स्वप्नं!

दोन प्रकारची स्वप्नं असतात,
एक पडणारी एक उभं करणारी! 

हो हो... अगदी शब्दशः घेण्या सारखच...
#१ - झोपेत स्वप्नं पडतात.
आणि...
#२ - आयुष्यात एखादी गोष्ट हवी असेल तर
हे माझं स्वप्न आहे म्हणतात ना! 


असो... काय आहे ना कधी कधी आपण एखाद्या गोष्ट/वस्तू चा इतका विचार करतो की दोन्ही स्वप्न आपटतात एकमेकांना! आणि मग स्वप्नपूर्ती होते किंवा नेमकं उलट.
अर्थात स्वप्नातच!

पण त्यापुरते का होईना... ते स्वप्न प्रत्यक्षात घडत असल्यासारखा अनुभव मिळतो.

लहानपापासून काही अशी स्वप्न आहेत जी अप्रत्यक्षरीत्या लक्षात आहेत, कुठे ना कुठे तरी संदर्भ लागतो आणि कमालीचं आश्चर्य होतं, हे जग वेगळच, प्रत्येकाला हा अनुभव छोट्या मोठ्या प्रमाणात येत असावा!
इनसेप्शन सारख्या सिनेमातुन हा विषय वेगळ्याच पद्धतीने मांडलाय म्हणा, पण तो शेवटी सिनेमा आहे... आपल्या आयुष्यात आपण पाहिलेल्या स्वप्नांची लिंक हा एक वेगळाच प्रकार आहे, वेगळं जग आहे हे! कधी ही रिलीज होतो हा स्वप्नांचा बाजार, आणि त्यातले कलाकार वस्तू पण चक्रावून सोडणारे, कधी आनंदात बुडवणारे कधी दुःखात लोळवणारे!

चला मस्त झोप झाली आज, एक जुनं स्वप्न पाहिलं, आठवत नाहीये ही गोष्ट अलाहिदा! पण त्यातच मजा आहे... इथे पायरसी पण नाही करता येत, जो भी है सब ओरिजिनल, आता परत कधी हा अनुभव मिळेल देवास ठाऊक! 😇

#सशुश्रीके | १९ डिसेंम्बर २०१७


Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!