लेट नाईननटीज - अरली २०००
काय दिवस होते! प्लॅनेट एम ला जायचं न सीडीज ऐकायच्या.. आवडल्या की कैसेट घ्यायच्या, सीडी परवाड्याची नाही... फास्टट्रॅक दुकानात जाऊन तसेच दिसणारे गॉगल्स झेड ब्रिज, फॅशन स्ट्रीट वरून उचलायचे, दुचाकी अगदी रिजर्व च्या शेवटच्या थेंबापर्यंत चालवायची, कूल नावाची चेन गळ्यात टाकून आपण कूल आहोत हे सिद्ध करायचं, सायकल पार्किंग मध्ये लावून पैसे द्यायचे दिवसभराचे, जुन्या जीन्स मध्ये मिळालेले पैसे बघून डोळे असे चमकायचे जणू लॉटरी लागलीय... घरून पैसे मिळाले एखाद्या वस्तू / कामा साठी की उरलेले पैसे कसे हवेत जायचे! लेट नाईननटीज - अरली २००० चे ते दिवस आठवले की कसं... रिवाइंड बटण दाबावसं वाटतं. डैम! दोज वेर द डेज! दोज वेर द डेज! #सशुश्रीके २१/०१/२०२०