नशीबवान असणे ही व्याख्या खुप 'फ्लेक्झीबल' आहे, हे मात्र कळालं त्या दीवाशी!
इंटरव्यू • कुठले आपण? / मी गुजरातचा, अहमदाबाद. मोदींच्या गावा जवळचा :) • कधी आलात दुबईत? / ४ महिने झाले साहेब. • कोणी केला वीसा? / माहीत नाही, मी डीपोझिट भरले आहे फक्त इतकच माहीत्ये. • बर बर, घरी कोण कोण असतं? / ३ मुली आहेत मला आणि बायको • बायको काम करते की घरीच असते? / तिला इथून समोरचा रस्ता क्रॉस करायचं म्हणालं तरी ठाकेल ती! • का बरं, काही प्रोब्लेम आहे का? / अपंग आहे, पाय नाहीत तिला दोन्ही… • लग्ना नंतर अपंग झाली की लहानपणी? / लहानपणी… काहीतरी औषधांचा डोस जास्त झाला औषधांचा आणि पाय गेले त्यात. • म्हणजे तुला माहीत होतं की ती अपंग आहे, तरी तू लग्न केलेस!? / अह्हो वडील म्हणतील ती पूर्वदीशा... लग्ना आधी मी तीला पाहिलं पण नव्हतं, वडलांनी ठरवलं, मी लग्न केलं. • मग लहान मुलीला सांभाळते का मोठी मुलगी!? / हो हो... सांभाळते ना! मला मुलगा पण झालेला, पण १०दीवासात वरला, लोकं मला म्हणायचे की तू कमनशीबी आहेस, पण तसं नाहीये... • हो हो बरोबर आहे! नशीबवान लोकांनाच मूली असतात! मला पण मुलगीच आहे, आणि तीच असेल शेवटपर्यंत! / होय... मी स्वतः एक मोठं उदाहरण आहे तुमच्य...