleteअगदी मनातलं बोललात
काय सुंदर व्यक्ती रेखा उभी केलीस.
ReplyDeleteमाझं ही थोर भाग्य की मला ही सर 5वी ते 10वी लाभले. त्यांच्या चित्रकले बद्द्ल मी न बोललेलंच बरं.
त्यांनी एकदा इजिप्त मधील pyramids कसे बांधले हे एका off पिरियड ला सांगितले होते. अक्षरशः मी इजिप्त ला जाऊन ते पिरॅमिड बांधताना बघितल्याचा भास झाला. अतिशय ग्रेट व्यक्तिमत्त्व.
काय बोलु सर आमचे देवत्व
ReplyDeleteTruly Inspirational for all the students, Sir you are and will be forever in everyone's heart...
ReplyDeleteMiss you so much...
आयुष्यात फार थोडे शाळेचे क्षण लक्षात राहतात त्यातीलच एक पण मनात भरणारा शिक्षक या शब्दाचा खरा अर्थ
ReplyDeleteखरय, फडणीस सर आपल्याला लाभले हे आपले भाग्यच होते. चित्रकलेची थिअरी सांगताना त्यांनी एक किस्सा असा रंगवला होता की हसून हसून, डोळ्यात पाणी आले होते. क्षीरसागर सर ही तसेच होते.
ReplyDeleteएकदा चौकात, मधल्या सुट्टीत, दगडाचा फुटबाल खेळताना त्यांनी पकडले होते, आणि उन्हात खेळून आजारी पडशील असे सांगताना डोळे वटारून बजावले होते.
सरांना विनम्र श्रद्धांजली...
-- विनायक
मॉडर्न हायस्कूल, १९८४ - १९९५ (१० वी)
फडणीस सरां सारखे शिक्षक लाभले हे आमचे भाग्यच म्हणायला हवे.माझे हस्ताक्षर चांगले वाटले म्हणून सर्व इयत्ते चे केटलोग लिहीण्याची जबाबदारी त्यांनी माझेवर सोपविली होती ते माझे भाग्यच समजतो.सर आपल्याला त्रिवार मानाचा मुजरा.
ReplyDeleteफडणीस सर सारखे शिक्षक लाभले हे मी माझे भाग्यच समजतो. सरांना नक्कीच स्वामींचा साक्षात्कार झाला असणार इतके स्वामींचे हुबेहूब चित्र काढणारे ते एकमेव.
ReplyDeleteअक्कलकोट स्वामी मंदिरात गाभाऱ्यात स्वामीचा एका दगडी ओट्यावर बसलेला अप्रतिम पेन्टिंग आहे नक्की आवर्जून बघा आणि फोटो फ्रेम चे दुकानात फडणीस सरांचा नाव असलेले पेन्टिंग बघितले कि खूप अभिमान वाटतो कि मला हे सर चित्रकला शिकवायला होते
Kyaaa BAAT. Dolyasamor ubhe rahile sir.
ReplyDelete