सस्पेन्स!

आमच्या ऑफिस मध्ये घडलं हे...
ज्युनियर डिजाइनर...
माझ्या बाजूलाच बसणारा..
काम करता करता रडायला लागला अचानक!
मला कळेना,
कारण मला बोलावलेलं बॉस ने तेव्हा प्रमोशन दिले
आणि आता हा रडतोय!
उडवला की काय त्याला..
की अजून काय?

तितक्यात एक मुलगी (एम्प्लॉई) आली
त्याला रडताना पाहून त्याला घेऊन गेली कुठेतरी
१मिनिटाने तो परत आला...
रडणे थांबलेले आणि हसत होता
गुलाबी गुलाबी!

त्याला मग मी नंतर विचारलं..
बाबा काय झालं...
ऑल ओके ना..
तू रडत वगैरे होतास!

म्हणाला सगळं व्यवस्थित...
मला प्रोमोशन दिले,
मी आता ज्युनियर नाही..
नुसता डिजाईनर... ज्युनियर नाही!

आनंदाश्रू होते ते! 🤣

माझा जीवात जीव आला तेव्हा!
उगाच मधला अर्धा एक तास सस्पेन्स मध्ये गेला तो जेवायला गेलेला त्यामुळे! 🙄


#सशुश्रीके । १८ ऑक्टोबर २०१८

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!