सच्या आकलेकर.






'सच्या'...
सचिन ह्या नावाला बहुतेक करून सर्वच जण सच्याच् संबोधतात, तसच ह्याला पण...
अभिनव कलामहाविद्यालय पाषाण मधील आमचा २ वर्ष सीनियर खेळाडू... मस्त काम...
पेंटिंग्स कड़क मारायचा आणि अजुन ही मारतो!
व्हॉलीबॉल, क्रिकेट मध्ये नेहमी मैदानावर हजर...
बुटका पण बऱ्यापैकी बळकट शरीर... बोलायला कोल्हापुरी टच... अन हसला की नक्कीच आकाष दिसायचं त्याला... आणि त्याला काय दिसतय वरती म्हणून समोरचा पण वर बघणार... मग काय, जोक असला काय न नसला काय, आकाश बघायला मजा यायची! अजूनही येते...

'अस्सय होय' हे त्याचं ठरलेलं उत्तर! थोडक्यात काय, येडगाव ला जाऊन पेढं खाणारा हा!
लै बाराचा, हाहाहा! खुप धमाल हो... ह्यांच्या ग्रुप पण सही होता... सगळे एक से एक अवली... अणि हो पोरी पण!
लफडं केलेलं / होतं एक, पण काय...
पुढे भगाकार गुणाकार जमले नाहीत,
मग काय अपेक्षे प्रमाणं गणित चुकलं म्हणा... असच काहीतरी!
पण आता छान बायको आहे...
न एक पोराचा बाप आहे,
नोकरी सोडून स्वतःचा छोटा सेटअप आहे...
साइड बाय साइड पेंटिंग्स पण ओढतोय,
टच वुड... एकंदरीत मस्त चाललै गड्याचं!
रडत असतो की काय तेच तेच काम असतं वगैरे,
पण आमच्या नशीबालाच पूजलय, हल्ली तेच तेच करूनच पोटं भरावी लागतात! असो...

सच्याला पूर्वी आठवड्यातुन एकदा तरी नक्कीच भेटाचयो... मुंबईत नोकरीस होतो तेव्हा, तो यायचा घरी किव्वा मी चक्कर मारायचो... सध्या वर्षातून २-३दाच् भेट होते... मग वर्षभराच्या गप्पा... टेंशन्स, जोक्स, कॉलेजच्या आठवणी, छान जातो तो वेळ! अगदी घरातून 'चल येऊ का..' पासून बाइक पर्यंतचा 'बाय' हा ५ ते ५०मिनीताचा ही असू शकतो... डेपेंड्स्... कारण विषय आणि वेळ ह्याचं गणित मांडत बसत नाही आम्ही!

मध्ये एकदा गम्मत झाली...
त्यांच्यासाठी उत्साहानी वाइन आणली मी...
मला काय माहीत वाइन बॉट्टल कॉर्क उघडायाला कॉर्क ओपनर वगैरे लागतो, पोपट... मग काय एकमेकांकडे बघुन निराशा-हास्य-कल्लोळ! अर्थात...आकाशा कडे बघुन.

हा पठ्या, अहो हाच काय...
माझे सर्वच मित्र मी असलो कीच घरी तोंड दाखवतात, त्यामुळे घरी आले कोणी मित्र की आई नेहमीचा टिपिकल नॉट सो सेंटी डायलोग फेकते, मग सच्या आपलं सावरासावरी उत्तर देऊन आकशाकडे बघतो, न डोळा मारून जीभ बाहेर काढत... हो हो अगदी टिपिकल व्हत्साप स्माइली सारखच, रैदर ती स्माइली ह्याचा चेहरा बघुनच बनवली असणार! हो नक्कीच... असा हां हावभाव किंग सच्या...

तसा शाहरातला तसाच गावचा सच्या...
वडील, आजोबा भलतेच कडक, भाऊ वहिनी त्यांची मूलं... स्वतः सच्या त्याची बायको मुलगा
हे सर्व विथ फॅमिली अजुनही एका छता खाली राहतात, फार दुर्मीळ गोष्ट.

सच्या भाऊ... आहेस तसाच भेटत रहा रे
आकाश दाखवतोस तू...
हल्ली आकाशाकडे बघायला वेळ नसतो रे,
तुझ्या निमित्ताने त्याचे डोळे मीटून दर्शन होतं.
पुढच्या भेटीत परत भटू... 'बाय' करायला.



#सशुश्रीके

२० जानेवारी २०१५ रात्रीचे १२.४६

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!

दही पूरी...