राम आणि श्याम दोन साबण असतात...

 राम आणि श्याम दोन साबण असतात माझ्या न्हाणीघरात, एक आवडता एक नावडता, दोन्ही असतातच, एक संपायला लागला की त्याच्या पाठीवर दुसरा अगदी *विक्रम वेताळ* टाईप्स...

हे लिहायचं विशेष कारण म्हणजे आज हे दोघे संपले! पहिल्यांदाच वेळ आली ही माझ्या ३८ वर्षांच्या स्वच्छ चकचकीत कारकिर्दीत!!!

ब्रेक मिळतो दोघांना जेव्हा दिवाळी येते मोती किंवा म्हैसूर नावाचा आडदांड भाऊ येऊन त्यांना आराम देतो... पण ह्यावेळी हे दोघे माझ्या आळशीपणा मुळे शहीद झाले!

हातात घेताच काही क्षणातच ह्या निष्ठुर जगात गायब

आता नवीन साबण येणार उद्या न्हाणीघरात... नवीन दिवस नवीन सगळं...

नवीन राम नवीन श्याम ची वाट बघणार आणि मग दोघे नवीन रामची!

स्वच्छ राम-श्याम भक्त #सशुश्रीके 🤣

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!