Posts

Showing posts from December, 2017

स्वप्नं!

Image
दोन प्रकारची स्वप्नं असतात, एक पडणारी एक उभं करणारी!  हो हो... अगदी शब्दशः घेण्या सारखच... #१ - झोपेत स्वप्नं पडतात. आणि... #२ - आयुष्यात एखादी गोष्ट हवी असेल तर हे माझं स्वप्न आहे म्हणतात ना!  असो... काय आहे ना कधी कधी आपण एखाद्या गोष्ट/वस्तू चा इतका विचार करतो की दोन्ही स्वप्न आपटतात एकमेकांना! आणि मग स्वप्नपूर्ती होते किंवा नेमकं उलट. अर्थात स्वप्नातच! पण त्यापुरते का होईना... ते स्वप्न प्रत्यक्षात घडत असल्यासारखा अनुभव मिळतो. लहानपापासून काही अशी स्वप्न आहेत जी अप्रत्यक्षरीत्या लक्षात आहेत, कुठे ना कुठे तरी संदर्भ लागतो आणि कमालीचं आश्चर्य होतं, हे जग वेगळच, प्रत्येकाला हा अनुभव छोट्या मोठ्या प्रमाणात येत असावा! इनसेप्शन सारख्या सिनेमातुन हा विषय वेगळ्याच पद्धतीने मांडलाय म्हणा, पण तो शेवटी सिनेमा आहे... आपल्या आयुष्यात आपण पाहिलेल्या स्वप्नांची लिंक हा एक वेगळाच प्रकार आहे, वेगळं जग आहे हे! कधी ही रिलीज होतो हा स्वप्नांचा बाजार, आणि त्यातले कलाकार वस्तू पण चक्रावून सोडणारे, कधी आनंदात बुडवणारे कधी दुःखात लोळवणारे! चला मस्त झोप झाली...

#बाबा तू...

Image
बाबा तू... एक हिरो होतास तू, एक व्हिलन पण होतास तू, जसा हसवायचास तू, तसा रडवायचास पण तू. किती तरी दूर राहून जवळ होतस तू, एखाद्या सेलिब्रीटी सारखा जणू, भासलास तू. माझ्या हट्टांना क्वचितच 'नाही' म्हणालास तू, स्वतःचं दुःख कधीच सांगितलं नाहीस तू. आणि मग... फारच लवकर सोडून गेलास तू! तू परत ये रे तू... एकदा भेटू, एकदा हातात हात दे तू... एकदा मिठी मार तू, एकदा काही तरी चमत्कार घडव तू! कारण बाबा तू... तू माझा हिरो होतास, आज ही आहेस तूच. नक्की परत ये तू... तुझ्या साठी अजून ही तोच समीर, कोणी वाढू दिलाच नाही जणू... अजून ही बालिश, तोच गोरा घारा, तुझ्या कैमेराचा तारा! तू माझे काढलेले शेकडो फोटो... ते बघताना नेहमी दिसतोस केमेऱ्या मागचा तू! बघ बरं... तो शेवटचा रोल का निगेटिव्ह सोडलायस तू

COCO (2017)

Image
गेल्या २१वर्षातल्या पिक्सार च्या इतिहासातला एक वेगळाच अनुभव म्हणजे कोको! असं का म्हणतोय मी!? कारण आहे... आत्ता पर्यंत प्राणी, पक्षी, मासे किंवा चौकोनी/त्रिकोणी वगैरे चेहरे असलेले अथवा रबरी खेळणी, वाहनं वगैरे असलेले अनिमेशनपट आले, आणि प्रेक्षकांनी त्याचं कौतुकही केलं पण हा कोको हटके आहे नक्कीच. केवळ अप्रतिम... अगदी खरे वाटावे इतके विस्तारित मानवी हावभाव! 'कोको' म्हणजे म्हातारी आहे एक (मुख्य व्यक्तिरेखाची पणजी), तिचा सहभाग जरी कमी असला एकूण चित्रपटात तरी मूळ कथानक तिच्या अवतीभवती फिरत असतं कळत नकळत, पण मस्त धम्माल आहे आहे एकूणच! एका मेक्सिकन गावातकली कथा आहे... कोकोचे वडील (एनरेस्टॉ दे ला क्रुज), कुटुंबातले एकमेव कर्ता धर्ता असूनही जेव्हा संगीतवेडे असल्यामुळे कुटुंबाच्या जवाबदारीला विसरून निघून जातात आणि परत येत नाहीत (ह्याचं कारण ही फार विनोदी आहे, आणि ते ही प्रत्यक्षात चित्रपटगृहात पहावं असच) तेव्हा त्यांची बायको नाईआजास्तव बुटांचा व्यवसाय सुरू करते मग पुढच्या सर्व पिढ्या तोच व्यवसाय करतात,  संगीताचा 'स' सुद्धा घरात निघणार नाही अशी खबरदारी घेत असते घरातली प्र...