आत घुसलो की आधीच ३-४जण असायचे...

आत घुसलो की आधीच ३-४जण असायचे...

कधी रीकामं पाहिलच नाही, त्यात मध्येच १जण असा यायचा जो नंबर लाउन गेलेला असायचा, अजुन चीडचीड, असो,  जुनी गाणी ठीक लागली/लावली तर ठीक, पण ९०ची कुमार शानू हिट्स लागले/लावले की माझं डोकं फीरायचं/फीरतं! मग वेळ जायचा पोस्टर्स पाहण्यात, वेगवेगळ्या फालतू चेहर्यांचा मस्तकावरचे विविध ढंगाच्या चित्रविचित्र केश-रंजना, बापरे विचारू नका, असले आउट ऑफ़ घीस वर्ल्ड वाले कट्स! त्यांकडे बघुन झालं की मग निरनीराळ्या तेलाच्या, क्रीमांच्या... बाटल्या! तिथून नजर जायची, अरश्याकडे... ते अरश्यासमोर  आरसा आणि त्यातले इंफीनाइट प्रतिबिंब... १० तुम्ही आणि बाकीचे १०... डोळे आणि डोकं गरगरायचया आत मी दुसरीकडे बघणार तर कोणीतरी काखेचा खजाना दाखवत डोके वर करुन उभा... मग ते बघुन न बघितल्या सारखं करत 'माझा नंबर कधी येणार!?' ह्याची खात्री करण्यासाठी विचारायचं... की तो बोलणार 'बसा की निवांत काय घाई!?' इतक्या आरामत ते केस कापणं चालू असतं काही विचारू नका... जसं काही हां त्याच्या आयुष्यातला शेवटचा 'कष्टम्बर' आहे!

असो... माझी वेळ आली बसायची की, ठरल्याप्रमाणे मी संगायचो, मागे स्लोप, लाइन नको... बाकी मिडियम, मग मान वर खली अड्जस्ट वगैरे करून, अंगावर ते काळं नीळं कपड़ं पांघरून, जी काही स्टीरियो कचकच सुरु व्हायची, माझे डोळे बंद, अजुबाजुला काय घडतय ह्याचा विसर पडायचा, पण तो कुमार शानू डब्डं(शौचालयातलं) घेऊन अखंड गायचा (गायचा!?) ह्याचा अतीप्रचंड त्रास होऊन मी 'त्याला वाइट वाटू दे' ह्या पातळी वर येऊन गाणं बदलवायला भाग पाडायचो! आणि ह्या सर्व प्रसंगात बाजुचा माणूस केस कापून घेत असताना घोरतांना पाहिलय मी, बाकीचे इकडे बघ तिकडे बघ, सगळी कड़े बघुन झालं की मग स्वतःकड़े बघ! मग तो उस्तरा घेऊन यायचा. ब्लेड चेंज, मग कानावरचे केस उडवत आणि कल्ले तोडत अखेरचा टप्पा, मालिश, कट काट कूट, डोळे तीरळे, एक पंखा दसऱ्यात घुसल्याचा जादूप्रयोग व्हायचा, महाभारतातला तो खुप अवतरांमधला सीन दीसायचा (कारण पंख्याच्या खालेच्याच् बाजूला होती ती फ्रेम)

ते सुखदायक रणांगण सोडून त्या सिंहासनावरून रजा घेताना जड़ अतःकरणाने हा जीव बाहेरच्या जगात पाउल टाकायचा, तो कुमार शानू सोडला तर बैस्ट होता आमचा 'बार्बर'

#सशुश्रीके | ९/३/२०१५ | ११.५७







Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!