COCO (2017)


गेल्या २१वर्षातल्या पिक्सार च्या इतिहासातला एक वेगळाच अनुभव म्हणजे कोको!
असं का म्हणतोय मी!? कारण आहे...

आत्ता पर्यंत प्राणी, पक्षी, मासे किंवा चौकोनी/त्रिकोणी वगैरे चेहरे असलेले अथवा रबरी खेळणी,
वाहनं वगैरे असलेले अनिमेशनपट आले, आणि प्रेक्षकांनी त्याचं कौतुकही केलं पण हा कोको हटके आहे नक्कीच.
केवळ अप्रतिम... अगदी खरे वाटावे इतके विस्तारित मानवी हावभाव!


'कोको' म्हणजे म्हातारी आहे एक (मुख्य व्यक्तिरेखाची पणजी), तिचा सहभाग जरी कमी असला एकूण चित्रपटात तरी मूळ कथानक तिच्या अवतीभवती फिरत असतं कळत नकळत, पण मस्त धम्माल आहे आहे एकूणच!
एका मेक्सिकन गावातकली कथा आहे... कोकोचे वडील (एनरेस्टॉ दे ला क्रुज), कुटुंबातले एकमेव कर्ता धर्ता असूनही जेव्हा संगीतवेडे असल्यामुळे कुटुंबाच्या जवाबदारीला विसरून निघून जातात आणि परत येत नाहीत (ह्याचं कारण ही फार विनोदी आहे, आणि ते ही प्रत्यक्षात चित्रपटगृहात पहावं असच) तेव्हा त्यांची बायको नाईआजास्तव बुटांचा व्यवसाय सुरू करते मग पुढच्या सर्व पिढ्या तोच व्यवसाय करतात,  संगीताचा 'स' सुद्धा घरात निघणार नाही अशी खबरदारी घेत असते घरातली प्रत्येक व्यक्ती, संगीत द्वेष अगदी परमोच्च अवस्थेत गेलेला असतो, अश्यातच 'मिगेल'हा एक १२वर्षीय मुलगा, (त्या कोकोचा पणतू बरका) म्हणजेच चित्रपटातला 'मुख्य नायक' मात्र पारंपरिक बुटांच्या व्यवसायात काडीमात्रही रस न दाखवता गपचुप संगीत शास्त्रात नैपुण्यता कमवत असतो,
त्याच्या पणजोबांच्या चित्रफिती/ध्वनिफितींच्या आधारे नियमीत संगीत भूक मिटवत असतो.

एके दिवशी त्याला हे सर्व करताना त्याची आई पकडते, त्याने कष्टाने हुबेहूब पणजोबांच्या सारखी बनवलेली गिटार ही तोडते आणि नेमकी तेव्हाच गावात असते एक संगीत स्पर्धा, मिगेल तिथे खूप अपेक्षेने जातो पण कुठलं ही वाद्य असेल बरोबर तरच समावेश संभव असतो आणि नेमकी त्याच्याकडची गिटार मात्र उध्वस्त झालेली असते,
अश्या वेळी त्याला एकच गिटार आठवते, त्याच्या गावात त्याच्या पणजोबांच्या स्मरणार्थ एक वास्तू असते,
त्यात त्यांची गिटार ठेवलेली असते, ती गिटार घेऊन संगीत स्पर्धेत भाग घ्यायचा हा एकच उपाय त्याला दिसत असतो, मिगेल कसाबसा त्या वास्तूत शिरतो, गिटार फ्रेम लटकवतात त्या सारखी एका भिंतीवर लटकवलेली असते,
मिगेल ती गिटार हातात घेतो, तेव्हढ्यात बाहेरून कोणीतरी 'गिटार भिंतीवर नाहीये, चोर... चोर' वगैरे आरडाओरड सुरू होते आणि...

अचानक कथानक एक वेगळेच वळण घेते...
हे वळण कमालीचं आणि भयानक विनोदी आहे, सुरुवातीला पचतच नाही,
पण जस जसा सिनेमा एक एक पत्ते फेकत जातो तस तसं तुम्ही त्या कथानकाच्या जुगारात अडकत जाता...
जोकर नावाचा पत्ता बाजूला ठेवण्या ऐवजी तोच पत्त्यांच्या एक्का बनतो, अगदी सिनेमा संपे पर्यंत!
नियम वगैरे न जुमानता कथानक पुढे सरकत जातं,
आणि आपण ही युक्तिवाद/तर्कशास्त्र लाऊन काय बरोबर आहे काय नाही?
ह्याचा विचार करत करत आपले पत्ते लपवत गंमत पाहत बसतो!

लहान मुलांनीच एनिमेशनपट पाहावेत किंवा त्यांसाठीच असावेत,
ह्या गोड गैरसमजाला कोकोने अगदी त्रिफळाचीत केलेलं आहे,
माझ्या मुली पेक्षा (अन्वया वय सव्वा पाच) दुप्पट आवडीने मी पाहिला असेन हा सिनेमा!
मी काय माझ्या बायको आणि मित्राने आणि त्याच्या बायकोनेही,
हसत तर सगळे होतोच वेळोवेळी पण एक भावुक क्षण तर असा होता...
की मित्राच्या बायकोने डोळे पुसायला मेदयुक्त कागद वगैरे मागितला.

सुरुवाती पासून शेवटपर्यंत असा एक ही क्षण नव्हता जेव्हा वाटलं असेल की कधी संपेल हा चित्रपट...
इतका उत्कृष्ठ. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये दाखवलेली कमालीची कलात्मकता,
सिनेमा पाहिला की कळेलच मी काय म्हणतोय ते... आग्रह असा की नक्की चित्रपटगृहातच पहा!

अप्रतिम कथानका करीता माझ्याकडून ४तारे,
आणि अफाट कला प्रदर्शना साठी अर्धा अधिक तारा...
एकूण साडे ४ तारे. 👍👌

#सशुश्रीके १/१२/१७
लघु चित्रफीत - https://youtu.be/zNCz4mQzfEI





Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!