दिपक मोकाशी

हल्ली मित्र होतात…
एफबी फ्रेंड रेक्वेस्ट वरून…
अगदी जीवा भावाचे!

आली होती अशीच फ्रेंड रीक्वेस्ट…
२५०-३०० च्या आसपास असणार लिस्ट

केली एक्सेप्ट…
काही फ्रेंड्स होते मुच्युअल,
आणि त्यात तो ही मी जेव्हा गेलेलो तेव्हाच टर्कीला गेलेला
त्यामुळे एकाच वेळी दोघांचे सिमिलर पोस्ट्स / पिक्स

पण… तब्बल २ महिने भेटलो नाही,
दुबईत घरीच वेळ द्यायची बोम!


पण अखेर त्यानी कॉल केला…
नवीन घरी शिफ्ट झालेलो करामा दुबईत स्टुडीओतून १बीएचके…
मी म्हणालो ये बिंदास! घरीच आहे,
बायको म्हणाली अरे काय आपलं घर लागलेलं नाही काही नाही!
नंतर बोलाव…
पण तो वर उशीर झालेला!
साहेब टैक्सी घेऊन पोचलेले…

आमच्या गप्पा सुरू…

त्या दिवसापासून आजतोवर बस्स गप्पा थट्टा मस्करी


पण कधी कटू क्षण…
कधीच नाही!

कोणी 'डी' म्हणतात कोणी 'दीप्या' कोणी 'मोकाश्या'...


आणि मी कधी कधी 'डी-कैप' म्हणतो कारण हां दीपक सदानकदा कैप लाऊन असतो!

तासन बघितलं तर हां स्वतालाच टोपी लावत असतो असं म्हणायला हरकत नाही...


पण टोप्या इतरांना लावणार नाही हे मात्र तेवढच खरं...
दिल का सच्चा है हमारा 'दीपक मोकाशी'

अगदी बिंदास 'जोशी किव्वा मोकाशी आपलं काम भोकाशी' असं छाती ठोकपाणे सांगणारा...
द्वीअर्थी गप्पांचा देवता... चुकून ही काढ घाल सारखे शब्द वापरलेत खरं नाही!
काल मी हीरवा हुरडा टाकला ह्याला…मी अमुक रंगाचा टाकला!


असं बिन्दास्त उत्तर देऊन माझी लेव्हल गाठणारा हा..

असा हा सोल्लिड मित्तर… उत्तम बाप पण,


म्हणून त्याला कधी कधी डी'बाप' पण म्हणतो मी.
माझ्यात आणि त्याच्यात तसे खुप गोष्टित साम्य आहे...
त्यात एक अमुल्य भर म्हणजे दोघांना मुलगी आहे!
त्यामुळे तो माझा 'सर' पण आहे...
कसं हाताळायचं मुलांना वगैरे मी बघत अलेलोय त्याचं...
त्यामुळे सोप्प नाही जात पण तितकं कठिणही नाही जात!
'डी' मुळचा चिंचवडचा मग मुंबईत नोकरी तिथेच छोकरी
मग ऑस्ट्रेलिया, बहरैन आता दुबईत...

अगदी १ आठवडा भेटलो नाही तरी…'१००००० वर्षं भेट्लो नाही लेका'

असा शाब्दिक आकडेवारीचा बॉम टाकत कडकडीत मिठी ठरलेली!
त्याची बाहरेन मध्ये सिविक तर माझी इथे, दोघेही पुण्यात होतो,

तो टर्कीला गेला तेव्हा मी पण गेलेलो! तो कला क्षेत्रात, मी पण!
तो मनाला येईल ते बोलणारा, नो लपवालपवी, मी पण!
त्याला गोड पोरगी, मला पण! आणि सर्वात महत्वाचं…
त्याला एक बायको मला पण!
अश्या कितीतरी सामान्य / असामान्य साम्य आहे दोघांत!

साम्य नाही , ते कशात…


माझं मोबाईल वर सतत असणं त्याला खूप खटकतं
तो ही तसा गेड्जेट फ्रिक पण मी म्हणजे एडिक्षन असलेला!
तो घरी आला की फोन बाजूला ठेवतो
आणी मी त्याच्याकडे गेलो कि तो WIFI बंद करतो!
नियमच हा! मी पण काही बोलत नाही… FAIR ENOUGH!

बाकी सडपात्तळ पण मस्त हाईट आहे त्याला,
मध्येच शिवाजी महाराजांसारखी दाढी वाढवतो काय मग कापतो काय
फ्रेंच कट, लांब केस + टोपी काहीही चालू असतं
पण जे काही करतो ते त्याला शोभून दिसतं.
उत्तम बोव्लिंग करतो, एक्स बॉ क्स, विई मध्ये तगडा एकदम!
बुधा बार आणि संतूर वगैरे सोफ्ट टच मुसिक पसंत करणारा,
एकूणच ओलरौंडर म्हणायला हरकत नाय!

त्याच्यामुळे त्याचे मित्र माझे आणि माझे त्याचे!
असा मित्रप्रपंच चालू आहे!
जाम मजा येते!
जेव्ह्हा सार्वजण भेटतो!

हल्ली मित्र होतात…
जीवाभावाचे, एफबी वरून का होइना!
जीवाभावाचा दीपक मोकाशी…
















 

#सशुश्रीके । २६ सप्टेंबर २०१४

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!