'समीर' उर्फ 'स्वरूप'
नमस्कार, माझं नाव समीर, हो... माहित्ये जाम कॉमन नाव आहे! पण मला आवडतं, समीर! वय ४६, मागे पुढे कोणी नाही, एकटा जीव सदाशिव. पोटापाण्यासाठी भारतभर फिरलो, आता परत मुंबईत! माझ्या मुंबईत.
३महिन्यापूर्वीच डॉ.प्रधानांकडे जॉब मिळाला. भला माणूस हो! डोळ्यांचा दवाखाना आहे त्यांचा जुना, खुप प्रसिद्ध आहेत आणि तेव्हढेच साधेही, आणि माझ्यासारख्याला जॉब वर ठेवायचे म्हणजे, असो... फोन अटेंड करणे, अपॉइंटमेंट घेणे, दिवसभर हेच काम, त्यांचा अजून एक असिस्टंट आहे पण सध्या सुट्टीवर असल्याने माझ्यावर फुल ऑन लोड, पण माझ्या सारखीच त्यांना हिंदी जुनी गाणी खुप आवडायची त्यामुळे दिवसभर रेडिओ किंवा त्यांच्या काही ठरलेल्या गाण्यांच्या कैसेट्सवर मंद आवाजात एक टू इन वन अखंड चालू असायचा.
त्यादिवशिही रेडिओ चालू होताच, बातम्या चालू होत्या, पण त्यादिवशी बातम्यांकडे दुर्लक्ष करणे महा कठीण, कारण मुंबईत जवळजवळ ७ ठिकाणी लोकल ट्रेन मध्ये एका मागोमाग एक स्फोट झालेले, ईमर्जंसी शिवाय बाहेर पडू नये असे आवाहन दिले जात होते, त्यात ऑड-डे होता आणि संध्याकाळची ऑफीसं सुटायची वेळ त्यामुळे प्रचंड जिवितहानीची शक्यता, त्यात फोन आला, मी उचलला... मी काही बोलण्याच्या आत पलीकडून 'हॅलो, हॅलो... डॉ. प्रधान आहेत का, त्यांचा मुलगा... ट्रेन ब्लास्ट मध्ये... हॅलो...' फोन कट झाला, तेव्हाच डॉ.प्रधान हातात मोबाइल घेऊन बाहेर आले, SMS आला असावा त्यांना बहुतेक, शांत स्वभावाचे डॉ.प्रधान आज कमालीच्या बेचैन स्वरात 'समीर, मी आलोच... आजच्या सर्व अपॉइंटमेंट कैन्सल कर, मी तुला नंतर फोन करीन.' आणि बसलेल्या २ पेशंट्सना 'सॉरी' म्हणून प्रधान निघाले.
मी प्रधानांच्या फोनची वाट पाहात होतो, प्रधानांचा फोनही आला नाही आणि नेटवर्क जाम असल्याने त्यांचा फोनही लागत नव्हता, दवाखान्यात एक जुनं घड्याळ होतं, दर तासाला जितके वाजलेत तितक्या वेळा टोले वाजणारे, रात्रीचे १२ वाजले, आता मात्र मला दवाखान्यात राहवेना, त्याच त्याच बातम्या आणि चिंतेने माझं डोकं सुन्न झालेले, त्यात महिना अखेर, रिक्षेने जायचे पैसेही नव्हते, पण काही पर्यायही नव्हता, मी माझा चष्मा लावला, दवाखाना बंद केला, चालत चालत ट्रेन स्टेशन पर्यंत गेलो, रस्त्यावर नेहमी पेक्षा कमी गर्दी असल्याने ३०-३५मिनिटात पोहोचलो असेन, तेवढ्यात मला काही समजायच्या आत एकाने माझा हात धरला आणि एका कारमध्ये जबरदस्तीने बसवले.
'स्वरुप... मी अरुण जोशी, अपर्णाचा नवरा... '
स्वरुप ह्या नावाने मला कोणीतरी तब्बल १७ वर्षाने हाक मारले असेल, माझे हे खरे नाव कोणा अनोळखी व्यक्तीच्या तोंडातून ऐकल्यावर माझे हात पाय थंड पडले, काही सुचेना, मी गाडीचा दरवाजा उघडायचा प्रयत्न करणार तेवढ्यात त्याने माझा हात जोरात पकडला, मला काही करता येत नव्हतं, माझी अर्धी बाजू अक्षरशः लुळी पडल्यासारखी झालेली इतकी जोरात होती त्याची पकड, मी काही बोलण्याचा आत त्याने बोलायला सुरुवात केलेली.
"स्वरुप, तू कोण आहेस आणि कोण होतास ह्याची सर्व कल्पना आहे मला, तूला घाबरायचं कारण नाही... एव्हरीथिंग विल बी ऑलराईट. तुला जरा माहीत नसलेल्या गोष्टी सांगतो, मी बंगलोरच्या ब्लूचिप केमिकल्सचा मालक, हो... हो तीच ब्लूचिप फॅक्टरी जिथे ५ वर्षांपूर्वी तू तुझे डोळे गमावलेलेस, तुला तेव्हा पहिल्यांदा भेटलेलो, दुर्दैवाने तु पाहू शकला नाहीस मला! तेव्हाच अपर्णाला कळाले की तु लोणावळ्याच्या अपघातात मेला नव्हतास... अपर्णा आणि तुझ्याबद्दल मला तुमचा ऍक्सिडेंट झाला तेव्हापासून माहित आहे, लोणावळ्याला गेला होतात तुम्ही, तुला जेव्हा तिने सांगितले की ती प्रेग्नंट आहे तेव्हा तू मुद्दामून अक्सीडेंट घडवून आणलास, उलट्या दिशेने येणाऱ्या भरधाव टँकर दिसताच स्टेरिंग टँकरच्या दिशेने वळवलेस, अर्थात तू पळून गेलास, तुला वाटले की तू तुझी आयडेंटिटी बदलून ह्या सर्व प्रकारातून मुक्त होशील! त्याच अपघाताला आज १७ वर्षे झाली.'
अचानक माझं जुनं-खरं नाव आणि अपर्णा, हे सगळं जवळजवळ विसरलेलो मी... पण अरुण मात्र एका बाजूला बोलताच होता... "काही आठवत आहे की अजून डीटेल्स देऊ!?"
काही वेळातच गाडी थांबली, त्याने दरवाजा उघडला, घर अगदी मोठं असावं, दरावाज्यापासून सोफ्यापर्यंत जवळजवळ २० पावलांचं अंतर, अरुणने नोकराला ग्लास भरायला सांगितला, मला विचारलं तू काय घेणार, माझ्या तोंडातून 'अपर्णा कुठे आहे!?' हा प्रश्न आला.
अरुण म्हणाला 'रिलॅक्स, १७ वर्ष हा प्रश्न पडलेला का तुला, तुला भेटवणार आहेच तिला, त्यासाठीच तर तुला आणलय इथे, उद्या सकाळी हॉस्पिटल मध्ये भेटू, तू आता आराम कर..."
असं सांगून अरुण निघून गेला, त्याचा नोकर मला एका रूम मध्ये घेऊन गेला, जेवण वगैरे दिले... माझ्या घशातून एक ही घास उतरत नव्हता, कसे बसे ३-४घास गिळून गटागटा पाणी पिऊन झोपण्याचा असफल प्रयत्न केला. माझ्या मनगटावर एक घड्याळ होते, त्यावर एक बटण होतं, किती वाजलेत ह्याचं ऑडिओ यायचं... जवळ जवळ प्रत्येक अर्ध्या तासाच्या अंतराने मी हा प्रकार करत होतो, शेवटी सकाळ झाली, मला बांगड्यांचा आवाज आला... कोणीतरी माझ्याजवळ होतं, कदाचित व्हीलचेयर वर, काहीच क्षणात अरुण आला...
"स्वरुप... अपर्णा तुझ्या बाजूलाच बसली आहे, १७ वर्ष झाली... तिला बोलता येत नाही, आणि तुला... तुला बघता येत नाही, मी तुम्हा दोघांची लिंक आहे आज, तुझ्या कडून कुठल्याच प्रश्नांची उत्तरं नको आहेत आम्हाला, पण अपर्णाची एक अंतिम इच्छा आहे ती मात्र तूच पूर्ण करु शकतोस!"
मला काही केल्या कळेना, काय बोलावं, कसं वागावं... कारण मी केलेल्या कृत्याला क्षमा मागायला ही मला लाज वाटत होती, पण उत्सुकता ही होती तिच्या शेवटच्या इच्छे बद्दल, म्हणजे प्रायश्चित्त वगैरे च्या आसपास जाता येईल असा माझा अंदाज. पण पुढे जे मी ऐकले त्यावर माझा विश्वास बसेना!
"अपर्णाला दिलेल्या कुठल्याही ट्रीटमेंट्स सक्सेसफुल झाल्या नाहीत, तू केलेल्या त्या अमानुष प्रकारामुळे तिने खूप सोसलंय आणि इतक्यावरच थांबलेलं नाही, गेले दीड वर्षाने ती ब्लड कैंसरमुळे रोज मरत्ये... तिने जितकं सोसलं तितकं!... असो... पण तशीच अवस्था तुझी होऊ नये अशी तिची इच्छा आहे, तिला तिचे डोळे तुला द्यायचे आहेत, अजून काहीच दिवस आहेत तिच्याजवळ, मी सर्व तयारी करून ठेवली आहे, पेपर्स रेडी आहेत, आता तुझ्या परवानगिची गरज आहे फक्त."
मी कुठल्या तोंडाने 'परवानगि नाही' असं कसं सांगणार... आणि का सांगावं... अशी संधी परत कधी येणार!? मी घाबरलेलो असलो तरी मनात एका कोपऱ्यात 'मला परत दिसायला लागणार' ह्या विचाराने आशेची लकेर आली.
अपर्णाने माझा हात धरला, दुसरा हात माझ्या डोळ्यांवर फिरवून निघून गेली. अरुण जाता जाता म्हणाला "तू काहीच बोलला नाहीस! तुझं हे मौन मी होकार समजतो, डॉ. प्रधान येतील जरा वेळानी, तुला सगळी प्रोसिजर समजावतील, आणि हो... एक सांगायचं राहिलच... मीच तुझ्याबद्दल नोकरीच्या बाबत शिफारीस केली होती, आमच्या चांगले ओळखीचे आहेत, कालच्या त्यांच्या मुलाचा आणि ट्रेन अपघाताचा काही संबंध नाही, ट्रेन बॉम्बस्फोट होणं हे कारण मिळालं मला आयतं, बाकी सगळं प्लॅंड होतं." तेवढ्यात अरुणचा फोन वाजतो, डॉ.प्रधानांचाच कॉल, अरुण अगदी आनंदाने "वाट पाहत होतो तुमच्याच फोनची डॉक्टर! येताय ना आज, इथे स्वरूप... अरे हो हो.. म्हणजे तुमचा समीर आहे बंगल्यावर, येताना सर्व डॉक्युमेंट्स घेऊन या म्हणजे झालं! हं... अच्छा, भेटू मग! ओके बाय"
पुढचे पाच दिवस मी राहिलो तिथेच, रोज सकाळी अपर्णा येत असे, माझी काही बोलायची हिम्मत होत नसे. रोज 'अपर्णा मला माफ कर' वाक्य मी मनात बोलायचो पण तोंडातून एकदाही जमलं नाही, नंतर अक्खा दिवस मी एकटा असायचो, मला विरंगुळा म्हणून एक रेडिओ, काही जुन्या कॅसेट्स होत्या रूम मध्ये आणि माझं बोलकं घड्याळ.
आज रविवार, नेहमीप्रमाणे आज अपर्णा आली नाही, दुपारी कळलं की तिला ऍडमिट केले आहे, रविवार मध्यरात्री अरुणने मला तिच्या मरणाची बातमी दिली, सोमवार दुपारी माझी डोळ्यांची शस्त्रक्रिया होणार हे निश्चित झाले. प्रचंड तणावात गेलेला आठवडा आणि गेले ५वर्ष घडलेला काळा वनवास, आता संपणार का? हे मोठं प्रश्नचिन्ह आता मला सतावत होतं.
ऑपरेशनच्या आधी मला डॉ.प्रधानांनी एक प्रश्न विचारला, "बेटा समीर... कोणाचा चेहरा पाहणं पसंत करशील, तूझं ऑपरेशन नक्की सक्सेस होईल, तू काळजी करू नकोस!" माझ्या पुढे मागे कोणी नाही, ना माझा कोणी मित्र, माझ्या तोंडून अगदी सहज "मी... मला स्वतः ला बघायचंय" असं उत्तर आलं.
आज मंगळवार सकाळ, माझं ऑपरेशन होऊन आठ तास झालेले, डॉ. प्राधान आणि अरुण आणि काही अजून डॉक्टर्स एकमेकांत बोलतानाचा आवाज ऐकू येत होता, माझ्या डोळ्यावर पट्टी होती, घसा कोरडा पडलेला, मी पाणी पाणी म्हणून ओरडलो, तेव्हा एका व्यक्तीने माझा बेड पाठीपासून वर खेचला, आणि मला पाणी दिलं... अगदी तेव्हाच अरुण म्हणाला "गुड मॉर्निंग स्वरूप, वेलकम टू द न्यू बिगीनिंग! प्रधान साहेब, उघडताय ना पट्टी!?"
डोळ्यांवरच्या पट्टयांचा थर कमी कमी होत गेला, शेवटी दृष्टी साठी पापण्यांवरचा कापूस आणि पापणी ह्या दोन गोष्टींचाच अडथळा राहिला होता.
मी डोळे उघडले, असं वाटत होतं जणू प्रकाश हळू हळू माझ्या डोळ्यात नाही शरीरात शिरतोय! काहीसं अस्पष्ट दिसायला सुरुवात झालेली, चौकोनी फ्रेम... हो.. एक फ्रेम आहे कोणीतरी हातात पाकडलेली, हळू हळू स्पष्ट होत गेलं चित्र... फ्रेम मध्ये अपर्णा असावी! पण.. एक मिनिट, ती फ्रेम नाहीये.. आरसा आहे तो! कारण कारण, माझ्या चेहऱ्याचे हावभाव मला स्पष्ट दिसतायत पण आरश्यात मी नाही!? हे कसं शक्य आहे, मी नाही पण मीच आहे... की अपर्णा आहे त्या आरश्यात! मी वळून बघतो तर माझ्या पाठीशी कोणी नव्हते! म्हणजे मी.. मी अपर्णा?
डॉ.प्रधान थोडे गोंधळून विचारतात "समीर बेटा... दिसतंय ना रे तुला आता!?" मला सांगायचं आहे की मला 'मी'च दिसत नाहीये, दिसत्ये ती अपर्णा! पण, आता ते शक्य नाहीये, कारण... कारण माझ्या तोंडातून आवाजाच्या ऐवजी फक्त हवा येत आहे, माझी वाचा गेली आहे! काही मिनिटांच्याच्या या घटनेत मला २गोष्टींची जाणीव झालेली, की यापुढे मी आता स्वतःला नाही बघू शकत आणि अपर्णा प्रमाणे बोलू नाही शकत. तिने बदला घेतलाय, बदला घेतलाय तिने...
अचानक माझ्या हाताला गरम चटका बसतो... मी झटकन वळून बघतो तर, तर.. अपर्णा हसत हसत मला चहाचा गरम कप दाखवून 'चल निघुयात का चहा पिऊन" असं विचाराते, लोणाळ्याच्या घाटात ट्रॅफिक जॅम मध्ये कधी झोप लागली कळालच नाही, तिच्या हातातला गरम चहा पाहून अपर्णाने गाडी बहुदा फूड मॉल कडे वळवली असावी असा अंदाज आला, मी घामाघूम झालेला पाहून अपर्णा एसी ऑन करते, आम्ही परत हायवेला लागलो, पलीकडून येणारा एक भरधाव टँकर पाहिला, मी अपर्णा कडे पाहिलं, तिने सीट बेल्ट लावलेला नव्हता.
#सशुश्रीके | ३० ऑगस्ट २०१६

व्वा! खूप छान!!
ReplyDeleteव्वा! खूप छान!!
ReplyDeleteजबरदस्त!
ReplyDelete