भयाण Corona
काय ना... २०२० वर्ष असलं उलथापालथ करणारं असेल असं वाटलं नव्हतं... वर्षाचा ३राच महिना! वर्क फ्रॉम होम करून ११ दिवस होतील आज, फक्त २दा बाहेर पडलो आहे ह्या दिवसात, आयुष्यात कधी वाटलं नव्हतं की मनुष्य मनुष्याला इतका घाबरायला लागेल! १० काय १०मिनिटे जरी एकटा असलो की कसं तरी व्हायचं, चुकल्या चुकल्या सारखं, आता सवय होत चालली आहे! किती वाईट ना, जग बदललं काही महिन्यांत, आता आपण बदलत आहोत, घरी रहा... सुरक्षित रहा च्या नावाखाली सगळे स्वखुशीने काही नाईलाजाने दबले गेले आहेत. वर्क फ्रॉम होम आहेच पण ज्यांना शक्य नाहीत त्यांचे हाल, घरी बसून ज्यांना पगार हा पर्याय नाहीये त्यांचे! सकाळी संध्याकाळी त्यांसाठी प्रार्थना करतोय, निदान एवढं तरी नक्कीच करू शकतोय, ज्या संस्था अश्या लोकांना मदत करत आहेत त्याचे शतशः आभार. उगाच / अत्यावश्यक कारण नसताना लोकं बाहेर पडतायत त्यांना हे कळत नाहीये की ते ह्या विषाणूच्या संपर्कात आले आणि त्यांच्या संपर्कात त्यांचे मित्र / नातेवाईक... अहो ते सोडा पत्नी-मुले ही येऊ शकतात आणि पुढे सांगायची गरज नाही, सगळ्यात वाईट गोष्ट अशी की लक्षणे उशीरा कळतात आणि तो पर्यंत उशीर ...