वाट बघा


वाट बघा...


सकाळी अलार्मची
अलार्म नंतर पाण्याची
मग सुरूच

दूध वाल्याची
पेपर वल्याची
नाश्त्याची
चहा/कॉफीची
गरम पाण्याची
गरम इस्त्रीची
रिक्षाची बसची ट्रेनची
त्या मिळाल्या की
नीट उभं / बसायला मिळायची
स्टेशनसच्या स्टेशनची
लिफ्टची
लंच टाईमची
वरकिंग अवर्स संपण्याची
परत उलटा प्रवास..

अशी वाट बघत बघत
५/६दिवस संपायचे
मग लगेच वाट...
वीकेंडची!

आज नो वाट
जस्ट थाट!
जस्ट रिलॅक्स...
सगळं कसं आरामात

असा तो १ दिवस
कोणाचे तर २!

त्या १/२ दिवसासाठी
अख्खा आठवडा
बघायला लागायची वाट

अशोक मामाने तसेही म्हंटलच आहे बनवाबनवीत

म्हणजे काय... वाट बघा!
अश्या वेगवेगळ्या वाटा येत जात असतात!

त्याशिवाय काय आहे म्हणा!
वाट बघण्याशिवाय हातात काय असतं म्हणा?

बघतो आता वाट कंमेटची न लाईक्स ची 😂 दुसरं काय हातात आसतं म्हणा! हा एक फोन सोडलं तर तुमच्या हातात ही काहीच नाहीये! 😆

#सशुश्रीके २०२०/०२/१०

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!