विधाता


मध्ये काही महिन्यांपूर्वी 'वाह क्या सीन है' चे ६ भाग लिहिलेले, पण आज लिहायला गेलो तर ज्या चित्रपटाबद्दल लिहितोय तो अक्खा चित्रपटच डोळ्यासमोर आला! असो... लिहून टाकलं मग, खूप जिव्हाळ्याचा 'नॉस्टॅलजीक' विषय डोक्यात घुसला की तो लिहिल्याशिवाय चैन पडत नाही.

असो... तर लहानपणी घरी काही व्हीडिओ कैसेट होत्या... २०-२५असतील जेमतेम, होमआलोन, डेव्हिड मेजीशीयन, टॉम अँड जेरी वगैरे आणि हिंदी सिनेमामध्ये विधाता म्हणून एक चित्रपट होता, बॉलीवूड इतिहासात काही खास ठसा नसलेला तरी माझ्यासाठी खूपच भारी! कारण पारायणं झालेली पाहून पाहून! सीन न सीन पाठ! 

दिलीप कुमार आणि शम्मी कापूरचं सुरुवातीलाच एक मस्त गाणं आहे, दोघे आगगाडीचे चालक आणि कोळसा आगगाडीच्या एंजिनात टाकत 'तकदिर है क्या मै क्या जानू... ये खेल है बस ततबीरो का, होतों की चंद लकीरो का' हे गाणं म्हणत तो 'सफर' सत्कारणी लावतायत. नंतर जगावर नावाच्या खालनायका (अमरीश पुरी) कडून दिलीप कुमारच्या तडफदार मुलाचा खून... (ओबेरॉय) त्याच वेळेस दिलीप कुमारच्या नातवाचा जन्म! मुलाला जन्म देताच आईचा मृत्यू, दिलीप कुमारच्या वाटेला आलेला भयाण हा प्रसंग बघवायचा नाही त्या वयात... त्यात जगावर दिलीप आणि त्याच्या नातवाच्या मागे, कारण अख्खी फॅमिली संपवायचा हेतू असतो जगावरचा! नीच पणाचा कळस 
पाठलाग करता करता दिलीप एका लहान घरात शिरतो, तिथे अबू बाबा (संजीव कपूर) असतो, दिलीप भाऊ झालेला प्रकार त्याला सांगतो, अबू बाबा इतका दयाळू की दिलिपला असे आश्वासन देतो की तुम्ही बिनधास्त तुमच्या नातवाची जवाबदारी माझ्यावर सोपवा! मी त्याला सांभाळेन, मोठा कारेन! 

दिलीप अधून मधून नातवाला भेट द्यायला अबू बाबा कडे येत असतो, दर वेळी भेट देताना दिलीप कुमार श्रीमंत होत चाललेला असतो, गैर धंदे आणि जुना 'हिसाब चुक्ता' करायच्या हेतूने दिलीप आता डॉनच्या पंक्तीत जाऊन बसलेला असतो, प्रचंड मालमत्ता, मार्सेडीज, आलिशान बंगला हे सर्व आलेलं असत दिलीपकडे, पण  मुलगा, सून नाही... आहे तर नातू पण तो ही जवळ नाही ह्या हळहळीने दिलीप अबू बाबाला सांगतो की मला माझ्या नातवाची गरज आहे, तू कृपा करून त्याला सत्य काय आहे ते सांग आणि त्याला माझ्या घरी घेऊन ये, अबू बाबाला ही त्याची बाजू पटते, पण एके दिवशी नातवासाठी वाढदिवसानिमित्त ठेवलेल्या पार्टीत वाईट लोकांच्या संगतीत येऊन तो लहान वायतला नातू मद्यपान करतो आणि वेटरला शिवीगाळ आणि वाईट वर्तणूक देऊन दिलीप आणि अबू बाबाच्या 'डोक्यात' जातो! दिलीप ला कळते की नातू अजून लहान आहे आणि ह्या आलिशान वैभवामुळे तो बिघडण्याची शक्यता जास्त आहे.. अबू बाबा परत त्याला त्याच्या लहान घरात घेऊन जातात. त्याला समाज देतात आणि... आणि, नातू घोड्यावर बसतो... पुढच्याच सीन मध्ये घोडा आणि तो दोघे मोठे 'घोडे' होतात! टीपीकल बॉलीवूड सीन.. मोठा झालेला टोणगा संजय दत्त झालेला असतो!

ही सगळी कहाणी चालू असते त्यात पद्मिनी कोल्हापूरे आणि संजय दत्त ह्यांचं 'सैराट'  चालू होतं. अमरीश पुरी पाहिल्यापासून 'डॉन' क्षेत्रात असला तरी दिलीप बाबत त्याला फारशी माहिती नसते...  आता खरी गंमत चालू होते! दिलीपसाहेबांचा डॉन वाला रुबाब, काय भन्नाट सीन्स आहेत मग! एकसे-बढ-कर-एक संवाद फेक, डाव पेच आणि फास्ट फॉरवर्ड वाली एक्शन! 

क्रमश: (लवकरात लवकर भाग २ पूर्ण करीन ये वादा रहा) ✌

#सशुश्रीके | २३ ऑगस्ट २०१६

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!