जुग जुग जियो रहमान... तुझसे ही जिंदा है... ...तेरा हर एक फॅन 😊

असं म्हणतात की भूक लागली की काहीही गोड लागतं, मग माझं ही असच काहीसं.

रहमान ने काहीही वाढलं की माझे हे भूक लागलेले कान काहीही गोड मानून ओढून घेतात स्वर/संगीत...
लोकांनी, मित्रांनी रहमानला कितीही शिव्या घातल्या तरी त्या पचवतो मी, पचनव्यवस्था असली मजबूत आहे की रामायण/महाभारतातल्या त्या युद्धाचे बाण आठवतात... प्रतिकार क्षमता पेक्षा सहनशीलता टू द मॅक्स!
म्हणे काहीही कर पण रहमानला गायला सांगू नकोस पुढच्या शो मध्ये, काय राव ह्यावेळी बोर केलं रहमान ने, शो ला मजा नाय आली.. पूर्वीचा रहमान भारी होता... हे सगळं पेलत असताना मनात 'रोजा-बॉम्बे पासून ओके-जानू' पर्यंत सगळं वाहत असतं. झरा-नदी-सागर जसं येईल तशी बोट-जहाज बदलत असतोय हा कान.
पुलंच्या कथाकथनात एक मस्त किस्सा आहे, कोणीतरी गात असतं न जमत नाहीये म्हणून कोणतरी शिव्या देत असतं, तर रावसाहेब नावाचे पात्र जे काय फोडतात शब्दांनी त्या _कोणतरी_ ला!! ... म्हणे "तसं गाऊन दाखवा, मग कसं मूळव्याध होतोय की नाही बघा!"
असो...
मी भक्त आहेच नो डाउट...
रहमान भक्त. 😊 अगदी ९२ सलापासून निस्सम अविरत भक्ती करतोय आणि करत राहीन. त्याचा उच्चांक ही पाहिलाय आणि निचांक कधी पहायला मिळेल असं वाटत नाही आणि तशी वेळ ही येणार नाही ही सदिच्छा!
कोकणस्थ आणि इतर, मेरसेडीज आणि इतर, आंबा आणि इतर असं जर म्हणालात तर माझ्यासाठी रहमान आणि इतर! तो एक अजब रसायन आहे, तो एक रॉकेट सायन्स आहे, त्याने दिलेलं वैभव अजरामर आहे... त्याच्या गण्यांशी जडलेल्या माझ्या भावना, क्षण, आठवणी वैविध्यपूर्ण आहेत.
मिनिट भर सिग्नल वर थांबलेला जीव सिग्नल सोडून वेगळ्याच रस्त्यावर जाऊन गजब आयुष्य फिरून आलेला असतो. मग हिरवा का लागला ह्याचा प्रश्न ही पडतो कधी कधी... सांगतो काय *अजब सायन्स* ते हेच, केमिकल लोचा होतो. लाल आवडतो ग्रीन पेक्षा!

समजलं नसेल तर हा प्रश्न तर पडलेला असेलच काहींना.. "आखीर केहना क्या चाहते हो भाई!?"

भाई मेरे, चिल्ल...

केहना है दिल से,
सूनना है अजूबा,
गाना है कोलंबस,
रेहना है दिल ही दिल मै,
देखने है सपने,
केहना है दिल से...


जुग जुग जियो रहमान तुझसे ही जिंदा है...
...तेरा हर एक फॅन 😊



#सशुश्रीके ०६/०१/२०२०

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!