#बाबा तू...

बाबा तू...

एक हिरो होतास तू, एक व्हिलन पण होतास तू,
जसा हसवायचास तू, तसा रडवायचास पण तू.

किती तरी दूर राहून जवळ होतस तू,
एखाद्या सेलिब्रीटी सारखा जणू, भासलास तू.

माझ्या हट्टांना क्वचितच 'नाही' म्हणालास तू,
स्वतःचं दुःख कधीच सांगितलं नाहीस तू.

आणि मग...
फारच लवकर सोडून गेलास तू!
तू परत ये रे तू...

एकदा भेटू, एकदा हातात हात दे तू...
एकदा मिठी मार तू,
एकदा काही तरी चमत्कार घडव तू!

कारण बाबा तू...
तू माझा हिरो होतास,
आज ही आहेस तूच.
नक्की परत ये तू...

तुझ्या साठी अजून ही तोच समीर,
कोणी वाढू दिलाच नाही जणू...

अजून ही बालिश, तोच गोरा घारा,
तुझ्या कैमेराचा तारा!
तू माझे काढलेले शेकडो फोटो...
ते बघताना नेहमी दिसतोस केमेऱ्या मागचा तू!

बघ बरं...
तो शेवटचा रोल का निगेटिव्ह सोडलायस तू

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!