नशीबवान असणे ही व्याख्या खुप 'फ्लेक्झीबल' आहे, हे मात्र कळालं त्या दीवाशी!


इंटरव्यू
• कुठले आपण? / मी गुजरातचा, अहमदाबाद. मोदींच्या गावा जवळचा :)
• कधी आलात दुबईत? / ४ महिने झाले साहेब.
• कोणी केला वीसा? / माहीत नाही, मी डीपोझिट भरले आहे फक्त इतकच माहीत्ये.
• बर बर, घरी कोण कोण असतं? / ३ मुली आहेत मला आणि बायको
• बायको काम करते की घरीच असते? / तिला इथून समोरचा रस्ता क्रॉस करायचं म्हणालं तरी ठाकेल ती!
• का बरं, काही प्रोब्लेम आहे का? / अपंग आहे, पाय नाहीत तिला दोन्ही…
• लग्ना नंतर अपंग झाली की लहानपणी? / लहानपणी… काहीतरी औषधांचा डोस जास्त झाला औषधांचा आणि पाय गेले त्यात. 
• म्हणजे तुला माहीत होतं की ती अपंग आहे, तरी तू लग्न केलेस!? / अह्हो वडील म्हणतील ती पूर्वदीशा... लग्ना आधी मी तीला पाहिलं पण नव्हतं, वडलांनी ठरवलं, मी लग्न केलं.
• मग लहान मुलीला सांभाळते का मोठी मुलगी!? / हो हो... सांभाळते ना! मला मुलगा पण झालेला, पण १०दीवासात वरला, लोकं मला म्हणायचे की तू कमनशीबी आहेस, पण तसं नाहीये...
• हो हो बरोबर आहे! नशीबवान लोकांनाच मूली असतात! मला पण मुलगीच आहे, आणि तीच असेल शेवटपर्यंत! / होय... मी स्वतः एक मोठं उदाहरण आहे तुमच्यासमोर! बरोबर बोल्लात तुम्ही, नशीबवान लोकांनाच मुलगी असते! मी एका हॉस्पिटल मध्ये होतो कामाला, वडलांची तब्येत बरी नाही म्हणून मला कॉल आलेला घरातून पण मी जिथे काम करत होतो तिथले डॉक्टर म्हणाले की हातातली ३-४ ऑपरेशंस झाल्याशिवाय सुट्टी मिळणार नाही, मला प्यायची सवय होती, जाम प्यायलो त्यादीवशी, त्या डॉक्टर ला ही शिव्या घेतल्या आणि घरी फोन केला आणि म्हणालो नाही जमणार यायला, पण... पण माझी बहीण मुंबईत असूनही पोहोचली माझ्या वडलांजवळ! आयुष्यभर ज्यानी मला सांभाळलं त्याच्या शेवटच्या निरोपास मी नव्हतो, होती तर त्यांची मुलगी! खरय... नशीबवान लोकांना मूली असतात!
(मी विषयच बदलल्ला, जाम सेंटी व्हायला लागलेली केस)
• हम्म... तुम्ही गुजरातचे मग उंधियो आवडत असेल ना तुम्हाला / छे छे मला नाही आवडत, घरी केला तरी मी नाही खात, मला आवडतो खंबा... पण आता तो पण सोडला, मुंबईत भायंदर ला होतो तेव्हा दीवासाला ३०-४० मावा पुड्या पण व्हायच्या! पण मग नंतर सगळं सोडलं! आता काही नाही, त्याचा फरक ही जाणवतो, आता मी हेल्दी आहे. काहीच व्यसन नाही.
• वाह वाह... बर केलत सर्व सोडून दीले! मग आता इथे किती वर्ष काढणार!? / बघू... काही ठरवलं नाही, ४-५वर्ष काढीन म्हणतो!
• मुंबईत भायंदर नेमकं कुठाय? / काय माहीत नाही, बोरीवली कांदिवली साइड ला आहे.. अहो मला इथे येऊन ४महीने झाले पण आजुबाजुच काहीच माहीत नाही, हे असच सेम भायंदर मध्ये पण! आजुबाजुचा काय माहीत नाही!
• असो, म्हणजे तू एकटा कमवतोस ३मूली आणि बायकोसाठी / नाही... माझ्या मोठ्या वाडलाांना २मूली आहेत त्यांची पण जावाबदारी आहे. त्यातल्या एकीचं लग्न लाऊन आलोय!
• बर! खुपच जवाबदाऱ्या आहेत म्हणजे! असो... किती झाले! / अजुन काही करु साहेब, ऑइल मसाज वगैरे!?
• नको नको,नेक्स्ट टाइम, आज जरा घाइत आहे, पुढच्या वेळी वेळात वेळ काढून येईन... / १५झालेत साहेब
मी २०ची नोट टेकवली, त्यानी परत या चा आग्रह केला, मी निघालो घरी, ह्या गोष्टीला आठवडा होईल पण त्याचा चेहरा आणि त्याचे ते बोलणे डोक्यातून जात नाहीत म्हणून इथे उतरवले. आता हलकं वाटतय! पण त्याचं काय, घरच्या लोकापसुन दूर, अर्धा डझन लोकांच्या जवाबदाऱ्या!! ५ची एक जास्त नोट दील्या पेक्षा पुढे काहीच करु शकत नाही म्हणा. आणि त्यानी सांगितल्या पैकी खरं किती खोटं किती देवास ठाऊक, असो!
नशीबवान असणे ही व्याख्या खुप 'फ्लेक्झीबल' आहे, हे मात्र कळालं त्या दीवाशी!
#सशुश्रीके | २२ मे २०१५

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!