तमाशाल्लाह!
तमाशाल्लाह! मुद्दामूनच लोकांची मतं नजरअंदाज करत चित्रपट पाहायला गेलो, इंटरवल पर्यंत चित्रपटातली तीन गाणी संपली, आता तीन उरलेली, आता इंटरवल का असतो हा नेहमीचा प्रश्न पडला, ठरल्या प्रमाणे इंटरवल नंतर पोटाच्या आकाराचे मोठे सॉल्टेड-पॉपकॉर्नचे डबडे घेऊन जागेवर येऊन बसलो... ह्यावेळी त्या डबड्यात मध्येच एक कैरेमलचा पॉपकॉर्न मिळाला, तसा होता 'तमाशा' एकदम हटके! इम्तियाझ अली... मानला बुआ! एक वेगळाच अनुभव, भारतीय सिनेमा आणि संगीत रंगभूमी ह्यांचा सुंदर मिलाप! आणि ह्यातून काय मस्त खुलावतो तो विचारांचे अंतरंग, विविध पेहलू, बारकावे... सध्या तरी कोणी दिग्दर्शक त्याला हात लाउ शकेल असे वाटत नाही, रॉकस्टार मग हायवे आणि आता तमाशा, सर्वांचा आत्मा एक! त्याचं म्हणणं एकच 'स्वतःला ओळखा!' रहमान आणि इम्तियाझ यांची जोडी तर आता इतकी मस्त जमली आहे! 'दो जिस्म इक जान है हम' असा काहीसा प्रकार झालाय, तमाशामधून परत एकदा इम्तियाझचे डोळे आणि रेहमानचे कान उधार घेऊन चित्रपट पाहिल्याचे असीम सुख मिळते! चित्रपटात गाणी अखंड न वापरण्याचा शाप आहे रहमानच्या गाण्यांना... मला त्याची नेहमी ख...