Lockdown!

ह्या Lockdown मुळे नक्की काय होतंय कळत नाही, घराबाहेर पडायला उत्सुकता आणि कुतुहलता आहे पण हिम्मत नाही, घरात बसून काम होतंय, family togetherness का काय ते असतय ते होतंय पण तरी हुरहूर बाहेर न पडता येत ह्याची, अगदी "कससच होतंय" असं म्हणतात तसं काही तरी होतंय का काय कळायला मार्ग नाही .

रुग्ण वाढत आहेत, मरणाऱ्यांची संख्या वाढत आहे, त्यापेक्षा 'मारणाऱ्यांची संख्या' - ह्यांच काय करावं कळत नाहिये!

बँक कर्मचारी, डॉकटर, नर्सेस... झालच तर डिलिव्हरी देणारे, बिचारे... त्यांना पण असतील की पोरं बाळं, जे लोकं इथून तिथे गेले ह्या काळात ते अडकलेत! काही तर देशाबाहेर अडकलेत!!!

असला सगळा विचार येतो रोज... हातात मोबाइल, डोळ्यासमोर टीव्ही, ढुंगणाखाली सोफा, वेळेवर चहा जेवण, ऑफिस मधल्या नकोत्या लोकांचे चेहरे दिसत नाहीत, सगळं कसं स्वप्नातलं घडत असताना... 'सगळं ठीक आहे पण सगळं ठीक नाहीये' असं काहीसं जीवन झालंय! 

नजर लागलीय बघा जगाला आपलीच! 

त्यात एक नावीन युक्तिवाद का काय ते हेतोय, Nature is taking his revenge! प्रदूषण कमी कमी होत चालले आहे वगैरे, प्राणी रस्त्यावर आणि आपण गुहेत! 

आनंद आहे पण त्या आनंदाच्या ताटात अनोळखी पदार्थ त्रास देतोय! 

काय आहे कुतुहलतेने म्हणून काही खतायत तो, काही जर घाबरून टाळत आहेत तो, काही जण इतरांनी तो खाऊ नये ह्यासाठी धडपडतायत... वगैरे वगैरे, त्यात धर्म -जात ह्यांनी विष कालवायचे ठरवले आहे ताटात... Surprise elementच, जे काय आहे अजबच आहे हे!

बरं चायनीज इतकं कधीच आवडलं नाही, बाकी इंडो-चायनीज ठिकाय माणसाळलेलं आहे, नेपाळी लोकांना जमतंय आणि आपल्याला भावतय!

असो, त्यात हा व्हायरस पण मेड इन चायनाच... अहो खा जे जगभरात खातात ते खा, ते वटवाघूळ साप बेडूक तत्सम खाऊन काय केलं ओ तुम्ही बघा, आता तरी सुधरा! 

आनंदी...
तरी चिंतातूर...
आणि घाबरलेला 
#सशुश्रीके

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!