Posts

Showing posts from March, 2021

वाट बघा

वाट बघा... सकाळी अलार्मची अलार्म नंतर पाण्याची मग सुरूच दूध वाल्याची पेपर वल्याची नाश्त्याची चहा/कॉफीची गरम पाण्याची गरम इस्त्रीची रिक्षाची बसची ट्रेनची त्या मिळाल्या की नीट उभं / बसायला मिळायची स्टेशनसच्या स्टेशनची लिफ्टची लंच टाईमची वरकिंग अवर्स संपण्याची परत उलटा प्रवास.. अशी वाट बघत बघत ५/६दिवस संपायचे मग लगेच वाट... वीकेंडची! आज नो वाट जस्ट थाट! जस्ट रिलॅक्स... सगळं कसं आरामात असा तो १ दिवस कोणाचे तर २! त्या १/२ दिवसासाठी अख्खा आठवडा बघायला लागायची वाट अशोक मामाने तसेही म्हंटलच आहे बनवाबनवीत म्हणजे काय... वाट बघा! अश्या वेगवेगळ्या वाटा येत जात असतात! त्याशिवाय काय आहे म्हणा! वाट बघण्याशिवाय हातात काय असतं म्हणा? बघतो आता वाट कंमेटची न लाईक्स ची 😂 दुसरं काय हातात आसतं म्हणा! हा एक फोन सोडलं तर तुमच्या हातात ही काहीच नाहीये! 😆 #सशुश्रीके २०२०/०२/१०

राम आणि श्याम दोन साबण असतात...

 राम आणि श्याम दोन साबण असतात माझ्या न्हाणीघरात, एक आवडता एक नावडता, दोन्ही असतातच, एक संपायला लागला की त्याच्या पाठीवर दुसरा अगदी *विक्रम वेताळ* टाईप्स... हे लिहायचं विशेष कारण म्हणजे आज हे दोघे संपले! पहिल्यांदाच वेळ आली ही माझ्या ३८ वर्षांच्या स्वच्छ चकचकीत कारकिर्दीत!!! ब्रेक मिळतो दोघांना जेव्हा दिवाळी येते मोती किंवा म्हैसूर नावाचा आडदांड भाऊ येऊन त्यांना आराम देतो... पण ह्यावेळी हे दोघे माझ्या आळशीपणा मुळे शहीद झाले! हातात घेताच काही क्षणातच ह्या निष्ठुर जगात गायब आता नवीन साबण येणार उद्या न्हाणीघरात... नवीन दिवस नवीन सगळं... नवीन राम नवीन श्याम ची वाट बघणार आणि मग दोघे नवीन रामची! स्वच्छ राम-श्याम भक्त #सशुश्रीके 🤣

जुनं ते सोनं

आक्षी बद्दल किलोभर लिहून झालंय... काही सोडलं असेन असं वाटत नाही, पण तरी इतका जीव अडकलाय तिथं काय विचारायची सोय नाही, असं वाटतं एक पेरेलल जग असावं तिथं आपलं, म्हणजे कसं पटकन डोकावता यावं कधी ही कुठून ही.. अशी एक खिडकी नाहीतर दरवाजा. घरी कधी नावडती भाजी किंवा काही खास मेनू नसेल की लगेच त्या दरवाज्यातून हळूच आत जायचं की वर्तमान बंद न भूतकाळ सुरू... आजी मला बघणार... हसणार! "आली का माझी आठवण, आज काय करू... पानगी की दडपे पोहे!?"मी मला बघणार... डोळ्यात माझ्या असली चमक जणू आजी नाही कुठला तरी तारा बघतोय!!!   आजी... आजी काय सुंदर होती माझी आजी काय सांगू, किती सांगू! आई शप्पत सुंदर होती, अतीशयोक्ती नाहीच... ती बोलत नसली तर तिच्या बांगड्या बोलत असायच्या, विळीवर भाजी चिरताना... अंगणात शेण सारवताना... म्हशीला पेंढा घालताना... अखंड बांगड्यांचा आवाज... 'अगदी सराऊंड साउंड / डॉल्बी डिजिटल' कधी पुढून कधी बाजूने! त्या बांगड्या कधी थांबलेल्या आठवत नाहीच. अशी ही ऑडिओ स्वरूपातली चरचरीत आठवण झोपेचा अलगद गोड खून करते. हे आठवण प्रकरण, स्पेशली आजी आणि आक्षी... हे वाईट्ट कॉम्बिनेशन आ...

'टर्म्स अँड कंडीशन्स अप्लाय!'

मुंबईत होतो तेव्हा लोकल मधून प्रवास करायचो तेव्हा चाळी /इमारती दिसायच्या... त्यांच्या खिडक्यांमधून पंखे दिसायचे... काही श्रीमंत काही गरीब  प्रत्येक खिडकी वेगळी वेगळं सगळं काही सेकंद दुसऱ्या घरात डोळे अडकायचे, काय असेल त्यांचं जग ह्याचा विचार काही सेकंद स्वतःच्या जगाचा विचार बाजूला ठवून असं दुसऱ्यांच्या जगात डोकवायचं मला कधी कधी वाटतं की असं सहज शक्य असतं विचार करणं तसं दुसऱ्या माणसात आपण जाऊन कसं वाटेल!? म्हणजे दुसरा आपल्यात त्याच्यात आपण! दृष्टिकोन सोडा... थेट आत्मा चेंज... धिस इज बीयोंड सायन्स आय नो...  काय होईल असं झालं तर!? अजब ना... रिक्षा वाला... चहा वाला पासून थेट तेंडुलकर अंबानी वगैरे एक्सपेरिअन्स डिजाईन / प्रोडक्ट.. व्ही आर वगैरे हे सगळे बेसिक प्रकार... प्रायव्हसी इज इशू! पण करा ना असा विचार विचार करायला नो बौन्ड्रीज थिंक वाईल्ड... जग मोठं आहे... आपलं मनाचं जग छोटं आहे!  आत्ता ठरवलं तर तुम्ही तुमच्या वयाच्या कुठल्याही टप्प्यात जाऊ शकता... हे भारी आहे! हवं युरेका पेक्षा मोठं आहे! #सशुश्रीके ला वेड लागलं आहे का वगैरे असा विचार होऊ शकेल हे वाचून, पण आत्माला परिसीमा ...

पांघरूण

भयंकर झोप येत असते, हा देह त्या पलंगावर स्वतः ला खिंडीत ढकलून दिल्या सारखा कोसळतो... आणि महा भयंकर कंटाळा येतो ते पांघरूण घ्यायला... नीट घडी करून पायाखाली असलेले! कोण देणार का ते पांघरूण अंगावर...  आता झोप आणि माझ्यात कटुता निर्माण व्हायला सुरुवात ते पाय मध्यस्थी करू पाहतात, पण ते हात थोडीच आहेत, हातांचा न्यूनगंड न मनाचा आळशीपणा तसाच! पाय मात्र लढा देणे सोडत नाहीत, अर्धी खिंड जिंकली... घुडघ्यापर्यंत पांघरूण येतं!  १० मिनिटांच्या ह्या ओढाताणीत झोपेचा खून होतो... पुढचे १/२ तास पांघरूण अंगावर असून ही निद्रा नाराज महोत्सव चालू असतो! शेवटी नकळत कधीतरी निद्रा देवता प्रसन्न होते!  सकाळी जाग येते तेव्हा पुन्हा त्याच पांघरुणाचे ऋण पलंगाखाली धारातीर्थी झालेले असते! ह्या पांघरुणाला कोणीतरी अक्कल द्या रे... तंत्रज्ञान इतकं पुढं गेलं, पण ह्या विषयात कोणी काहीच केलं नाही अजून ही!  निषेध निषेध निषेध समस्त झोपमोडी संघटना सदस्य #सशुश्रीके ह्यांच्याकडून बेअक्कल पांघरूण समाजाचा त्रिवार निषेध