लॉकडाऊन २०२०

लॉकडाउन सुरू आहे, बाहेर पडता येत नाही मुलांना... घरी किती खेळणार!? पण एक असाही फायदा

माझी पोर, अन्वया म्हणते...

एम लविंग धीस फॅमिली टूगेदरनेस, बिग हग्स... उनो गेम्स, कार्ड्स... पिलो फाईट्स! 

पण...

आय हेट वर्चुअल / ऑनलाइन स्कूल, पण माझा स्क्रीन टाइम वाया जातो 

पासून...

"बाबा फोन कडे बघ" स्क्रीन लॉक उघडायला की नेटफ्लिक्स सुरू... आवडते कार्टून / शोज पाहायला मोकळी! आई रोज नवीन नवीन पदार्थ करत्ये... आज काय पास्ता उद्या काय केक!

हे सगळं चालू असताना घरी गंभीर करोना विषय पण मग लगेच "आय हेट धिस करोना, कधी संपणार हे!?"

मग विचार येतो.. 

हे संपेल नक्कीच कधीना कधी, पण गार्डन मध्ये खेळणारी मुलं, सगळ्यांच्या तोंडावर मास्क्स असणार! अंतर ठेवून खेळणार की काय मुलं आता... होच मुळी... निदान पुढे १ दीड वर्ष तरी हे सगळं नॉर्मल असणार!

ह्या 'निगेटिव्ह' मधून पण 'पोझीटीव्ह' वेचून काढणं चालू आहे गेले दीड महिने आणि अजून किती महिने जाणारेत असे माहीत नाही.

आपलं ठीक आहे हो, लहान मुले, वयस्कर नागरिकांची मनस्थिती बद्दल विचार केला की मन जड होतं.

आणि...

पोलीस, डॉक्टर्स, डिलिव्हरी बॉइज, सफाई कामगार आणि ज्यांना ज्यांना कामावर जावं लागतच त्यांचं काय!?

लॉकडाऊन वाढवलं तरी शिव्या,
नाही वाढवलं तरी पंचाईत!

किती कठीण समय आहे. लोकांनी समजूद्दार पणे वागले पाहिजे, सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीत ते तर खरे खलनायक आहेत ह्या दिवसात. 

अजून एक

जे दुसऱ्या देशात/राज्यात/शहरात/गावात अडकलेत त्यांच्या बद्दल पण वाईट वाटतं. 

पण काय करू शकतो ह्याबाबत, लिहून काढायचं... बोलायचं, ह्या शिवाय काही नाहीये हातात. 

इतका हतबल माणूस झाला नसेल इतक्या मोठ्या प्रमाणात, म्हणजे जगभरात असं काही होईल असं वाटलं नव्हतं ते पण असं इतक्या कमी वेळात.

इकडे आड तिकडे विहीर.

काहींना जेवायला मिळत नाहीये काही रोज वेगवेगळे नवीन पदार्थ खाऊन घरी मजा करतायत, कोणी एकटे झुरत आहेत कोणी घरी आपल्या आप्तजनांबरोबर सुखरूप आहेत... भयंकर कॉन्ट्रास्ट आहे.

त्यामुळे आज एक भजन आठवलं... नेहमीच आठवतं म्हणा... बोल असे काही...

"ईक झोली मै फूल खिले है...
ईक झोली मै काटे रे,
कोई कारण होगा."

पण काय हे कारण?

हा करोना कोणाला मारतोय कोणाला जगायला शिकवतोय, वेगवेगळ्या सवरूपात.. शारीरिक मानसिक. 

करोनानंतर जग पूर्वीसारखं नसेल, खूप काही बदलेल, काही बदल चांगले असतील. काय चांगले असेल काय वाईट ह्याबद्दल लिहायची गरज नाही, कारण इतकं चर्वीचरण झालं आहे ह्याबद्दल लोकांचं की आता कंटाळा आलाय!

मी ही आता हे सगळं लिहून काय मिळवलं माहीत नाही, पण व्यक्त झालो की हलकं वाटतं, तसच काहीतरी.

सगळ्यांना ह्या लॉकडाउनचा कमीतकमी त्रास व्हावा, सर्वांना त्यांच्या त्यांच्या कुटुंबाकडे जाता यावे, सर्वांना पोट भरून जेवण मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🏼

अडकलेला #सशुश्रीके | २ मे २०२०

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!