आजीला आमटी खुप आवडायची, दात नसतील म्हणुन काय!? पोळी, भात, थालीपीठ काय जे असेल त्यात आमटी, आमटी कमी असेल तर... त्यात पाणी ओतून गरम करून पोळी कुस्करून खायची, मला ही द्यायची! आणि आमटी नसेल तर चहा पोळी! त्यात माझाही वाटा… ते पण तिच्या हातांनी :) तेलकट कपाळ, कपाळाला अगदी चिकटलेले तिचे अर्धे पांढरे काळे केस, चेहर्यावर सुरकुत्या, ओठांवर उभ्या बडीशोप आकाराच्या सुरकुत्या, जवळपास सर्वच दात गेलेले, एक छोटी काळी टिकली, कानातलं घालायची… ५मोती असलेला तो प्रकार मस्त दिसायचा तिला… लुगडं, बहुदा काही नक्षी असलेले आकाशी निळ्या रंगाचं, पांढरा ब्लाउज, भेगा पडलेले थकलेले पाय, तिच्या पायावर हिरव्या शीरा दिसायच्या, कधी कधी तंद्री लागायची त्या बघताना! हातात बघावं तेव्हा कुठलं तरी देवांचं पुस्तक, तोंडात सदैव देवस्मरण… ऐकायला कमी कमी येऊ लागल्यांनी बाबांनी श्रावणयंत्र आणून दिलेले, कधी कधी मुळीच ऐकू यायचं नाही मग सगळ्यांचाच आवाज वाढायचा, मग म्हणायची "अरे हो हो ऐकू आलाय मला!" म्हातारपण हो! काय इलाज नसतो म्हातारपणाला, असो… मोठा चष्मा… वाचायला आणि लांबचं पहायला ही, तीला गुजरातीही उत्तम यायचं, ब...
कृत्रीमही तेव्हाच जास्त खपतं जेव्हा ते नैसर्गिकची कॉपी असतं किंवा त्या दिशेनं असतं.
ReplyDeleteबाकी नैसर्गिकची वानवा असेल तिथे नाईलाज.
...................छोटा छान विचार!