विधाता
मध्ये काही महिन्यांपूर्वी 'वाह क्या सीन है' चे ६ भाग लिहिलेले, पण आज लिहायला गेलो तर ज्या चित्रपटाबद्दल लिहितोय तो अक्खा चित्रपटच डोळ्यासमोर आला! असो... लिहून टाकलं मग, खूप जिव्हाळ्याचा 'नॉस्टॅलजीक' विषय डोक्यात घुसला की तो लिहिल्याशिवाय चैन पडत नाही. असो... तर लहानपणी घरी काही व्हीडिओ कैसेट होत्या... २०-२५असतील जेमतेम, होमआलोन, डेव्हिड मेजीशीयन, टॉम अँड जेरी वगैरे आणि हिंदी सिनेमामध्ये विधाता म्हणून एक चित्रपट होता, बॉलीवूड इतिहासात काही खास ठसा नसलेला तरी माझ्यासाठी खूपच भारी! कारण पारायणं झालेली पाहून पाहून! सीन न सीन पाठ! दिलीप कुमार आणि शम्मी कापूरचं सुरुवातीलाच एक मस्त गाणं आहे, दोघे आगगाडीचे चालक आणि कोळसा आगगाडीच्या एंजिनात टाकत 'तकदिर है क्या मै क्या जानू... ये खेल है बस ततबीरो का, होतों की चंद लकीरो का' हे गाणं म्हणत तो 'सफर' सत्कारणी लावतायत. नंतर जगावर नावाच्या खालनायका (अमरीश पुरी) कडून दिलीप कुमारच्या तडफदार मुलाचा खून... (ओबेरॉय) त्याच वेळेस दिलीप कुमारच्या नातवाचा जन्म! मुलाला जन्म देताच आईचा मृत्यू, दिलीप कुमारच्या वाटे...