#XYZ आणि कॉलेजचे दिवस...


       आमच्या कॉलेज मध्ये एक एक नग भरले होते त्यातला एक होता नाव त्याचं #XYZ, काय डेंजर होता हा! म्हणजे... आमच्या मधला असून ही एखाद्या मास्तरा सारखा दिसणारा, पोलिशी कपडे म्हणजे खाकी पॅन्ट काळे बूट, चेहऱ्यावर १/२छोटे वार, गहू वर्णीय ... नाना पाटेकर चा लांबचा नातेवाईक म्हणा हवं तर! 'बघ ह्याची कशी घेतो' असं हसत म्हणणारा, दुसर्या क्षणात गंभीर चेहर्याने ज्याची घ्यायची आहे त्याला हाक मारणारा! की मग चालू...

       एक किस्सा सांगतोच त्याचा -
भूक लागली पण खिश्याला कोण विचारतय, पोरांकडे पैसे नसायचे (कोणाकडे ही नाहीयेत, हे हॉटेलात शिरल्यावर कळायचं) पण हॉटेलात जाऊन खायला मात्र हवं! हे कळल्यावर XYZ सांगायचा 'बिंदास जेवा, मी भरतो बिल' ... बिल टेबलावर येण्याआधीच कैशीयर कडे जाऊन पैसे मागायचा!

कैशीयर म्हणायचा 'इतके इतके झाले पैसे.'
त्यावर XYZ गंभीर आणि दाणेदार आवाजात सांगे '५००ची नोट दिली की... वरचे सुट्टे कोण देणार!?'
हे सगळं वरच्या आवाजात असला कॉन्फिडेंटली बोलायचा की बास रे बास! उलट आम्हाला खायला घालून ह्याला पैसे मिळायचे वर! 😅

       असे भरपूर आणि Social media वर न ओतता येण्या सारखे पण किस्से आहेत! 😎 काय एक एक अवली टोणगी होती कॉलेजात, आम्ही म्हणजे फारच मूळमुळीत होतो असं वाटतं आता! थोडक्यात काय, एका वर्गात एक तरी असा असतोच... नसला की मग मजा नाय! आम्ही जाम मजा केली कॉलेजात, चायला... तेव्हा नको नको वाटणारं कॉलेज आता अधून मधून आठवून डोक्याला शॉट देतंय 😆

       'लहान पण देगा देवा' च्या नंतर
       'कॉलेज मधले दिवस देगा देवा!'
       असं म्हणायला हरकत नाही!

#सशुश्रीके २९/०१/२०१८

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!